Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पार्टीसाठी पैसे न दिल्याचा राग अनावर! मित्राकडून १८ वर्षीय तरुणावर चाकूने सपासप वार; डोळ्यांवरही केला हल्ला

राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली असून, अशातच आता पार्टी देण्यासाठी पैसे नसल्याचे सांगितल्याचा राग मनात धरून मित्रानेच १८ वर्षीय तरुणाच्या छातीत चाकू खुपसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 13, 2026 | 12:06 PM
पार्टीसाठी पैसे न दिल्याचा राग अनावर! मित्राकडून १८ वर्षीय तरुणावर चाकूने सपासप वार; डोळ्यांवरही केला हल्ला

पार्टीसाठी पैसे न दिल्याचा राग अनावर! मित्राकडून १८ वर्षीय तरुणावर चाकूने सपासप वार; डोळ्यांवरही केला हल्ला

Follow Us
Follow Us:
  • पार्टीसाठी पैसे न दिल्याचा राग अनावर
  • १८ वर्षीय तरुणावर चाकूने सपासप वार
  • डोळ्यांवरही केला हल्ला
छत्रपती संभाजीनगर : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली असून, दररोज वेगवेगळ्या भागात खून, खुनाचा प्रयत्न, मारहाण यासारख्या घटना घडत आहेत. अशातच आता पार्टी देण्यासाठी पैसे नसल्याचे सांगितल्याचा राग मनात धरून मित्रानेच १८ वर्षीय तरुणाच्या छातीत चाकू खुपसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यानंतर उपचारासाठी घाटीत नेण्याचा बहाणा करून त्याला हमालवाड्यातील मोकळ्या मैदानात नेले. तेथे त्याच्या डोळ्यात चाकू खुपसत पाठ व शरीरावर वार करुन गंभीर जखमी केले आहे.

 

रक्तबंबाळ अवस्थेत तरुणाने दुचाकीस्वाराकडून लिफ्ट घेवून घाटी रुग्णालय गाठले. ही घटना १० ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी अल्पवयीन यश हिवराळे आणि त्याच्या तीन साथीदारांविरुद्ध हर्सल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणात सय्यद इम्रान सय्यद गफूर (३७, रा. जहांगीर कॉलनी, हसुल) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादीचा मुलगा फैजान सय्यद ईमान (वय १८, रा. जहांगीर कॉलनी, हर्सल) हा शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास कपडे खरेदीसाठी सिटी चौकाकडे जात होता. एकतानगर, हसूल येथील सानिया मेडिकलजवळ त्याचा मित्र यश हिवराळे थांबलेला होता. यशने फैजानला जवळ बोलावून बऱ्याच दिवसांपासून पार्टी दिली नसल्याचे म्हणत पैशांची मागणी केली. फैजानने पैसे नसल्याचे सांगताच यशने शिवीगाळ करून वाद घातला. पार्टी दे, नाहीतर येथेच खतम करतो, अशी धमकी देत त्याच्या छातीत चाकू खुपसला. छातीतून रक्तस्राव सुरू झाल्यानंतर यशने फैजानला घाटीत नेतो, असे सांगितले. त्याच्यासोबत असलेल्या अन्य तीन मित्रांनी फैजानला दुचाकीवर बसवले; मात्र घाटीकडे नेण्याऐवजी त्याला रेल्वे पटरीजवळील हमालवाड्यातील मोकळ्या मैदानात नेले.

हे सुद्धा वाचा : नागरिकांनो, पाणी जपून वापरा! धरणांत अवघा ६.४४ टक्के पाणीसाठा; पुढील १० महिने पाणी जपून वापरण्याचे आवाहन

डोळ्यात खुपसला चाकू 

मैदानात यश हिवराळे याच्यासह त्याच्या तीन साथीदारांनी फैजानला खाली पाडले. पार्टी न दिल्याच्या कारणावरून त्याच्या उजव्या डोळ्यात चाकू खुपसला, तसेच पाठ व शरीरावर वार केले. त्यानंतर त्याला तेथेच सोडून चौघे हल्लेखोर तेथून पळून गेले. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

Web Title: An incident involving an attack on a young man has occurred in sambhajinagar nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2026 | 12:03 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Sambhajinagar Crime

संबंधित बातम्या

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात; दुचाकीच्या अपघातात सख्ख्या भाऊ-बहिणीचा मृत्यू
1

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात; दुचाकीच्या अपघातात सख्ख्या भाऊ-बहिणीचा मृत्यू

सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठ डॉक्टर महिलेची फसवणूक; APK फाईल पाठवली अन्…
2

सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठ डॉक्टर महिलेची फसवणूक; APK फाईल पाठवली अन्…

शिक्षणाच्या प्रांगणात विद्यार्थिनींची सुरक्षा वाऱ्यावर? Pune University मध्ये ‘त्या’ रात्री नेमके काय घडले?
3

शिक्षणाच्या प्रांगणात विद्यार्थिनींची सुरक्षा वाऱ्यावर? Pune University मध्ये ‘त्या’ रात्री नेमके काय घडले?

दुचाकीवरून जाताना तरुणावर अचानक कत्तीने हल्ला, गेवराईत खळबळ; नेमकं काय घडलं?
4

दुचाकीवरून जाताना तरुणावर अचानक कत्तीने हल्ला, गेवराईत खळबळ; नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.