Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गांजा ओढणाऱ्यांनी रेल्वे पोलिसाचा चाकूने गळा चिरला, छातीवरही सापसप वार; पुण्यातील खळबळजनक घटना

रेल्वे पटरीवर सातत्याने गांजा ओढणाऱ्या तरुणांनी रागातून रेल्वे पोलिसाला (जीआरपीएफ) अडवून गळा चिरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एकाने गळ्यावर तसेच दुसऱ्याने छातीवरून चाकूने वार केले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 08, 2026 | 01:22 PM
गांजा ओढणाऱ्यांनी रेल्वे पोलिसाचा चाकूने गळा चिरला, छातीवरही सापसप वार; पुण्यातील खळबळजनक घटना

गांजा ओढणाऱ्यांनी रेल्वे पोलिसाचा चाकूने गळा चिरला, छातीवरही सापसप वार; पुण्यातील खळबळजनक घटना

Follow Us
Follow Us:
  • गांजा ओढणाऱ्यांनी रेल्वे पोलिसाचा चाकूने गळा चिरला
  • छातीवरही सापसप वार
  • पुण्यातील खळबळजनक घटना
पुणे : रेल्वे पटरीवर सातत्याने गांजा ओढणाऱ्या तरुणांनी रागातून रेल्वे पोलिसाला (जीआरपीएफ) अडवून गळा चिरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एकाने गळ्यावर तसेच दुसऱ्याने छातीवरून चाकूने वार केले. नंतर तिसऱ्याने डोक्यात दगडही घातल्याचे समोर आले आहे. ही घटना उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयासमोरील रस्त्यावरच रात्री साडे आठच्या सुमारास घडली आहे. दरम्यान, पसार झालेल्या आरोपींना बंडगार्डन पोलिसांनी अटक केली. तर दोन अल्पवयीन मुलांना पकडले आहे.

 

अक्षय महादेव बोंबाळे (वय २८, रा. पुणा गेस्ट हाऊस, बुधवार पेठ)  असे गंभीररित्या जखमी झालेल्याचे नाव आहे. रॉकी रणजित पात्रौ तसेच विकी रणजित पात्रौ (रा. रेल्वे कॉर्टर) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. तर, दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

अक्षय बोंबाळे हे रेल्वेचे जीआरपीएफचे कर्मचारी आहेत. त्यांच्याकडे रेल्वे रूळ तसेच इतर परिसरात गस्त व पेट्रोलिंगचे काम आहे. दरम्यान, ते रेल्वे रूळ परिसरात गस्त घालत असताना त्यांना आरोपी हे गांजा ओढताना दिसून आले होते. याबाबत त्यांनी आरोपींना काही वेळा हटकले होते. तसेच, त्यांना हाकलून दिले होते. त्याचा राग आरोपींच्या मनात होता.

दरम्यान, घटनेच्या दिवशी सकाळी देखील त्यांना रेल्वे रूळ परिसरातून हाकलले होते. अक्षय हे कर्तव्यावरून घरी जात असताना आरोपींनी त्यांना साडे आठच्या सुमारास उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयासमोरील रोडवरील ससून हॉस्पिटलच्या फुटपाथजवळ अडवले. दुचाकी अडवून शिवीगाळ सुरू केली. नंतर एकाने तु आईला ‘दारू व गांजा पितो’ हे का सांगितले असे म्हणत वाद घातला. तसेच, आरोपींनी खाली पाडून धारदार चाकूने गळा चिरून व छातीवर वार करून केले. तर एकाने त्याच्या डोक्यात दगड घातला. आरोपींनी अक्षय याच्याजवळील मोबाईल तसेच दीड लाख रुपयांची सोन्याची चैन देखील हिसकावून पोबारा केला.

हे सुद्धा वाचा : दारूच्या नशेत वाद, वॉकर डोक्यात घालून दिव्यांगाची हत्या; संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ

या घटनेची माहिती मिळताच बंडगार्डन पोलिसांच्या तपास पथकाचे प्रमुख सहाय्यक निरीक्षक राहुल पवार, उपनिरीक्षक प्रदीप शितोळे, कर्मचारी ज्ञानेश्वर गायकवाड, महेश जाधव आणि त्यांच्या पथकाने या पसार झालेल्या आरोपींना नाना पेठेतून पकडले. आरोपींच्या हल्यात अक्षय हे गंभीर जखमी झाले आहेत. गळ्यावर ९ टाके पडले असून, छातीवर दोन टाके पडले आहेत. तर त्यांच्या डोक्याला देखील गंभीर मार लागला आहे. अधिक तपास बंडगार्डन पोलिस करत आहेत.

हे सुद्धा वाचा : चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून; पोलिसांनी आरोपीला कर्नाटकातून पकडले

Web Title: An incident involving an attack on a railway police employ has occurred in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2026 | 01:21 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pune Police

संबंधित बातम्या

दारूच्या नशेत वाद, वॉकर डोक्यात घालून दिव्यांगाची हत्या; संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ
1

दारूच्या नशेत वाद, वॉकर डोक्यात घालून दिव्यांगाची हत्या; संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ

Pune Murder : चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून; पोलिसांनी आरोपीला कर्नाटकातून पकडले
2

Pune Murder : चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून; पोलिसांनी आरोपीला कर्नाटकातून पकडले

पत्नीची निर्घृण हत्या! डोके कापून फ्रीजमध्ये ठेवले अन् त्यानंतर शिजवून खाल्ले जेवण; लग्नानंतर काही महिन्यांतच पती बनला हैवान
3

पत्नीची निर्घृण हत्या! डोके कापून फ्रीजमध्ये ठेवले अन् त्यानंतर शिजवून खाल्ले जेवण; लग्नानंतर काही महिन्यांतच पती बनला हैवान

महाराष्ट्रासह मध्यप्रदेशात घरफोडी, सराईताला ठोकल्या बेड्या; तब्बल 25 लाखांचा ऐवज जप्त
4

महाराष्ट्रासह मध्यप्रदेशात घरफोडी, सराईताला ठोकल्या बेड्या; तब्बल 25 लाखांचा ऐवज जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.