Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आठवीच्या विद्यार्थिनीची गणवेशाच्या ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या; हरसूल परिसरात खळबळ

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील काथवडपाडा येथील अवघ्या १३ वर्षांच्या विद्यार्थिनीने राहत्या घरी शाळेच्या गणवेशाच्या ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची अत्यंत दुर्दैवी व धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 05, 2026 | 11:52 AM
आठवीच्या विद्यार्थिनीची गणवेशाच्या ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या; हरसूल परिसरात खळबळ

आठवीच्या विद्यार्थिनीची गणवेशाच्या ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या; हरसूल परिसरात खळबळ

Follow Us
Follow Us:

नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील काथवडपाडा येथील अवघ्या १३ वर्षांच्या विद्यार्थिनीने राहत्या घरी शाळेच्या गणवेशाच्या ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची अत्यंत दुर्दैवी व धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे हरसूल व बोरीपाडा परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात असून सर्वत्र शोककळा पसरली आहे. लावण्या लहुदास भोंडवे (वय १३, रा. काथवडपाडा, पो. देवडोंगरा, ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लावण्या ही बोरीपाडा येथील सरकारी आदिवासी आश्रमशाळेत इयत्ता आठवीच्या वर्गात शिक्षण घेत होती. सध्या शाळेत चाचणी परीक्षा सुरू आहे. सामान्यतः आश्रमशाळेतील इतर विद्यार्थी तेथेच मुक्कामी राहून अभ्यास करतात; मात्र घर जवळ असल्याने लावण्या ही दररोज शाळेतून घरी ये-जा करत असे. गुरुवारी (दि. ३) सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास शाळेतून घरी परतल्यानंतर लावण्याने काथवडपाडा येथील राहत्या घरी छताच्या वास्याला शाळेच्या ड्रेसच्या ओढणीने गळफास लावून घेतला. कुटुंबीयांच्या ही बाब निदर्शनास येताच त्यांनी तत्काळ आरडाओरड करत तिला खाली उतरवले आणि उपचारासाठी हरसूल येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणी करून तिला मृत घोषित केले.

हे सुद्धा वाचा : अमली पदार्थांच्या पैशातून उभारलेली 55 लाखांची मालमत्ता गोठवली; पुणे जिल्ह्यात 2026 मधील पहिलीच कारवाई

आत्महत्येचे कारण अद्यापही गुलदस्त्यात

हरसूल आरोग्य केंद्रात रात्रीच्या वेळी शवविच्छेदन करण्याची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे, शुक्रवारी (दि. ४ सप्टेंबर) सकाळी शवविच्छेदन उरकून मृतदेह शोकाकुल नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. ऐन परीक्षेच्या काळात आणि लहान वयात मुलीने एवढे टोकाचे पाऊल का उचलले, या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समोर येऊ शकलेले नाही. मोलमजुरी करणाऱ्या पालकांच्या मुलीने आत्महत्या का केली, याचा शोध हरसूल पोलीस घेत आहेत. याप्रकरणी तिचे वडील लहुदास कृष्णा भोंडवे (वय ३५, व्यवसाय- मजुरी, रा. काथवडपाडा) यांनी दिलेल्या खबरीवरून हरसूल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस उपनिरीक्षक वडघुले हे या घटनेचा पुढील अधिक तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा : मंडळ कितीही मोठे असो, कर्णकर्कश डिजे वाजवलात तर…; पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांचा इशारा

Web Title: An incident has occurred in nashik district where an eighth grade girl committed suicide

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2026 | 11:52 AM

Topics:  

  • crime news
  • Student

संबंधित बातम्या

Chandrapur Crime : राखी बांधून बहिणी निघाल्या अन् भावानेच केला भावाचा घात; मटण करीवरून झाला होता वाद
1

Chandrapur Crime : राखी बांधून बहिणी निघाल्या अन् भावानेच केला भावाचा घात; मटण करीवरून झाला होता वाद

प्रसिद्ध गायकाचा धक्कादायक अंत! 4-5 दिवसांनी कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, बेडभोवती रक्ताचे डाग अन्…
2

प्रसिद्ध गायकाचा धक्कादायक अंत! 4-5 दिवसांनी कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह, बेडभोवती रक्ताचे डाग अन्…

Vidyanand Bapat: विद्यानंद बापट यांच्यावरील हल्ला प्रकरण; संतोष चव्हाणला कोर्टाने थेट…
3

Vidyanand Bapat: विद्यानंद बापट यांच्यावरील हल्ला प्रकरण; संतोष चव्हाणला कोर्टाने थेट…

Srushti Death Case: सृष्टी मृत्यू प्रकरणानंतर रयत संस्था ॲक्शन मोडमध्ये; 200 विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा फेरआढावा
4

Srushti Death Case: सृष्टी मृत्यू प्रकरणानंतर रयत संस्था ॲक्शन मोडमध्ये; 200 विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा फेरआढावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.