Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यातून अपहरण करुन सांगलीत एकाचा खून; धक्कादायक कारणही आलं समोर

नात्यातील महिलेच्या मोबाइलवर मेसेज पाठविल्याने झालेल्या वादातून एकाचे पुण्यातून अपहरण करुन सांगलीत खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी आंबेगाव पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 16, 2026 | 02:29 PM
पुण्यातून अपहरण करुन सांगलीत एकाचा खून; धक्कादायक कारणही आलं समोर

पुण्यातून अपहरण करुन सांगलीत एकाचा खून; धक्कादायक कारणही आलं समोर

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये दहशत पसरत आहे. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. नात्यातील महिलेच्या मोबाइलवर मेसेज पाठविल्याने झालेल्या वादातून एकाचे पुण्यातून अपहरण करुन सांगलीत खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी आंबेगाव पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

गोविंद माधवराव उपासे (वय ५९, रा. गोकुळनगर, वारजे माळवाडी) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी तातोबा उर्फ वैभव अर्जुन केंगार (वय २८, सध्या रा. आंबेगाव बुद्रुक, मूळ रा. बेळंखी, ता. जत, जि. सांगली), राहुल राजेंद्र बाबर (वय २५, रा. बेळंखी, ता. जत, जि. सांगली), रोहन जयसिंग सावंत (वय २३, रा. येतगाव, ता. कडेगाव, जि. सांगली) यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत रोहित गोविंद उपासे (वय ३५, रा. तपोधाम, वारजे माळवाडी) यांनी आंबेगाव पोलिसांत तक्रार दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, गोविंद उपासे हे ९ ऑगस्ट रोजी रात्री आठच्या सुमारास मित्रांबरोबर सिंहगड रस्ता भागातील धायरी येथे जेवायला गेले होते. जेवण करुन ते रात्री घरी आले. त्यानंतर मध्यरात्री दोनच्या सुमारास उपासे यांच्या मोबाइल क्रमांकावर आरोपींनी संपर्क साधला. मित्रांबरोबर जाऊन येतो, असे सांगून ते घरातून दुचाकी घेऊन बाहेर पडले. त्यानंतर उपासे घरी परतले नाही. वडील बेपत्ता झाल्यानंतर मुलगा जयवंत याने वडील बेपत्ता झाल्याची तक्रार नांदेड सिटी पोलीस ठाण्यात ११ ऑगस्ट रोजी दिली. सांगली शहरातील शामराव नगरमधील घोड्याच्या तबेल्याजवळ भांडणे सुरू असल्याची माहिती १२ ऑगस्ट रोजी सांगली शहर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी केंगार, बाबर, सावंत यांना ताब्यात घेतले. चौकशीत तिघा आरोपींनी पुण्यातून गोविंद उपासे यांचे अपहरण केल्याचे सांगितले. उपासे यांना मारहाण करुन मृतदेह कडेगावातील कालव्यात टाकून दिला, तसेच त्यांची दुचाकी कात्रजमधील आंबेगाव परिसरात लावल्याचे आरोपींनी सांगितले.

या घटनेची माहिती सांगली शहर पोलिसांनी नांदेड सिटी पोलिसांना दिली. पोलिसांनी तपास सुरु केला. तेव्हा उपासे यांना मारहाण करुन मोटारीत घेऊन तिघे आरोपी पसार झाल्याचे सीसीटीव्ही चित्रीकरणात आढळून आले. आंबेगाव परिसरातून त्यांचे अपहरण केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर कडेगाव पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. संबंधित गुन्हा पोलिसांनी आंबेगाव पोलिसांकडे तपासासाठी सोपविला. ‘या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. नात्यातील एका महिलेला मोबाइलवर मेसेज पाठविल्याने आरोपींनी खून केल्याची माहिती तपासात मिळाली आहे’, अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक शरद झिने यांनी दिली. सहायक निरीक्षक भोजलिंग दोडमिसे तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा  : नोकरीत भागेना, बहाद्दराने काढला ड्रग्जचा कारखाना; पोलिसांना सुगावा लागला अन्…

Web Title: An incident has occurred in which a person from pune was murdered in sangli

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2026 | 02:29 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Murder Case

संबंधित बातम्या

चिखलोली न्यायालय परिसरात अपहरणाचा प्रयत्न भोवला! तिघांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
1

चिखलोली न्यायालय परिसरात अपहरणाचा प्रयत्न भोवला! तिघांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नोकरीत भागेना, बहाद्दराने काढला ड्रग्जचा कारखाना; पोलिसांना सुगावा लागला अन्…
2

नोकरीत भागेना, बहाद्दराने काढला ड्रग्जचा कारखाना; पोलिसांना सुगावा लागला अन्…

क्षुल्लक भांडणाचा भयंकर शेवट; पत्नीचा मृत्यू, आईला फोन लावला अन् घाबरलेल्या पतीनेही उचलले टोकाचे पाऊल
3

क्षुल्लक भांडणाचा भयंकर शेवट; पत्नीचा मृत्यू, आईला फोन लावला अन् घाबरलेल्या पतीनेही उचलले टोकाचे पाऊल

नागपुरात हत्येचा थरार; पूर्ववैमनस्यातून तरुणाची धारदार शस्त्राने सपासप वार करून हत्या
4

नागपुरात हत्येचा थरार; पूर्ववैमनस्यातून तरुणाची धारदार शस्त्राने सपासप वार करून हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.