संग्रहित फोटो
गोंदिया : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली असून, दररोज वेगवेगळ्या भागात खून, खुनाचा प्रयत्न, मारहाण यासारख्या गंभीर घटना घडत आहेत. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भिती निर्माण होत आहे. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. गोरेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चोपा येथे शाळेतील किरकोळ वादातून दोन विद्यार्थ्यांवर चाकूने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात दोन्ही विद्यार्थी जखमी झाले असून, याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
मिळालेल्या माहितीनुसार, महेंद्र रतीराम कोहले (वय १६, रा. मोहगाव/टिल्ली) याला जेवणाच्या सुटीत एका तरुणाने धक्का दिला. यावेळी दोघांमध्ये झालेल्या वादातून संबंधित तरुणाने महेंद्रला शिवीगाळ केली. यादरम्यान, शाळा सुटल्यानंतर त्यांनी आणि त्याचा मित्र खुमेश पुरुषोत्तम मेश्राम हे घरी परतत होते. ते चो पा गावाजवळ आले असता एका अल्पवयीन मुलाने त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात तो आणि मित्र हे दोघेही जखमी झाले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस करीत आहे.
हे सुद्धा वाचा : शिरूर हादरलं! नोकरीचे आमिष दाखवून तरुणीवर सामूहिक बलात्कार; हॉटेलमध्ये नेले अन्…
गुन्हा दाखल केल्याच्या रागातून वृद्धाचा निर्घृण खून
लातूर जिल्ह्यात दाखल झालेल्या बलात्काराच्या गुन्ह्याचा राग मनात धरून तरुणाने साथीदारांच्या मदतीने तरुणीच्या वडिलांचा खून केल्याची गंभीर घटना मुखेड तालुक्यातील लादगा शिवारात घडली आहे. या प्रकरणातील पसार झालेल्या तीन प्रमुख आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड आणि मुखेड पोलिसांच्या पथकाने अवघ्या पाच तासांत ताब्यात घेतले आहे. दापका राजा येथील किशन राजकुमार जोगदंड (वय २२) याच्याविरुद्ध काही दिवसांपूर्वी लातूर जिल्ह्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाचा राग मनात धरून किशन जोगदंड याने आपल्या दोन साथीदारांसह संगनमत केले. त्यानंतर २० ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ११ वाजता लादगा शिवारातील शेतात फिर्यादीचे वडील बाबूपुंडलिक गायकवाड (वय ६०) यांच्यावर हल्ला करून त्यांचा जागीच खून केल्याचे पोलिसांनी सांगितले. हल्ल्यावेळी आरोपींनी फिर्यादीच्या आईच्या तोंडावर चाकूने वार करून तिलाही गंभीर जखमी केले.






