Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे जिल्हा परिषदेच्या सभेतच तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न; अंगावर पेट्रोल ओतून घेतले अन्…

पुणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेदरम्यान सोमवारी एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणीने भरसभेत अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 28, 2026 | 11:46 AM
पुणे जिल्हा परिषदेच्या सभेतच तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न; अंगावर पेट्रोल ओतून घेतले अन्...

पुणे जिल्हा परिषदेच्या सभेतच तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न; अंगावर पेट्रोल ओतून घेतले अन्...

Follow Us
Follow Us:

पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेदरम्यान सोमवारी एक धक्कादायक घटना घडली आहे. बारामती येथील जिल्हा परिषद सदस्यावर लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत एका तरुणीने भरसभेत अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, उपस्थित पोलीस आणि सुरक्षारक्षकांनी प्रसंगावधान राखून तिला तत्काळ रोखल्याने मोठा अनर्थ टळला.

 

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सुरू असताना विविध विषयांवर चर्चा सुरू होती. त्याचवेळी संबंधित तरुणी अचानक सभागृहात आली आणि सोबत आणलेले पेट्रोल अंगावर ओतून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे सभागृहात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, तेथे तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी आणि सुरक्षारक्षकांनी तत्काळ हस्तक्षेप करून तिला ताब्यात घेतल्याने संभाव्य दुर्घटना टळली.

सदस्य नसलेली व्यक्ती सभागृहात आली कशी?

ही घटना सर्वसाधारण सभा सुरू असलेल्या सभागृहात घडली, त्यामुळे या सभागृहाची सदस्य नसलेली त्रयस्थ व्यक्ती सभागृहात आलीच कशी, असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येत असून, त्यातही पेट्रोल सारख्या ज्वलनशील द्रव्यासह ही तरुणी सभागृहात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सुरक्षेसंदर्भातही गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

न्याय मिळत नसल्याने उचलले पाऊल

या तरुणीने बारामती येथील जिल्हा परिषद सदस्यावर गंभीर आरोप केले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या सदस्याने लग्नाचे आश्वासन देत आपली फसवणूक केल्याचा दावा तिने केला. वारंवार पाठपुरावा करूनही न्याय मिळाला नाही आणि प्रशासनाकडूनही दखल घेतली जात नसल्याने उद्विग्न होऊन हे टोकाचे पाऊल उचलल्याचे तिने पोलिसांना सांगितले आहे.

हे सुद्धा वाचा : नात्यांना काळिमा! दोन मुलांनीच आई-वडिलांचा गळा आवळून केला खून; 12 तासांत पोलिसांनी केला उलगडा

पोलिसांनी चौकशी केली सुरू

दरम्यान, घटनेनंतर सभागृहात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. भरसभेत असा प्रकार घडल्याने सर्वसाधारण सभेला उपस्थित असलेल्या सदस्यांना धक्का बसला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने वातावरण निवळले आणि सर्वसाधारण सभा पुढे सुरू झाली. संबंधित तरुणीला ताब्यात घेऊन पोलिसांनी पुढील चौकशी सुरू केली असून, तिने केलेल्या आरोपांचीही पडताळणी केली जात असल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले.

हे सुद्धा वाचा : YouTube व्हिडिओ पाहून रचला हत्येचा कट, जयपूर पोलिसांनी केला दुहेरी हत्याकांडाचा पर्दाफाश

Web Title: An incident involving a young woman attempting suicide has occurred right during a meeting of the pune zilla parishad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2026 | 11:46 AM

Topics:  

  • crime news
  • Pune Zilla Parishad
  • Sucide

संबंधित बातम्या

Satara Crime: वाईत गावठी पिस्टलचा धसका; दोन आरोपी जेरबंद, दोन पिस्टल आणि पाच जिवंत काडतुसे जप्त
1

Satara Crime: वाईत गावठी पिस्टलचा धसका; दोन आरोपी जेरबंद, दोन पिस्टल आणि पाच जिवंत काडतुसे जप्त

Crime News: HR मीटिंगसाठी गेला अन् बेपत्ता; पाच दिवसांनी हत्येचा उलगडा, जाणुन घ्या नेमकं काय घडलं?
2

Crime News: HR मीटिंगसाठी गेला अन् बेपत्ता; पाच दिवसांनी हत्येचा उलगडा, जाणुन घ्या नेमकं काय घडलं?

सासवडमध्ये पोलिसांची मोठी कारवाई, गावठी पिस्टलसह तरुण ताब्यात; तब्बल 7 लाख 35 हजारांचा मुद्देमाल जप्त
3

सासवडमध्ये पोलिसांची मोठी कारवाई, गावठी पिस्टलसह तरुण ताब्यात; तब्बल 7 लाख 35 हजारांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगरमध्ये २ भयानक घटना! महिलेसह तरुणीवर अत्याचार; वॉशरुमचा दरवाजा ढकलला अन्…
4

अहिल्यानगरमध्ये २ भयानक घटना! महिलेसह तरुणीवर अत्याचार; वॉशरुमचा दरवाजा ढकलला अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.