Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amravati: अमरावतीत भरधाव ट्रकचा कहर! दुचाकीला धडक देत दोन महिलांचा जागीच मृत्यू; चालक अपघातानंतर फरार

अमरावतीतील राजापेठ उड्डाणपुलावर भरधाव मालवाहू ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून फरार झाला. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून फरार चालकाचा शोध सुरू आहे. अपघातामुळे काही काळ वाहतूकही ठप्प झाली होती.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 29, 2026 | 07:43 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • राजापेठ उड्डाणपुलावर ट्रकच्या धडकेत दोन महिलांचा जागीच मृत्यू.
  • अपघातानंतर ट्रकचालक फरार; पोलिसांकडून शोधमोहीम सुरू.
  • अपघातामुळे उड्डाणपुलावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली.
अमरावती: अमरावती शहरातील राजापेठ उड्डाणपुलावर सोमवारी सकाळी घडलेल्या एका भीषण अपघाताने संपूर्ण शहर हादरले. बांधकाम साहित्य वाहून नेणाऱ्या भरधाव मालवाहू ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.

कसा झाला अपघात?

गौरी प्रमोद धर्माळे (वय 27) आणि हर्षा आदेश गावंडे (वय 39) अशी अपघातातील मृत महिलांची नावे आहेत. बांधकाम साहित्याच्या दळणवळणासाठी वापरण्यात येणाऱ्या मालवाहू ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने ही दुर्घटना घडली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघातानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच, मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, अपघाताच्या घटनेनंतर राजापेठ उड्डाणपूलावर वाहनांची मोठी रांग लागली होती, त्यामुळे वाहतूक काही काळ ठप्प झाल्याचं दिसून आलं.

पुण्यात दोन सख्ख्या भावांवर हल्ला, तीक्ष्ण शस्त्राने सपासप वार; नेमकं काय घडलं?

कबूतर चोरीच्या वादातून दोन जणांची हत्या; अमरावतीत सरपंचासह सात जणांना बेड्या

अमरावती येथून एक दुहेरी हत्याकांडाची घटना समोर आली आहे. २ जिवलग मित्रांची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी सरपंचासह ७ आरोपींना अटक केली आहे. यात सरपंचासह ५ मुख्य आरोपी सामील आहेत. घडलेली घटना अमरावती येथील वलगाव येथे घडली. या दुहेरी घटनेने अमरावती हादरली असून एकच खळबळ उडाली आहे.

वलगाव येथे मध्यरात्री २ तरुणांची हत्या करण्यात आली होती. ऋतिक पंडित (वय २५ वर्षे) आणि संजोग जोशी (वय २४ वर्षे) अशी हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. कबूतर चोरल्याच्या वादातून ही हत्या करण्यात आली. मध्यरात्रीच्या सुमारास ऋतिक पंडित आणि संजोग जोशी हे दोघे वलगाव बसस्टँड परिसरात असताना आरोपींनी त्यांच्यावर अचानक जीवघेणा हल्ला केला. धारदार शस्त्राने वार करत त्यांना जागीच संपवण्यात आले होते. हा हल्ला इतका भयानक होता की संजोग आणि ऋतिक या गंभीर जखमी झालेल्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने खळबळ उडाली आहे.

अत्यंत किरकोळ आणि जुन्या वादातून ही हत्याकांडाची घटना घडली होती. या प्रकरणी सरपंचासुधीर उगले यांचा सहभाग आढळून आल्यामुळे त्यांना देखील अटक करण्यात आली आहे. या हत्येचा सखोल तपास वलगाव पोलीस करत आहे. या सर्व आरोपींना आज अमरावती जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पोलीस पुढील कारवाई करत आहे.

पत्नी अन् तिच्या प्रियकराच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; गळफास घेऊन संपवलं जीवन

💡

Frequently Asked Questions

  • Que: अपघातात किती महिलांचा मृत्यू झाला?

    Ans: दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला.

  • Que: अपघातानंतर ट्रकचालकाने काय केले?

    Ans: तो घटनास्थळावरून फरार झाला.

  • Que: ही दुर्घटना कुठे घडली?

    Ans: अमरावतीतील राजापेठ उड्डाणपुलावर.

Web Title: Amravati rampaging truck wreaks havoc in amravati two women killed on the spot after being hit by the vehicle driver fled the scene

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2026 | 07:43 AM

Topics:  

  • Accident
  • amravati
  • crime

संबंधित बातम्या

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला
1

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी
2

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप
3

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप

राज्य फेंसिंगच्या रणांगणात कुचन प्रशालेचे तीन शिलेदार; अक्षय, श्वेता अन् तुलसीची चमकदार कामगिरी
4

राज्य फेंसिंगच्या रणांगणात कुचन प्रशालेचे तीन शिलेदार; अक्षय, श्वेता अन् तुलसीची चमकदार कामगिरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.