Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sambhajinagar Murder : पत्नीला शिवीगाळ केल्याचा राग अनावर; मित्राचे डोके झाडावर आपटून हत्या

कांचनवाडी परिसरातील वुडरीज स्कूललगतच्या मोकळ्या मैदानात तिघा मित्रांनी मिळून राजू किसन वंजारी (३३, रा. गौतमनगर) यांना बेदम मारहाण करत त्यांचे डोके झाडावर आपटले. गंभीर जखमी झालेल्या राजू यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 02, 2026 | 11:42 AM
पत्नीला शिवीगाळ केल्याचा राग अनावर; मित्राचे डोके झाडावर आपटून हत्या

पत्नीला शिवीगाळ केल्याचा राग अनावर; मित्राचे डोके झाडावर आपटून हत्या

Follow Us
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर : दारू पितांना पत्नीला शिवीगाळ केल्याच्या कारणावरून झालेला किरकोळ वाद एका मजुराच्या निघृण हत्येपर्यंत जाऊन पोहोचला आहे. कांचनवाडी परिसरातील वुडरीज स्कूललगतच्या मोकळ्या मैदानात तिघा मित्रांनी मिळून राजू किसन वंजारी (वय ३३, रा. गौतमनगर) यांना बेदम मारहाण करत त्यांचे डोके झाडावर आपटले. गंभीर जखमी झालेल्या राजू यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला आहे. या प्रकरणी सातारा पोलिसांनी काही तासांत तपास पूर्ण करत तिन्ही आरोपींना अटक केली आहे.

 

मृताचे वडील किसन बापुराव वंजारी (वय ६६) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सोमवारी रात्री राजू वंजारी हे मित्र पांडुरंग काळूबा गायकवाड (४०), युवराज गोरक्ष गायकवाड (३८) आणि सोनू सर्जेराव गव्हाणे (३४, सर्व रा. काश्मीरनगर) यांच्यासह वुडरीज स्कूललगतच्या मोकळ्या मैदानात झाडाखाली बसून दारू पित होते. मद्यधुंद अवस्थेत पत्नीला शिवीगाळ केल्याच्या कारणावरून त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. काही क्षणांतच वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. तिघांनी मिळून राजू यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यांचे डोके झाडावर जोरात आपटल्याने ते जागीच बेशुद्ध पडले. घटना घडल्यानंतर संशय टाळण्यासाठी आरोपींनी राजू यांना दुचाकीवरून त्यांच्या घरी आणून सोडले. डोक्यातून रक्त येत असल्याचे पाहून वडील किसन वंजारी यांनी त्यांची नाडी तपासली असता श्वास बंद झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर आरोपींनीच त्यांना प्रथम खासगी रुग्णालयात आणि नंतर घाटी रुग्णालयात नेले. मात्र, तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यावेळी आरोपींपैकी एकाने घडलेला प्रकार सांगितल्याने संशय अधिक बळावला.

हे सुद्धा वाचा : गरिबाला सिंह यांच्या घरी चोरी; सीसीटीव्हीत कैद झाले ३ संशयित, पोलिसांचा तपास सुरू

कुटुंबाचा आधार हरपला

मूळ नांदेड जिल्ह्यातील राजू वंजारी गेल्या सुमारे २५ वर्षांपासून छत्रपती संभाजीनगरात मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन लहान मुले तसेच वृद्ध आई-वडील असा परिवार आहे. आई गेल्या दोन वर्षांपासून पक्षाघातामुळे अंथरुणाला खिळून असून पत्नी मोलमजुरी करून संसाराला हातभार लावत आहे. कमावता मुलगा गमावल्याने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून कांचनवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

हे सुद्धा वाचा : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठी घडामोड; चेतन चौधरीने लोहगडावर केलं सीन रिक्रिएशन, पुतळा दरीत ढकलला

Web Title: An incident has occurred in chhatrapati sambhajinagar where a man was murdered by his own friend

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2026 | 11:41 AM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Murder Case

संबंधित बातम्या

पिंपळे गुरवमध्ये मालमत्तेच्या वादातून रक्तरंजित थरार; सावत्र नातवाने केली आजीची हत्या
1

पिंपळे गुरवमध्ये मालमत्तेच्या वादातून रक्तरंजित थरार; सावत्र नातवाने केली आजीची हत्या

फुटपाथवर मृतदेह आढळला, अकस्मात मृत्यूची नोंद; तपासात २१ वर्षीय तरुणाच्या हत्येचा धक्कादायक उलगडा
2

फुटपाथवर मृतदेह आढळला, अकस्मात मृत्यूची नोंद; तपासात २१ वर्षीय तरुणाच्या हत्येचा धक्कादायक उलगडा

अहिल्यानगरमधील खून प्रकरणात मोठी अपडेट! २४ तासांत दोघे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
3

अहिल्यानगरमधील खून प्रकरणात मोठी अपडेट! २४ तासांत दोघे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

धक्कादायक ! जमिनीच्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांची हत्या; आई, भावासह, पुतण्याला संपवले
4

धक्कादायक ! जमिनीच्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांची हत्या; आई, भावासह, पुतण्याला संपवले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.