Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्रासह मध्यप्रदेशात घरफोडी, सराईताला ठोकल्या बेड्या; तब्बल 25 लाखांचा ऐवज जप्त

महाराष्ट्रासह मध्यप्रदेशात घरफोडीचे गुन्हे करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून १६ तोळे दागिने, दुचाकी असा मिळून २४ लाख ३० हजारांचा ऐवज जप्त केला आहे. 

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 08, 2026 | 12:30 AM
महाराष्ट्रासह मध्यप्रदेशात घरफोडी, सराईताला ठोकल्या बेड्या; तब्बल 25 लाखांचा ऐवज जप्त

महाराष्ट्रासह मध्यप्रदेशात घरफोडी, सराईताला ठोकल्या बेड्या; तब्बल 25 लाखांचा ऐवज जप्त

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यासह देशभरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, चोरटे दररोज नागरिकांच्या लाखो रुपयांवर डल्ला मारत आहेत. अशातच आता पुणे ग्रामीण पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे. महाराष्ट्रासह मध्यप्रदेशात घरफोडीचे गुन्हे करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून १६ तोळे दागिने, दुचाकी असा मिळून २४ लाख ३० हजारांचा ऐवज जप्त केला आहे.

दीपक भीमराव दांडगे (वय २५ रा. घुग्री, ता. भैसदेही सध्या रा. कविठा, आचलपूर, अमरावती ) असे अटक केलेल्या सराईताचे नाव आहे. त्याच्याकडून तीन गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत. यापुर्वी त्याच्याविरूद्ध महाराष्ट्रासह मध्यप्रदेशात तब्बल १४ घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. ही कामगिरी पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, शिक्रापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक निरीक्षक राहूल देशमुख, उपनिरीक्षक महेश डोंगरे, उमाकांत कुंजीर व त्यांच्या पथकाने केली आहे.

शिक्रापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोडीची घटना घडली होती. त्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली पथकांकडून चोरट्याचा शोध घेतला जात होता. पोलिसांनी पोलिसांनी घटनास्थळापासून रस्त्यालगत असलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता, तांत्रिक विश्लेषण द्वारे आरोपीचा पत्ता शोधण्यात आला. संबंधित चोरटा आचलपूरमधील कविठामधील असल्याचे स्पष्ट झाले. तो बहिणीकडे राहत असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेसह शिक्रापुर पोलिसांचे पथक आचलपूरला रवाना झाले. त्यानंतर सापळा रचून पथकाने दीपक दांडगे याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपी दांडगेने चोरी केल्याची कबुली दिली. त्याने शिक्रापूरमध्ये दोन, शिरुरमध्ये एकाठिकाणी घरफोडी केल्याचे सांगितले. त्यानुसार त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून १६ तोळे दागिने, दुचाकी असा २४ लाखांवर मुद्देमाल जप्त केला आहे.

हे सुद्धा वाचा : पुणे शहरात वर्षभर डीजेचा दणदणाटच! 8 महिन्यात 14 हजार 392 तक्रारी; तब्बल ‘इतक्या’ गुन्ह्यांची नोंद

वृद्धेचे सोन्याचे दागिने लंपास

‘मावशी, साप आला!’ असे सांगून वृद्ध महिलेला घाबरवत तिच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून नेणाऱ्या टोळीतील एका आरोपीला यवत पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्याच्याकडून चोरीस गेलेले सुमारे सहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे आक्कासाहेब डोरले व काळ्या मण्यांची पोत, तसेच गुन्ह्यात वापरलेली होंडा शाईन मोटारसायकल असा एकूण ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही घटना दौंड तालुक्यातील दापोडी येथे घडली आहे.

Web Title: The pune rural police have arrested a thief who broke into a house and committed theft

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • crime news
  • House Theft
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

दहीहंडी कार्यक्रम अंगलट! पुण्यात नृत्यांगना राधा पाटीलसह तिघांवर गुन्हा दाखल
1

दहीहंडी कार्यक्रम अंगलट! पुण्यात नृत्यांगना राधा पाटीलसह तिघांवर गुन्हा दाखल

स्मार्ट मीटरला ‘चकवा’ देणे पडले महागात, वीजचोरीची १९ प्रकरणे उघडकीस; तब्बल…
2

स्मार्ट मीटरला ‘चकवा’ देणे पडले महागात, वीजचोरीची १९ प्रकरणे उघडकीस; तब्बल…

श्वानाला फेरफटका मारण्यासाठी गेला, अंधारात टोळक्याला हटकलं अन्…; पुण्यातील घटनेनं खळबळ
3

श्वानाला फेरफटका मारण्यासाठी गेला, अंधारात टोळक्याला हटकलं अन्…; पुण्यातील घटनेनं खळबळ

पुणे शहरात वर्षभर डीजेचा दणदणाटच! 8 महिन्यात 14 हजार 392 तक्रारी; तब्बल ‘इतक्या’ गुन्ह्यांची नोंद
4

पुणे शहरात वर्षभर डीजेचा दणदणाटच! 8 महिन्यात 14 हजार 392 तक्रारी; तब्बल ‘इतक्या’ गुन्ह्यांची नोंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.