Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amit Thackeray: “आता तरी सरकारचं डोकं ठिकाणावर येणार का?” नसरापूरमधील घटनेवर अमित ठाकरेंचा सत्तेतील नेत्यांना संतप्त सवाल

Amit Thackeray News: पुण्याच्या नसरापूरमधील चिमुरडीच्या हत्येनंतर अमित ठाकरेंनी सरकारला संतप्त जाब विचारला आहे. "आता तरी सरकारचं डोकं ठिकाणावर येणार का?" असा सवाल करत त्यांनी प्रशासनावर प्रहार केला.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 03, 2026 | 04:36 PM
नसरापूरमधील घटनेवर अमित ठाकरेंचा सत्तेतील नेत्यांना संतप्त सवाल (Photo Credit- X)

नसरापूरमधील घटनेवर अमित ठाकरेंचा सत्तेतील नेत्यांना संतप्त सवाल (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • “आता तरी सरकारचं डोकं ठिकाणावर येणार का?”
  • नसरापूरमधील घटनेवर अमित ठाकरेंचा सत्तेतील नेत्यांना संतप्त सवाल
  • जाणून घ्या काय म्हणाले…
Amit Thackeray on Nasarapur Crime News: पुणे जिल्हयातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे ३-४ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अमानवी कृत्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून राजकीय वर्तुळातून सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठली आहे. मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी सोशल मीडियावर एक सविस्तर पोस्ट शेअर करत सरकारला धारेवर धरले आहे.
आता तरी सरकारचं डोकं ठिकाणावर येणार आहे की नाही? नसरापूरमध्ये त्या चिमुरडीसोबत जे घडलं, ते ऐकून मन सुन्न झालंय आणि डोकं रागाने भणभणतय. सुट्टीसाठी आजीकडे आलेल्या ३-४ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केली जाते? ही कोणती विकृती आपण आपल्या समाजात आणि राज्यात पोसतोय?… pic.twitter.com/N5uSQgdvXS — Amit Thackeray (@amitrthackeray) May 3, 2026

अमित ठाकरेंनी पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय?

आता तरी सरकारचं डोकं ठिकाणावर येणार आहे की नाही? नसरापूरमध्ये त्या चिमुरडीसोबत जे घडलं, ते ऐकून मन सुन्न झालंय आणि डोकं रागाने भणभणतय. सुट्टीसाठी आजीकडे आलेल्या ३-४ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केली जाते? ही कोणती विकृती आपण आपल्या समाजात आणि राज्यात पोसतोय? महाराष्ट्रात आज माता-भगिनी सोडाच, पण लहान बाळंही सुरक्षित राहिलेली नाहीत, ही आपल्या सर्वांसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे.

गेल्या काही महिन्यांतील घटनांची मालिका पाहिली तर अंगावर काटा येतो. नसरापूर, बदलापूर, ठाणे, पुणे, चाकण, महाळुंगे… अशा किती जागांची आणि किती निष्पापांची नावं आपण घ्यायची? प्रत्येक वेळी नवी घटना घडते, आपण दोन दिवस संताप व्यक्त करतो आणि तिसऱ्या दिवशी सगळं विसरून जातो. म्हणूनच पोर्शे अपघातात निबंध लिहून सुटका होते आणि नेस्कोमध्ये ओव्हरडोसमुळे जीव जाऊनही कोणतीच ठोस कारवाई होत नाही. ही व्यवस्थेची लाचारी नाही तर काय आहे?

माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं प्रशासन नक्की कोणासाठी काम करतंय? गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही, कारण त्यांना माहितीये की कोणत्या ना कोणत्या मंत्र्याचा वरदहस्त त्यांच्या पाठीशी आहे.

Nasrapur Crime News: नसरापूर बालिका अत्याचार प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेची गुन्ह्याची कबुली

‘शक्ती कायद्याच्या’ गप्पा खूप झाल्या, पण तो कायदा प्रत्यक्षात राबवण्याचं धाडस हे सरकार का दाखवत नाहीये? केवळ कागदावर कायदे करून किंवा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ‘लाडकी बहीण’ योजना जाहीर करून बहिणी सुरक्षित होत नसतात; त्यांच्या सुरक्षिततेसाठी गुन्हेगारांच्या मनात कायद्याचा दरारा निर्माण करावा लागतो.

