Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दरोड्याच्या तयारीतील टोळी आंबेगाव पोलिसांच्या जाळ्यात, कोयता अन् मिरची पावडर जप्त; तिघांना अटक

आंबेगाव पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या तिघा जणांच्या टोळीला अटक केली आहे. आरोपींकडून एक लोखंडी कोयता आणि मिरची पावडरची पाकिटे जप्त केली आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 10, 2026 | 12:30 AM
दरोड्याच्या तयारीतील टोळी आंबेगाव पोलिसांच्या जाळ्यात, कोयता अन् मिरची पावडर जप्त; तिघांना अटक

दरोड्याच्या तयारीतील टोळी आंबेगाव पोलिसांच्या जाळ्यात, कोयता अन् मिरची पावडर जप्त; तिघांना अटक

Follow Us
Follow Us:

पुणे : आंबेगाव पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या तिघा जणांच्या टोळीला अटक केली आहे. आरोपींकडून एक लोखंडी कोयता आणि मिरची पावडरची पाकिटे जप्त करण्यात आली असून, अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एकजण तडीपार असतानाही शहरात वावरत असल्याचे तपासात उघड झाले आहे.

 

अभय ऊर्फ सोन्या अशोक निसर्गंध (वय २२), अमर अशोक निसर्गंध (वय २४) आणि प्रथम नंदू गवळी (वय २४) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्या दोन साथीदारांनी पोलिसांना चकवा देत घटनास्थळावरून पळ काढला असून त्यांचा शोध सुरू आहे. याबाबत पोलिस अंमलदार हरीश गायकवाड यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दरी पुलाजवळील साई लॉज परिसरात ही कारवाई करण्यात आली.

आंबेगाव पोलीस हद्दीत गस्तीवर असताना काही संशयित व्यक्ती दरी पुलाजवळ दरोड्याची तयारी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ सापळा रचून छापा टाकला. कारवाईदरम्यान तिघांना ताब्यात घेण्यात आले, तर दोन जण घटनास्थळावरून पसार झाले. आरोपींच्या झडतीत एक लोखंडी कोयता आणि दोन मिरची पावडरची पाकिटे आढळून आली. तपासात अभय ऊर्फ सोन्या निसर्गंध याला यापूर्वी दोन वर्षांसाठी पुणे शहर, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय आणि पुणे जिल्ह्याच्या हद्दीतून तडीपार करण्यात आल्याचे समोर आले आहे. मात्र, तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन करून तो पुन्हा शहरात वावरताना आढळला.

हे सुद्धा वाचा : पुण्याच्या वेशीवर ‘हाऊस पार्टी’चे नवे जाळे; शहरातील कारवाईनंतर ग्रामीणमधील फार्महाऊस, रिसॉर्ट्सवर वाढला कल

लातूर पोलिसांची अवैध धंद्याविरोधात मोठी कारवाई

लातूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच समाजात गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभर अवैध धंदेविरोधी विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत ०१ मे ते ३१ मे या कालावधीत जिल्हा पोलीस दलाने विविध प्रकारच्या अवैध व्यवसायांवर प्रभावी कारवाई करत एकूण ५५६ गुन्हे दाखल केले असून, सुमारे ९७ लाख १४ हजार ९४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Web Title: Ambegaon police have arrested three members of a gang preparing for a robbery

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Theft Cases

संबंधित बातम्या

डोके मुंडवले, निर्वस्त्र करून फिरवले; राजस्थानमध्ये आदिवासी महिला अत्याचार प्रकरणी पतीसह ७ आरोपींना अटक
1

डोके मुंडवले, निर्वस्त्र करून फिरवले; राजस्थानमध्ये आदिवासी महिला अत्याचार प्रकरणी पतीसह ७ आरोपींना अटक

Nanded Crime : नांदेड पोलिस अधीक्षकांची कडक कारवाई; जिल्ह्यातील ८ गुन्हेगार हद्दपार
2

Nanded Crime : नांदेड पोलिस अधीक्षकांची कडक कारवाई; जिल्ह्यातील ८ गुन्हेगार हद्दपार

स्टेटसवरून आळेफाटा भागात राडा, ग्रामपंचायत सदस्याला मारहाण; नेमकं काय घडलं?
3

स्टेटसवरून आळेफाटा भागात राडा, ग्रामपंचायत सदस्याला मारहाण; नेमकं काय घडलं?

Mexican Musician: संगीतकाराच्या घरात शेवटची काळरात्र! गरोदर पत्नी, 3 वर्षांची मुलगी, मोलकरीण अन् कुत्र्याही ठार
4

Mexican Musician: संगीतकाराच्या घरात शेवटची काळरात्र! गरोदर पत्नी, 3 वर्षांची मुलगी, मोलकरीण अन् कुत्र्याही ठार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.