Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 7 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे हादरलं! ग्राहकाचा भाजी विक्रेत्यावर चाकूने हल्ला; सपासप वार केले अन्…

भाजी खरेदी करताना झालेल्या वादातून ग्राहकाने भाजी विक्रेत्यावर चाकूने वार केल्याची घटना खडकीतील संजय गांधी भाजी मंडईत घडली आहे. मनोज स्वामी (रा. इंदिरानगर, खडकी) असे गु्न्हा दाखल केलेल्या ग्राहकाचे नाव आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 05, 2025 | 04:29 PM
पुणे हादरलं! ग्राहकाचा भाजी विक्रेत्यावर चाकूने हल्ला; सपासप वार केले अन्...

पुणे हादरलं! ग्राहकाचा भाजी विक्रेत्यावर चाकूने हल्ला; सपासप वार केले अन्...

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता भाजी खरेदी करताना झालेल्या वादातून ग्राहकाने भाजी विक्रेत्यावर चाकूने वार केल्याची घटना खडकीतील संजय गांधी भाजी मंडईत घडली आहे. मनोज स्वामी (रा. इंदिरानगर, खडकी) असे गु्न्हा दाखल केलेल्या ग्राहकाचे नाव आहे. या हल्ल्यात भाजी विक्रेते शौकत बाबामियाँ (वय ३६) गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शौकत यांचा खडकीतील संजय गांधी भाजी मंडईत भाजी विक्रीचा व्यवसाय आहे. मनोज मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास भाजी खरेदीसाठी आला. भाजी खरेदी करताना मनोजने त्यांच्याशी वाद घातला. बाचाबाचीतून त्याने चाकूने शौकत यांचा गळा आणि चेहऱ्यावर चाकूने वार केला. गंभीर जखमी झालेल्या शौकत यांना मंडईतील भाजी विक्रेत्यंनी रुग्णालयात दाखल केले. मनोज पसार झाला असून, अधिक तपास सहायक निरीक्षक अर्जुन बेंदगुडे करत आहेत.

हें सुद्धा वाचा : मुलाच्या प्रेमाची शिक्षा बापाला; मुलीच्या भावाच्या भयानक कृत्याने पुणे हादरलं!

जेलमधून बाहेर आला अन् तिघांना तोडला

गेल्या काही दिवसाखाली कारागृहात राहून आलेल्या सराईत गुन्हेगार व त्याच्या साथीदारांनी तीन तरुणांवर किरकोळ वादातून तीक्ष्ण शस्त्राने वार करून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना मुंढवा परिसरात घडली. एक महिन्यापुर्वीच सराईत कारागृहातून बाहेर आला होता. याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात महेश गजसिंह उर्फ दाद्या उर्फ डी याच्यासह दोन ते तीन अनोळखी साथीदारांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या हल्यात अजय हनुमंत पवार (वय ३१), अमित राजेश परदेशी (वय २६) व सोहेश अलमले (वय २६) हे तिघे जखमी झाले आहेत. याबाबत तुषार मेमाणे (वय २८) यांनी तक्रार दिली आहे.

कोथरूडमध्ये भरदिवसा तरूणाचा खून

पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पुण्यातील वेगवेगळ्या भागातून दररोज गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता कोथरूड भागातील शास्त्रीनगर येथे सागर कॉलनी परिसरात तरूणाचा चार अल्पवयीन मुलांनी पालघन सारख्या धारदार हत्यारांनी डोक्यात तसेच मानेवर व हातावर वार करून निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. भरदिवसा घटना घडल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. आशिष दशरत जाधव (वय ३५) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

Web Title: An incident has come to light that a person attacked a vegetable seller with a knife in pune nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2025 | 04:28 PM

Topics:  

  • Arrested
  • cmomaharashtra
  • crime news
  • maharashtra
  • Pune Crime
  • Pune Police

संबंधित बातम्या

Driving License Rules: मोठी बातमी! ड्रायव्हिंग लायसन्ससाठी राज्यात नवा नियम; १ ऑगस्टपासून ‘डोमिसाइल सर्टिफिकेट’ बंधनकारक
1

Driving License Rules: मोठी बातमी! ड्रायव्हिंग लायसन्ससाठी राज्यात नवा नियम; १ ऑगस्टपासून ‘डोमिसाइल सर्टिफिकेट’ बंधनकारक

दूध भेसळ प्रकरणाचे अहिल्यानगर कनेक्शन उघड; राहुरीचे तीन, तर वाळकीच्या एकावर गुन्हा दाखल
2

दूध भेसळ प्रकरणाचे अहिल्यानगर कनेक्शन उघड; राहुरीचे तीन, तर वाळकीच्या एकावर गुन्हा दाखल

Ashadhi Ekadashi 2026: विठुरायाचे दर्शन होणार सुलभ! वारकऱ्यांची सोय; १२९.४८ कोटींचे दर्शन मंडप व नवीन स्काय वॉक
3

Ashadhi Ekadashi 2026: विठुरायाचे दर्शन होणार सुलभ! वारकऱ्यांची सोय; १२९.४८ कोटींचे दर्शन मंडप व नवीन स्काय वॉक

रक्षकच बनले भक्षक, लोणावळा हायवेवर पोलिसांकडून पर्यटकांचे अपहरण; स्मार्ट वॉचमुळे झाला पर्दाफाश
4

रक्षकच बनले भक्षक, लोणावळा हायवेवर पोलिसांकडून पर्यटकांचे अपहरण; स्मार्ट वॉचमुळे झाला पर्दाफाश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.