Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दारूच्या नशेत वाद, वॉकर डोक्यात घालून दिव्यांगाची हत्या; संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ

टीव्ही सेंटर परिसरातील शॉपिंग कॉम्प्लेक्ससमोर ७५ वर्षीय दिव्यांग भिक्षेकऱ्याची हत्या झाल्याची घटना सोमवारी उघडकीस आली आहे. अकबर ऊर्फ बंटी अजीम पठाण (२३, रा. रशीदपुरा) असे संशयित आरोपीचे नाव आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 08, 2026 | 01:10 PM
दारूच्या नशेत वाद, वॉकर डोक्यात घालून दिव्यांगाची हत्या; संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ

दारूच्या नशेत वाद, वॉकर डोक्यात घालून दिव्यांगाची हत्या; संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ

Follow Us
Follow Us:
  • दारूच्या नशेत वाद
  • वॉकर डोक्यात घालून दिव्यांगाची हत्या
  • संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ
छत्रपती संभाजीनगर : टीव्ही सेंटर परिसरातील शॉपिंग कॉम्प्लेक्ससमोर ७५ वर्षीय दिव्यांग भिक्षेकऱ्याची हत्या झाल्याची घटना सोमवारी उघडकीस आली आहे. दारूच्या नशेवरून झालेल्या वादातून एका तरुणाने वृद्धाच्या डोक्यात त्यांच्याच वॉकरने प्रहार केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत गुन्हे शाखेने अवघ्या काही तासांत संशयिताला अटक केली आहे. अकबर ऊर्फ बंटी अजीम पठाण (२३, रा. रशीदपुरा) असे संशयित आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संशयिताची ओळख पटली

सोमवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास शॉपिंग कॉम्प्लेक्ससमोर वृद्धाचा मृतदेह पडलेला एका नागरिकाच्या निदर्शनास आला. त्याने तत्काळ डायल ११२ वर संपर्क साधून पोलिसांना माहिती दिली. सिडको पोलिस ठाण्याचे निरीक्षक अतुल येरमे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. मध्यवर्ती परिसरातील घटना असल्याने पोलिस उपायुक्त रत्नाकर नवले यांनीही घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. दरम्यान, गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक अमोल देशमुख, विशाल सोनवणे व त्यांच्या पथकाने घटनास्थळ आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. फुटेजच्या आधारे संशयिताची ओळख पटली. त्यानंतर त्याचा शोध घेत पोलिसांनी गणेश कॉलनीतील पंचायत समिती परिसर गाठला आणि अकबर ऊर्फ बंटीला ताब्यात घेतले.

‘त्या’ मृताची ओळख पटेना..!

प्राथमिक चौकशीत अकबर हा नशेच्या आहारी गेलेला असल्याचे समोर आले. रात्रीच्या वेळी त्याचा मृत भिक्षेक-याशी दारुपिण्यावरुन वाद झाला होता. वाद विकोपाला गेल्यानंतर संतापलेल्या अकबरने वृद्धाच्या वॉकरनेच त्यांच्या डोक्यात प्रहार केल्याचे तपासात समोर आले. गंभीर दुखापतीमुळे वृद्धाचा मृत्यू झाला. मृत वृद्धाची अद्याप ओळख पटलेली नाही. सिडको पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून, उत्तरीय तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

तो होता माफीचा साक्षीदार

अकबर ऊर्फ बंटी अजीम पठाण हा सेंट्रिंगचे काम करतो. तो सराईत असून, २०२२ मध्ये टीव्ही सेंटर परिसरात झालेल्या एका खुनाच्या गुन्ह्यात माफीचा साक्षीदार म्हणून समोर आला होता. अन्य एका गुन्ह्यात तो १८ महिने कारागृहात राहून आल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक अमोल देशमुख यांनी दिली.

हे सुद्धा वाचा : चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून; पोलिसांनी आरोपीला कर्नाटकातून पकडले

अशी केली पोलिसांनी अटक

घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी अकबर ऊर्फ बंटीचा शोध सुरू केला. तो कोठे लपण्याची शक्यता आहे, याचा अंदाज घेत पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे गणेशनगरातील पंचायत समिती परिसर गाठला. त्यावेळी अकबर ऊर्फ बंटी हा नशेच्या अवस्थेत एका झाडाखाली झोपलेला आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत सिडको पोलिसांच्या स्वाधीन केले. अशी माहिती सहायक निरीक्षक अमोल देशमुख यांनी ही माहिती दिली.

हे सुद्धा वाचा : महाराष्ट्रासह मध्यप्रदेशात घरफोडी, सराईताला ठोकल्या बेड्या; तब्बल 25 लाखांचा ऐवज जप्त

Web Title: An incident involving the murder of a differently abled person has occurred in sambhajinagar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2026 | 01:09 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Murder Case

संबंधित बातम्या

Pune Murder : चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून; पोलिसांनी आरोपीला कर्नाटकातून पकडले
1

Pune Murder : चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून; पोलिसांनी आरोपीला कर्नाटकातून पकडले

पत्नीची निर्घृण हत्या! डोके कापून फ्रीजमध्ये ठेवले अन् त्यानंतर शिजवून खाल्ले जेवण; लग्नानंतर काही महिन्यांतच पती बनला हैवान
2

पत्नीची निर्घृण हत्या! डोके कापून फ्रीजमध्ये ठेवले अन् त्यानंतर शिजवून खाल्ले जेवण; लग्नानंतर काही महिन्यांतच पती बनला हैवान

महाराष्ट्रासह मध्यप्रदेशात घरफोडी, सराईताला ठोकल्या बेड्या; तब्बल 25 लाखांचा ऐवज जप्त
3

महाराष्ट्रासह मध्यप्रदेशात घरफोडी, सराईताला ठोकल्या बेड्या; तब्बल 25 लाखांचा ऐवज जप्त

दहीहंडी कार्यक्रम अंगलट! पुण्यात नृत्यांगना राधा पाटीलसह तिघांवर गुन्हा दाखल
4

दहीहंडी कार्यक्रम अंगलट! पुण्यात नृत्यांगना राधा पाटीलसह तिघांवर गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.