Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Sucide : बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांची गळफास घेऊन आत्महत्या; व्हिडीओत रविंद्र धंगेकरांचं घेतलं नाव

पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यात एका बांधकाम व्यावसायिकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. माजी आमदार रविंद्र धंगेकर यांच्या पत्नीसोबत या व्यवसायिकाची भागिदारी होती.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 16, 2026 | 04:16 PM
बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांची गळफास घेऊन आत्महत्या; व्हिडीओत रविंद्र धंगेकरांचं घेतलं नाव

बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांची गळफास घेऊन आत्महत्या; व्हिडीओत रविंद्र धंगेकरांचं घेतलं नाव

Follow Us
Follow Us:

पुणे : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यात एका बांधकाम व्यावसायिकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. माजी आमदार रविंद्र धंगेकर यांच्या पत्नीसोबत या व्यवसायिकाची भागिदारी होती. खलील शेख असं या बांधकाम व्यावसायिक आणि कंत्राटदार असलेल्या व्यक्तीचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी तयार केलेल्या व्हिडीओमध्ये खलील शेख यांनी माजी आमदार रविंद्र धंगेकर यांचं नाव घेतलं आहे.

 

पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावरील वक्फ बोर्डाच्या जमिनीवर बांधकाम प्रकल्प उभारण्यासाठी रविंद्र धंगेकरांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांच्यासह आणखी चार भागिदारांनी मिळून उत्कर्ष असोसिएट नावाची कंपनी स्थापन केली होती. या कंपनीत मनसेचे माजी नगरसेवक बाळा शेडगे यांच्यासह खलील या बांधकाम व्यावसायिकाचा देखील समावेश होता. वक्फ बोर्डाची जागा विकत घेऊन त्या जागेवर बांधकाम सुरू करण्यात आले होते. त्यासाठी बँकांकडून कर्जे घेण्यात आली होती.

कर्जबाजारी झाल्याने आत्महत्या करतोय

वक्फ बोर्डाकडून स्थगिती मिळाल्यानंतर सदर प्रकरण न्यायालयात पोहोचलं. पण पुन्हा बांधकाम सुरू होऊ शकलं नाही. त्यामुळे कर्जबाजारी झालेल्या खलील याने गुलटेकडी भागातील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याआधी तयार केलेल्या व्हिडीओमध्ये त्याने कर्जबाजारी झाल्याने आत्महत्या करत असल्याचं खलील शेख यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर आर्थिक अडचणींकडे रविंद्र धंगेकर दुर्लक्ष करत असल्याचं देखील खलील शेख व्हिडीओमध्ये म्हणाले आहेत.

आत्महत्या करण्याआधी खलील शेख व्हिडीओमध्ये म्हणाले की, विविध कारणामुळे मी कर्जबाजारी झालो असून, त्यामुळे मी आत्महत्येचा निर्णय घेतला आहे. तसेच या आर्थिक संकटाला काही व्यक्ती कारणीभूत असल्याचा आरोप करत त्यांनी उत्कर्षा कंपनीच्या पार्टनर रविंद्र धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर, बाळासाहेब शेडगेंच्या पत्नी, सुनील आहेरांचा मुलगा, हमीद शेख यांचा मुलगा आणि रघु गावडे यांची नावे व्हिडिओत घेतली आहेत. खलील शेख यांनी आपल्याला ५० लाख रुपये भागिदारांकडून येणे असल्याचे व्हिडीओत म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा : रक्षकच झाला भक्षक! पोलिसानेच केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग; मुलगी आरोपीच्या घरी गेली अन् त्याने…

रविंद्र धंगेकर काय म्हणाले?

विविध कर्जजास्त झाल्यामुळे खलील शेख यांनी आत्महत्या केली. ही जागा वक्फची आहे असं आम्हाला पत्र आलं, प्रोजेक्ट थांबवा असं सांगण्यात आलं. मी अधिकाऱ्यांना सांगितलं की, तुम्ही जी कारवाई करताय याने अनेकजण आत्महत्या करतील त्यात मी सुध्दा त्यात असेल असं ते बोलले. वक्फ बोर्डाचा आणि त्या जागेचा काही संबंध आता राहिला नाही. थांबलेल्या कामांमुळे हा प्रोजेक्ट ढासाळला, असं रविंद्र धंगेकरांनी सांगितले.

Web Title: An incident has occurred in which pune based real estate developer khalil shaikh committed suicide

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2026 | 04:16 PM

Topics:  

  • pune news
  • Ravindra Dhangekar
  • Sucide News

संबंधित बातम्या

पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांचे उपोषण अखेर मागे, परंतु मागण्या पूर्ण झाल्या नाहीतर… विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा
1

पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांचे उपोषण अखेर मागे, परंतु मागण्या पूर्ण झाल्या नाहीतर… विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

पुण्यात खेळाडूंचा बोलबाला! अवघ्या २५ मिनिटांत सामना जिंकला; प्रणव मंजुनाथची सेमीफायनलमध्ये धडक
2

पुण्यात खेळाडूंचा बोलबाला! अवघ्या २५ मिनिटांत सामना जिंकला; प्रणव मंजुनाथची सेमीफायनलमध्ये धडक

Table Tennis: दोन गेममध्ये पराभव मात्र शानदार पुनरागमन; अनन्या पाटीलने मिळवले अजिंक्यपद
3

Table Tennis: दोन गेममध्ये पराभव मात्र शानदार पुनरागमन; अनन्या पाटीलने मिळवले अजिंक्यपद

मुलाच्या अपघाती मृत्यूनंतर खचलेल्या वडिलांचा गळफास घेऊन मृत्यू; लोणी काळभोरमधील घटना
4

मुलाच्या अपघाती मृत्यूनंतर खचलेल्या वडिलांचा गळफास घेऊन मृत्यू; लोणी काळभोरमधील घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.