Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मालकाला संपविण्याची सुपारी, पण कामगाराचा घेतला जीव; कारेगावात जमिनीच्या वादातून हत्या

कामगार हामजा उस्मान शेख (वय ३९) यांनाच मालक समजून त्यांच्या डोक्यात गोळी झाडली. यात शेख यांचा मृत्यू झाला आहे. रांजणगाव पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेने या सुपारी हत्येचा उलगडा केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 06, 2026 | 04:23 PM
मालकाला संपविण्याची सुपारी, पण कामगाराचा घेतला जीव; कारेगावात जमिनीच्या वादातून हत्या

मालकाला संपविण्याची सुपारी, पण कामगाराचा घेतला जीव; कारेगावात जमिनीच्या वादातून हत्या

Follow Us
Follow Us:
  • मालकाला संपविण्याची सुपारी
  • पण कामगाराचा घेतला जीव
  • कारेगावात जमिनीच्या वादातून हत्या
पुणे : जमिनीच्या वादातून वॉटर प्लांट मालकाचा खून करण्यासाठी ५ लाख रुपयांची सुपारी देण्यात आली. त्यापैकी दोन लाख रुपये आगाऊही दिले. मारेकरी प्लांटवर पोहोचले; मात्र, प्लांटमालकाऐवजी त्यांचा कामगार हामजा उस्मान शेख (वय ३९) यांनाच मालक समजून त्यांच्या डोक्यात गोळी झाडली. यात शेख यांचा मृत्यू झाला आहे. रांजणगाव पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेने या सुपारी हत्येचा उलगडा केला असून, पाच जणांना अटक केली आहे.

 

सार्थक संदेश कोहकडे (वय २४), तुषार अजय तोडकर (वय २६), संतोष मधुकर मांजरे (वय ३७), विठ्ठल नवनाथ पिकळे (वय २७) आणि योगेश विलास इडोळे (वय २८) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर, पवन सुरेश हुंडारे, पृथ्वी ऊर्फ भैय्या दत्तू जाधव याचा पोलिस शोध घेत आहेत. ही कामगिरी पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर आणि रांजणगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कुमार कदम यांच्या पथकाने केली आहे.

कारेगाव येथील ‘समु इंटरप्रायजेस अॅक्वा रिच’ या पाण्याच्या प्लांटमध्ये २९ सप्टेंबरला हामजा शेख यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी त्यांच्या पत्नी अविताबी यांनी रांजणगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा आणि रांजणगाव पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू केला. तांत्रिक तपासादरम्यान गुन्ह्यातील संशयित संतोष मांजरे हा उत्तर प्रदेशात पळून गेल्याचे समोर आले. पोलिसांनी त्याचा माग काढत त्याला उत्तर प्रदेशातून ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने खुनामागील कटाची माहिती दिली.

हे सुद्धा वाचा : फोन करून बोलावले अन् कोयत्याने डोक्यात वार, लातुरातील घटनेनं खळबळ; नेमकं काय घडलं?

आरोपी सार्थक कोहकडे याचा वॉटर प्लांटमालक विकास नवले यांच्याशी जमिनीवरून वाद होता. त्यातून कोहकडे याने तुषार तोडकरमार्फत संतोष मांजरे याला सुपारी दिली. त्यापैकी दोन लाख रुपये आगाऊ देण्यात आले होते. मांजरे याने पवन सुरेश हुंडारे, पृथ्वी ऊर्फ भैय्या दत्तू जाधव, विठ्ठल पिकळे आणि योगेश इडोळे यांच्या मदतीने प्रत्यक्ष खुनाचा कट रचला. त्यानुसार २९ तारखेला मारेकरी प्लांटवर गेले असता त्यांनी हामजा शेख यांनाच विकास नवले समजले आणि त्यांच्या डोक्यात गोळी झाडली. या प्रकरणातील पवन हुंडारे आणि पृथ्वी जाधव हे फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे.

Web Title: An incident involving the murder of a person over a land dispute has occurred in karegaon nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2026 | 04:20 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Murder Case

संबंधित बातम्या

कारमधून तरुणाचे अपहरण अन् बर्दापूरला नेऊन खून; लातुरातील घटनेने खळबळ
1

कारमधून तरुणाचे अपहरण अन् बर्दापूरला नेऊन खून; लातुरातील घटनेने खळबळ

रक्ताच्या नात्याला काळिमा! प्रॉपर्टीच्या वादातून 83 वर्षीय आजोबांकडून नातवाची हत्या
2

रक्ताच्या नात्याला काळिमा! प्रॉपर्टीच्या वादातून 83 वर्षीय आजोबांकडून नातवाची हत्या

फोन करून बोलावले अन् कोयत्याने डोक्यात वार, लातुरातील घटनेनं खळबळ; नेमकं काय घडलं?
3

फोन करून बोलावले अन् कोयत्याने डोक्यात वार, लातुरातील घटनेनं खळबळ; नेमकं काय घडलं?

टोळक्याचा पोलिसावर दगडाने हल्ला, रक्तबंबाळ अवस्थेत गाठले पोलिस ठाणे; छावणीतील घटनेनं खळबळ
4

टोळक्याचा पोलिसावर दगडाने हल्ला, रक्तबंबाळ अवस्थेत गाठले पोलिस ठाणे; छावणीतील घटनेनं खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.