Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाजप नगरसेविकेच्या नणंदेची आत्महत्या, पतीसह चौघांवर गुन्हा दाखल; धक्कादायक कारणही समोर

माहेरहून पैसे आणण्यासाठी तसेच वडीलोपार्जित मालमत्तेत हिस्सा मिळवण्यासाठी सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या सततच्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून एका ४२ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 27, 2026 | 04:57 PM
भाजप नगरसेविकेच्या नणंदेची आत्महत्या, पतीसह चौघांवर गुन्हा दाखल; धक्कादायक कारणही समोर

भाजप नगरसेविकेच्या नणंदेची आत्महत्या, पतीसह चौघांवर गुन्हा दाखल; धक्कादायक कारणही समोर

Follow Us
Follow Us:

पिंपरी : माहेरहून पैसे आणण्यासाठी तसेच वडीलोपार्जित मालमत्तेत हिस्सा मिळवण्यासाठी सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या सततच्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून एका ४२ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना वाकड गुरुवारी (२७ ऑगस्ट) मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास ईशान सोसायटी येथील प्रथम बंगल्यात उघडकीस आली आहे. मयत विवाहिता वाकड येथील भाजपा नगरसेविकेच्या नणंद होत्या.

शिल्पा सचिन गवारे (वय ४२) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी मृत महिलेचे भाऊ संतोष गुलाब कलाटे (वय ४७, रा. दत्तमंदिर रोड, वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पती सचिन उत्तम गवारे, सासरा उत्तम शिवराम गवारे, सासू संजीवनी उत्तम गवारे आणि दीर संदीप उत्तम गवारे (सर्व रा. ईशान सोसायटी, वाकड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची बहीण शिल्पा हिचा विवाह सन २००९ मध्ये सचिन गवारे याच्याशी झाला होता. लग्नाच्या वेळी सासरच्या लोकांनी सचिन याच्यावर पूर्ववैमनस्यातून झालेल्या एका खून प्रकरणात केस सुरू असल्याचे लपवून ठेवले होते. लग्नानंतर सचिनला या खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली आणि तो सुमारे चार वर्षे कारागृहात होता. लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस व्यवस्थित गेल्यानंतर सासरच्या मंडळींनी शिल्पा हिच्याकडे माहेरहून पैसे आणण्यासाठी आणि तिच्या वडिलांच्या जमिनीच्या मालमत्तेत हिस्सा मिळवण्यासाठी तगादा लावण्यास सुरुवात केली. पती सचिन याला दारूचे व्यसन होते, तर सासू संजीवनी ही चारित्र्यावर संशय घेऊन सचिनचे कान भरत असे, ज्यावरून सचिन तिला बेदम मारहाण करत असे. “तुझ्या बापाच्या मालमत्तेच्या कागदपत्रांवर सह्या करू नकोस आणि आम्हाला मालमत्तेत हिस्सा दे,” अशी धमकी देऊन तिचा सतत मानसिक व शारीरिक छळ केला जात होता.

बहिणीचा संसार टिकवण्यासाठी फिर्यादी संतोष कलाटे यांनी वेळोवेळी सासरच्या लोकांच्या मागण्या पूर्ण करत त्यांना रोख रक्कम दिली, तसेच व्यवसायात व प्लॉट खरेदीतही आर्थिक मदत केली. मात्र, काही दिवसांपूर्वी शिल्पा हिने तिच्या भावांना मालमत्तेच्या कागदपत्रांवर सह्या दिल्याचे समजताच सासरच्यांनी तिला पुन्हा त्रास देण्यास सुरुवात केली. गुरुवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास शिल्पा हिने बेडरूममधील सिलिंग फॅनला साडीच्या साहाय्याने गळफास घेतल्याची माहिती सासरच्यांनी तिच्या माहेरी दिली. तिला खाजगी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत घोषित केले. दरम्यान, बेडरूमचा दरवाजा उघडा ठेवून गळफास घेतल्याचे आरोपी सांगत असल्याने, तिच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करत पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणीही फिर्यादी यांनी केली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

हे सुद्धा वाचा :  दारु पिऊन येऊन मांसाहारी जेवण मागितल्याचा राग; मारहाण करून बापाने मुलाला संपवलं

Web Title: An incident has occurred in wakad where a woman committed suicide by hanging herself

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2026 | 04:57 PM

Topics:  

  • crime news
  • Pimpri Crime
  • Sucide News

संबंधित बातम्या

जुन्नर तालुक्यात मध्यरात्री टोळक्याचा धुमाकूळ, वाहनांची तोडफोड; महिलेलाही मारहाण
1

जुन्नर तालुक्यात मध्यरात्री टोळक्याचा धुमाकूळ, वाहनांची तोडफोड; महिलेलाही मारहाण

प्रशिक्षणार्थी PSI पतीकडून विवाहितेचा छळ, पिस्तूल दाखवून धमकावल्याचा आरोप; नेमकं प्रकरण काय?
2

प्रशिक्षणार्थी PSI पतीकडून विवाहितेचा छळ, पिस्तूल दाखवून धमकावल्याचा आरोप; नेमकं प्रकरण काय?

पोलिसावर अधिकाऱ्यावर तलवार अन् दगडाने जीवघेणा हल्ला; फरार मुख्य आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात
3

पोलिसावर अधिकाऱ्यावर तलवार अन् दगडाने जीवघेणा हल्ला; फरार मुख्य आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात

केज तालुक्यात खळबळ! प्रियकराच्या मुलानेच केली महिलेची हत्या; मृतदेह पुरला अन्…
4

केज तालुक्यात खळबळ! प्रियकराच्या मुलानेच केली महिलेची हत्या; मृतदेह पुरला अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.