Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अखेर 11 वर्षांचा पाठलाग संपला! ऊसतोडणी घोटाळ्याचा सूत्रधार आळेफाटा पोलिसांच्या ताब्यात

तब्बल अकरा वर्षांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटकातील विविध पोलीस यंत्रणांना गुंगारा देणाऱ्या आंतरराज्य फसवणूक टोळीच्या मुख्य सूत्रधाराला अखेर आळेफाटा पोलिसांनी नाट्यमय कारवाईत जेरबंद केले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 08, 2026 | 02:41 PM
अखेर 11 वर्षांचा पाठलाग संपला! ऊसतोडणी घोटाळ्याचा सूत्रधार आळेफाटा पोलिसांच्या ताब्यात

अखेर 11 वर्षांचा पाठलाग संपला! ऊसतोडणी घोटाळ्याचा सूत्रधार आळेफाटा पोलिसांच्या ताब्यात

Follow Us
Follow Us:

आळेफाटा : तब्बल अकरा वर्षांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटकातील विविध पोलीस यंत्रणांना गुंगारा देणाऱ्या आंतरराज्य फसवणूक टोळीच्या मुख्य सूत्रधाराला अखेर आळेफाटा पोलिसांनी नाट्यमय कारवाईत जेरबंद केले आहे. बनावट सातबारे, खोटी कागदपत्रे, अनेकांच्या नावे उघडलेली बँक खाती आणि सव्वा कोटी रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक अशा गंभीर गुन्ह्यांमुळे चर्चेत असलेल्या या टोळीचा पर्दाफाश झाल्याने ऊसतोडणी व्यवसायाशी संबंधित अनेक धक्कादायक बाबी समोर येऊ लागल्या आहेत.

 

पोलीसांनी ज्ञानदेव तेजराव वाघ (रा. गेवराई खुर्द, जि. छत्रपती संभाजीनगर) आणि जगन्नाथ रेवननाथ जायभाये (रा. दुनगाव, जि. जालना) यांना अटक केली आहे. न्यायालयाने दोघांना ८ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

५५ मिनिटांचा थरार

मुख्य आरोपी ज्ञानदेव वाघ हा मराठवाड्यातील गेवराई खुर्द येथे वास्तव्यास असल्याची गोपनीय माहिती आळेफाटा पोलिसांना मिळाली होती. पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने १ जून रोजी सापळा रचला. मात्र, पोलिसांची हालचाल लक्षात येताच आरोपीचे समर्थक आणि स्थानिक जमावाने कारवाईत अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला. शासकीय वाहन अडविणे, पोलिसांना घेराव घालणे आणि आरोपीला पळवून नेण्याचा प्रयत्न अशा घटनांमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. तब्बल ५५ मिनिटांच्या संघर्षानंतर पोलिसांनी धाडस, संयम आणि नियोजनाच्या बळावर आरोपीला ताब्यात घेतले. स्थानिक आणि राजकीय दबावाला न जुमानता केलेल्या या कारवाईची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

बनावट सातबारे, खोटी कर्जे आणि बँक खात्यांचे जाळे

पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, टोळीने सोलापूर जिल्ह्यातील करकंब परिसरासह विविध भागातील अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या नावाने बनावट ७/१२ उतारे तयार केले. या बनावट कागदपत्रांच्या आधारे ऊसतोडणी करार, वाहतूक व्यवहार आणि साखर कारखान्यांशी संबंधित आर्थिक व्यवहार करून लाखो रुपयांची फसवणूक केली आहे. याशिवाय धाराशिव जिल्ह्यातील काही गावांतील नागरिकांची आधारकार्ड, पॅनकार्ड यांसारखी कागदपत्रे गोळा करून त्यांच्या नावाने बँक खाती उघडण्यात आली. तपासादरम्यान तब्बल ४५ निरपराध व्यक्तींच्या नावावर खोटी कर्जे उचलल्याचेही उघड झाले आहे. या व्यवहारातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

५० हून अधिक वॉरंट; तरीही ११ वर्षे मोकाट

या टोळीविरुद्ध महाराष्ट्रातील सातारा, कराड, सोलापूर तसेच कर्नाटक राज्यात फसवणूक, विश्वासघात, बनावट कागदपत्रे तयार करणे, कट रचणे यांसारख्या गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. विविध न्यायालयांतून ५० हून अधिक वॉरंट प्रलंबित असतानाही आरोपी तब्बल ११ वर्षे पोलिसांच्या हाताबाहेर राहिला होता. या काळात त्याला नेमके कोणाचे संरक्षण मिळत होते, स्थानिक पातळीवर कोणाची मदत मिळाली आणि त्यामागे राजकीय पाठबळ होते का, याचा तपास आता वेगाने सुरू आहे.

चार आरोपी अद्याप फरार

या गुन्ह्यातील काकासाहेब बाबुराव आगळे (रा. गेवराई खुर्द), सुधाकर मुरलीधर वाघ (रा. गेवराई खुर्द), राजु लोभा चव्हाण (रा. परदरी तांडा) आणि दीपक पोपटराव उबाळे (रा. गोगलगाव, जि. बीड) हे चार आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.

हे सुद्धा वाचा : सीबीएसईचा आणखी एक अजब घोळ? मात्र, ‘या’ १ टक्के विद्यार्थ्यांमुळे बोर्डाचा सावळागोंधळ उघड झाला

आळेफाटा पॅटर्न’ची राज्यभर चर्चा

दहा वर्षांहून अधिक काळ विविध यंत्रणांना चकवा देणाऱ्या आरोपीला त्याच्याच बालेकिल्ल्यात घुसून अटक करण्याची कामगिरी आळेफाटा पोलिसांनी करून दाखवली. त्यामुळे पुणे ग्रामीण पोलीस दलासह आळेफाटा पोलिसांच्या धाडसी आणि नियोजनबद्ध कारवाईचे कौतुक होत आहे. ऊसतोडणी व्यवसायाच्या नावाखाली सुरू असलेल्या आर्थिक फसवणुकीच्या मोठ्या रॅकेटकडे या कारवाईमुळे राज्याचे लक्ष वेधले गेले असून आगामी तपासात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Web Title: Alephata police have arrested the mastermind of the sugarcane cutting scam

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2026 | 02:41 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Fraud Case

संबंधित बातम्या

पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून व्यावसायिकाची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये शेवटची इच्छा
1

पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून व्यावसायिकाची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये शेवटची इच्छा

पिंपळे जगतापमधील ‘त्या’ तरुणाच्या खुनाचा लागला छडा; तीन आरोपींना ठोकल्या बेड्या
2

पिंपळे जगतापमधील ‘त्या’ तरुणाच्या खुनाचा लागला छडा; तीन आरोपींना ठोकल्या बेड्या

Pune Murder : बहिणीची छेड काढल्याचा राग अनावर; पुण्यात 17 वर्षीय सराईत गुन्हेगाराचा निर्घृण खून
3

Pune Murder : बहिणीची छेड काढल्याचा राग अनावर; पुण्यात 17 वर्षीय सराईत गुन्हेगाराचा निर्घृण खून

सराईत गुन्हेगारावर गोळीबार करुन खुनाचा प्रयत्न; 5 आरोपींना सापळा रचून पकडले
4

सराईत गुन्हेगारावर गोळीबार करुन खुनाचा प्रयत्न; 5 आरोपींना सापळा रचून पकडले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.