संग्रहित फोटो
पलाश ऊर्फ गन्नी प्रकाश वासनिक (वय ३१, रा. रामबाग) असे मृताचे नाव आहे. आयुष धुपे हा मुख्य आरोपी असून तो पलाशचा सख्खा मेहुणा असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याच्यासोबत आणखी तीन जण या हत्येत सहभागी असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पलाश गुरुवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास मेडिकल चौकातून जात होता. त्यावेळी आयुष धुपे हा तीन साथीदारांसह तेथे आला. आरोपींनी पलाशला अडविले. त्यानंतर त्यांच्यात जुन्या वादातून बाचाबाची सुरू झाली. काही वेळातच वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. संतापलेल्या आरोपींनी पलाशवर धारदार शस्त्रांनी सपासप वार केले. गंभीर जखमी झाल्याने पलाशचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपींनी तेथून पळ काढला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. डीसीपी दीपक अग्रवाल, डीसीपी रश्मिता राव, एसीपी नरेंद्र हिवरे यांच्यासह अजनी आणि हुडकेश्वर पोलिसांची पथके दाखल झाली. पोलिसांनी परिसरातील गर्दीवर नियंत्रण मिळवत घटनास्थळाची पाहणी केली. तसेच पुरावे संकलित करण्यासाठी फॉरेन्सिक पथकालाही पाचारण करण्यात आले.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला आहे. अजनी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून, पसार झालेल्या चारही आरोपींचा शोध सुरू आहे. हत्या नेमक्या कोणत्या जुन्या वादातून झाली, याबाबत पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे.
हे सुद्धा वाचा : ‘माझ्याशी लग्न कर, नाहीतर…’; तरुणाची तरुणीला धमकी; शिवीगाळ करत मारहाण
ऐन दिवाळीत छत्रपती संभाजीनगरमध्ये गुन्हेगारीचा कहर!
दिवाळीच्या उत्सवात शहरात सर्वत्र आनंद आणि रोषणाईचे वातावरण असताना दुसरीकडे किरकोळ वादातून चाकू, कोयते आणि लोखंडी शस्त्रांनी हल्ले करण्याच्या आठ घटनांनी छत्रपती संभाजीनगर शहर हादरले आहे. या घटनांमुळे मोठी खळबळ उडाली आहे.






