Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पोलिसाच्या मारहाणीनंतर थेट कोमात, शुद्धीवर आल्यानंतर गुन्हा दाखल; नेमकं काय घडलं?

एका पोलीस कर्मचाऱ्याने कारचालकाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घडना घडली आहे. त्याला बेशुद्ध होईपर्यंत बेदम मारहाण करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 29, 2026 | 01:12 PM
गर्भलिंग निदान प्रकरणात २५ लाखांची डील अन् ५.५ लाख घेताना दोन दलाल ACBच्या जाळ्यात; डॉक्टरने केला पोलिसांचाच गेम

गर्भलिंग निदान प्रकरणात २५ लाखांची डील अन् ५.५ लाख घेताना दोन दलाल ACBच्या जाळ्यात; डॉक्टरने केला पोलिसांचाच गेम

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली असून, दररोज वेगवेगळ्या भागात खून, खुनाचा प्रयत्न, मारहाण यासारख्या घटना घडत आहेत. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भिती निर्माण होत आहे. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. कुटूंबियाला देवदर्शनास घेऊन गेल्यानंतर एसटी स्थानकावर पोलिस कर्मचारी व पत्नीमध्ये वाद झाला आणि त्याने पत्नीला मारहाण सुरू केली. तेव्हा त्यांचा वाद पाहून एकाने हा वाद सोडविण्यासाठी मध्ये उडी घेतली. त्यावेळी पोलीस अंमलदाराने त्याला बेशुद्ध होईपर्यंत बेदम मारहाण करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे.

तो कारचालक तब्बल अडीच महिने रुग्णालयात बेशुद्ध अवस्थेत होता. तो नुकताच शुद्धीवर आला आणि त्यानंतर त्याने करमाळा पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात आता गुन्हा दाखल होऊन आरोपी पोलिसाला अटक झाली आहे. त्याच्यावर अटकेची कारवाई झाल्यानंतर या पोलिस अंमलदाराला पोलीस खात्यातून निलंबितही करण्यात आले आहे. अमित सुरेश जाधव (वय ४२, रा. भवानी पेठ) असे या पोलिसाचे नाव आहे. त्याला पोलिस खात्यातून निलंबीत करण्यात आले आहे. पोलिस उपायुक्त पी.आर पाटील यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. याबाबत शुभम चंद्रकांत भोसले (वय २७,रा. मंगळवार पेठ) यांनी करमाळा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, शुभम भोसले हे चालक म्हणून काम करतात. ३१ मे २०२६ रोजी ते, त्यांचा मित्र प्रथमेश चव्हाण यांची इर्टिका गाडी घेऊन अमित जाधव यांच्या कुटुंबातील त्यांची पत्नी, आई, बहिण व दोन मुलांसह देवदर्शनासाठी घेऊन गेले होते. काही ठिकाणी फिरुन रात्री साडेनऊ वाजता ते करमाळा एस टी बसस्थानकाजवळ चहा, नाष्टा करण्यासाठी थांबले. सुरेश जाधव हा अचानक चिडला. त्याने त्याच्या पत्नीशी वाद घातला त्यांना मारहाण सुरू केली. हा प्रकार पाहून शुभम व त्याचा भाचा प्रथमेश त्यांची भांडणे सोडवण्याचा खूप वेळ प्रयत्न करु लागले. परंतु, अमित ऐकत नव्हता. त्यांची भांडणे सोडविताना त्याने शुभम यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळ करु लागला. बाजुला पडलेल्या झाडाच्या काठीने शुभम यांच्या हातावर जोरात मारले. त्यानंतर पायावर, डोक्यात काठी मारल्याने ते खाली पडले. डोक्यात काठी मारल्यामुळे डोक्यातून रक्तस्त्राव होऊन ते बेशुद्ध पडले. करमाळा येथे उपचार घेतल्यानंतर त्यांना पुण्यात उपचारासाठी दाखल केले होते.

हे सुद्धा वाचा : जुन्या किरकोळ कारणावरून तरुणाचा खून, आईने आरडाओरड केली पण…; नांदेड जिल्ह्यातील घटनेनं खळबळ

Web Title: An incident has occurred where a police brutally beat up a car driver

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2026 | 01:12 PM

Topics:  

  • Arrested News
  • CM Devedra Fadnavis
  • crime news

संबंधित बातम्या

वाघोलीत तरुणावर टोळक्याचा हल्ला; मैत्रिणीसोबतचा वाद मिटवण्यासाठी बोलावले अन्…
1

वाघोलीत तरुणावर टोळक्याचा हल्ला; मैत्रिणीसोबतचा वाद मिटवण्यासाठी बोलावले अन्…

लोणावळ्यात बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश; २० जणांना अटक, ३६.४१ लाखांचा मुद्देमाल जप्त
2

लोणावळ्यात बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश; २० जणांना अटक, ३६.४१ लाखांचा मुद्देमाल जप्त

गणेशोत्सवातील गर्दीत भक्तांचे दागिने चोरणारी टोळी जेरबंद; तब्बल २३ लाखांचा मुद्देमाल जप्त
3

गणेशोत्सवातील गर्दीत भक्तांचे दागिने चोरणारी टोळी जेरबंद; तब्बल २३ लाखांचा मुद्देमाल जप्त

Sunil Tatkare : शेतकऱ्यांच्या ५ हजारांच्या मदतीवर तटकरे नाराज; मुख्यमंत्र्यांची घेणार भेट, अर्थमंत्री पदावरूनही केलं मोठं वक्तव्य
4

Sunil Tatkare : शेतकऱ्यांच्या ५ हजारांच्या मदतीवर तटकरे नाराज; मुख्यमंत्र्यांची घेणार भेट, अर्थमंत्री पदावरूनही केलं मोठं वक्तव्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.