आज परिस्थिती इतकी भीषण आहे की, उद्या आपली मुलं घराबाहेर सुरक्षित असतील याची खात्री कोणीच देऊ शकत नाही. सत्तेत बसलेले लोक १० दिवसांनी जुन्या घटना विसरून नवीन जाहिरातींमध्ये दंग होतात, पण पीडितांचे काय? माझं सरकारला पुन्हा सांगणं आहे, पोलिसांना फक्त २४ तासांचा ‘फ्री हॅण्ड’ द्या! आमचे पोलीस सक्षम आहेत, पण त्यांचे हात राजकीय हितसंबंधांनी बांधलेले आहेत.

लोकशाहीत आम्ही प्रत्येक गोष्ट सहन करतोय, पण हे सर्व सहन करण्याच्या पलीकडचे आहे. मी इथे एक ‘नेता’ म्हणून नाही, तर एक सामान्य ‘माणूस’ आणि एक बाप म्हणून जाब विचारतोय… आपल्या महाराष्ट्राला आपण कोणत्या थरावर नेऊन ठेवणार आहोत?

सुषमा अंधारेंची गृहमंत्र्यांवर टीका

शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांनीही या घटनेचा निषेध करत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. “चार वर्षांच्या बालिकेवर असा अमानवी प्रकार घडतो, हे अत्यंत दुर्दैवी आहे. राज्यातील कायदा-सुव्यवस्था कोलमडली असून नागरिक असुरक्षित आहेत,” अशा शब्दात त्यांनी गृहविभागाच्या कार्यपद्धतीवर टीका केली.

काँग्रेसची राजीनाम्याची मागणी

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या घटनेला गृहविभागाचे अपयश मानले आहे. ही घटना महाराष्ट्राच्या नावाला काळीमा फासणारी असून गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिलेला नाही. राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नसल्यामुळे गुन्हेगार मोकाट आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी प्रायश्चित म्हणून गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी सपकाळ यांनी केली आहे.

सरकारची भूमिका

दुसरीकडे, सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याचे सांगितले आहे. “आम्ही या प्रकरणी कठोर पावले उचलली असून कोणत्याही दोषी व्यक्तीला सोडले जाणार नाही,” असे आश्वासन प्रशासनातर्फे देण्यात आले आहे.

Nasrapur crime News: नसरापूर प्रकरणात मोठी अपडेट; राज्य महिला आणि बाल हक्क आयोगाकडून दखल

Web Title: Amit thackeray questions maharashtra govt on nasrapur child murder case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2026 | 04:36 PM

Topics:  

  • amit thackeray
  • crime news
  • maharashtra
  • Maharashtra Goverment

संबंधित बातम्या

NCRB अहवालावरून महाराष्ट्राच्या सुरक्षेचे वाभाडे! दर ५ मिनिटांना एक बळी; जयंत पाटलांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
1

NCRB अहवालावरून महाराष्ट्राच्या सुरक्षेचे वाभाडे! दर ५ मिनिटांना एक बळी; जयंत पाटलांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला

सोशल मिडीयावरील ओळख महिलांना पडली महागात; सायबर चोरट्यांकडून तब्बल 13 लाखांची फसवणूक
2

सोशल मिडीयावरील ओळख महिलांना पडली महागात; सायबर चोरट्यांकडून तब्बल 13 लाखांची फसवणूक

Shrikant Shinde : शिवसेना बळकटीसाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा राज्यव्यापी संवाद दौरा सुरू
3

Shrikant Shinde : शिवसेना बळकटीसाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा राज्यव्यापी संवाद दौरा सुरू

Dharashiv News : आरक्षणाच्या मुद्द्यावर उमरग्यात भीम पॅंथर संघटनेचे ‘जोडे मारो’ आंदोलन
4

Dharashiv News : आरक्षणाच्या मुद्द्यावर उमरग्यात भीम पॅंथर संघटनेचे ‘जोडे मारो’ आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.