Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bus Accident : अंबड तालुक्यात भरधाव एसटी बसेस एकमेकांना धडकल्या; जखमींचा आकडाही समोर

जालना-बीड महामार्गावरील अंबड तालुक्यातील शहापूर गावानजीक गल्हाटी नदीच्या पुलावर शनिवारी (४ जुलै) सकाळी साडेनऊच्या सुमारास दोन एसटी बसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात ३० ते ४० प्रवाशी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 05, 2026 | 01:01 PM
बड तालुक्यात भरधाव एसटी बसेस एकमेकांना धडकल्या; जखमींचा आकडाही समोर

बड तालुक्यात भरधाव एसटी बसेस एकमेकांना धडकल्या; जखमींचा आकडाही समोर

Follow Us
Follow Us:

अंबड : जालना-बीड महामार्गावरील अंबड तालुक्यातील शहापूर गावानजीक गल्हाटी नदीच्या पुलावर शनिवारी (४ जुलै) सकाळी साडेनऊच्या सुमारास दोन एसटी बसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात ३० ते ४० प्रवाशी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. चालकासह १५ प्रवाशांची प्रकृती गंभीर असून त्यांना जालना येथील जिल्हा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. जखमीत बहुतांश विद्यार्थी यांचा समावेश आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून आठवडाभरात या ठिकाणी बस अपघाताची ही दूसरी घटना आहे. या अपघातामुळे पुलावरील दोन्ही बाजूची वाहतूक तासभर ठप्प झाली होती. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलिस प्रशासन आणि आरोग्य विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी रुग्णालयांत जाऊन जखमींची विचारपूस केली.

 

शहापूरच्या ग्रामस्थांची तत्परता; जेसीबीच्या साहाय्याने हटवली वाहने

अपघातानंतर गल्हाटी नदीच्या पुलावर मोठा आवाज होताच शहापूर येथील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गावकऱ्यांनी स्वतः पुढाकार घेत बसमध्ये अडकलेल्या जखमी विद्यार्थी आणि प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले, तात्काळ इतर वाहने आणि रुग्णवाहिका बोलावून सर्व जखमींना अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. पुलावरच अपघात झाल्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. अखेर क्रेन आणि जेसीबी मशीन बोलावून दोन्ही अपघातग्रस्त बसेस बाजूला काढण्यात आल्या आणि वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

दोन्हीही पुलावर धडकल्या बस

या घटनेची सविस्तर माहिती अशी की, शनिवारी सकाळी भांबेरीहून बस (क्र. एमएम १४, एमएच १७५०) अंबडकडे जात होती. आणि जालन्याहून बीडकडे जालना ते अक्कलकोट बस (क्र. एमएच १४-बीटी. ३०२२) वडीगोद्री-जालना मार्गावरून जात होती. सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास दोन्ही बस शहापूर येथील गल्हाटी नदीच्या पुलावर आल्या असता अंबडहून बीडकडे जाणाऱ्या बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि दोन्ही बसची समोरासमोर जोराची धडक झाली. भांबेरीहून येणाऱ्या बसमध्ये सकाळी शाळेत आणि कॉलेजमध्ये जाणारे बहुतांश विद्यार्थी प्रवास करत होते. धडक इतकी भीषण होती की, बसच्या पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला. या अपघातात ३० ते ४० प्रवाशी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. याच ठिकाणी नवीन पुलाचे काम चालू असून दोन्ही पुलांना बस जाऊन अडकल्यामुळे नवीन पुलामुळे दोन्ही बस नदीत कोसळल्या नाहीत. त्यामुळे सुदैवाने मोठी जिवीतहानी टळली.

हे सुद्धा वाचा : थायलंडमध्ये भीषण अपघात! अल्पवयीन मुलाने यात्रेकरुंच्या अंगावर चढवला ट्रक; ८ बौद्ध भिक्षूंचा दुर्दैवी मृत्यू

जखमींची नावे, १५ जण गंभीर

चांद पाशा शेख (वय ६०, रा. टेंभी अंतरवाली, ता. घनसावंगी), कोमल अंकित शिंदे (वय २८, रा. बीड), बसचालक सारंग काकासाहेब ढोले (वय ५२, रा. अंबड), दुसरा बसचालक संजय कोंडीराम ठोसर (वय ४०, रा. बीड) सुषमा सतीश पाचगे (वय ४०, रा. मुंबई), निलेश चंद्रकांत देशमुख (वय ४०, रा. जालना), आक्रम अहमद (रा. राजस्थान), स्वाती अभिमन्यू कांबळे (रा. बीड), जगन्नाथ मनोहर रोटे (रा. धाकलगाव), मनोहर गणपतराव घार्गे (रा. बीड) सुनिता स्वप्निल दाबाडे (रा. जालना), रेखा स्वप्निल दाभाडे (रा. जालना), विद्या रामेश्वर वाहुळ (रा. अंबड) अन्य एक जण अशी जखमींची नावे असून या सर्वांवर अंबड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करुन जालना येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. जखमीमध्ये दिशा गाडगे, शोभाबाई कुलभूषण घडे, विद्या लक्ष्मण गिते (रा. जालना), दिपक निवृत्ती सांगळे यांच्यासह अनेक जणांवर अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून अनेक जखमी खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

Web Title: An accident involving two st buses has occurred in ambad taluka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2026 | 01:01 PM

Topics:  

  • Accident News
  • Bus Accident
  • maharashtra

संबंधित बातम्या

Carrom Tournament : राज्य मानांकन स्पर्धेत सोनाली कुमारीची अंबिका हरिथवर पुन्हा मात
1

Carrom Tournament : राज्य मानांकन स्पर्धेत सोनाली कुमारीची अंबिका हरिथवर पुन्हा मात

Accident News: शहीद पित्याला अखेरचा निरोप देण्यासाठी निघाला मुलगा; वाटेतच रुग्णवाहिकेला भीषण अपघात, चौघांचा मृत्यू!
2

Accident News: शहीद पित्याला अखेरचा निरोप देण्यासाठी निघाला मुलगा; वाटेतच रुग्णवाहिकेला भीषण अपघात, चौघांचा मृत्यू!

Accident News: दुचाकीवरून चौघे निघाले होते घरी; पाठीमागून ट्रेलर आला अन् पती-पत्नीसह चिमुकल्याचा मृत्यू
3

Accident News: दुचाकीवरून चौघे निघाले होते घरी; पाठीमागून ट्रेलर आला अन् पती-पत्नीसह चिमुकल्याचा मृत्यू

Navarashtra Impact: नवराष्ट्राच्या बातमीची दखल; शिवसैनिकांच्या दणक्यानंतर रामलीला गार्डनमध्ये आता रोज पोलिसांची गस्त
4

Navarashtra Impact: नवराष्ट्राच्या बातमीची दखल; शिवसैनिकांच्या दणक्यानंतर रामलीला गार्डनमध्ये आता रोज पोलिसांची गस्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.