संग्रहित फोटो
पुणे : बाणेर टेकडीवर पुन्हा फिरण्यास आलेल्यांना चोरट्यांनी लक्ष केले असून, कोरियातील अभियंता तरुणाला चोरट्यांनी लुटल्याची प्रकार घडला आहे. त्याला धमकावून त्याच्याकडील महागडा मोबाइल हिसकावून नेला आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध बाणेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत ४२ वर्षीय अभियंता तरुणाने तक्रार दिली आहे.
तक्रारदार तळेगाव दाभाडे येथील एका वाहन निर्मिती करणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपनीत अभियंता आहेत. ते मूळचे कोरियातील असून, सध्या बालेवाडी परिसरात सहकाऱ्यांसोबत राहतात. ते शनिवारी (१७ मे) सकाळी बाणेर टेकडीवर फिरायला गेले होते. त्यावेळी तिघांनी त्यांना अडवले. त्यांना धमकावून त्यांच्याकडील ७२ हजारांचा मोबाइल हिसकावून नेला. घटनेनंतर त्यांनी बाणेर पोलिसांत धाव घेऊन तक्रार दिली. वरिष्ठ निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे. दरम्यान, अद्याप चोरट्यांचा थांगपत्ता लागलेला नाही.
पिस्टलसारखे हत्यार दाखवून लुटले
पुण्यातून मुंबईकडे जाण्यासाठी पॅसेंजर कार मध्ये बसल्यानंतर कार चालकानेच ताथवडे परिसरात नेहून पिस्टलसारखे हत्यार दाखवून लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिसांत संतोष गिरी (वय ४१) यांनी तक्रार दिली आहे. त्यानूसार, अज्ञातावर गुन्हा नोंदवला आहे. तक्रारदार एनडीए गेट येथे राहण्यास आहेत. कामानिमित्त ते मुंबईकडे जात असताना हा प्रकार घडला.