Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सफाई कर्मचाऱ्याच्या डोक्यात कठीण वस्तू घालून खून, पुण्यातील घटनेनं खळबळ; नेमकं काय घडलं?

पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सफाई कर्मचाऱ्याच्या डोक्यात कठीण वस्तू घालून खून केल्याची घटना वाघोली परिसरात घडली आहे. या प्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 22, 2026 | 12:30 AM
सफाई कर्मचाऱ्याच्या डोक्यात कठीण वस्तू घालून खून, पुण्यातील घटनेनं खळबळ; नेमकं काय घडलं?

सफाई कर्मचाऱ्याच्या डोक्यात कठीण वस्तू घालून खून, पुण्यातील घटनेनं खळबळ; नेमकं काय घडलं?

Follow Us
Follow Us:

पुणे :  राज्यासह देशभरात गुन्हेगारी प्रचंड वाढली असून, दररोज वेगवेगळ्या भागात खून, खुनाचा प्रयत्न, मारहाण यासारख्या घटना घडत आहेत. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भिती निर्माण होत आहे. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सफाई कर्मचाऱ्याच्या डोक्यात कठीण वस्तू घालून खून केल्याची घटना वाघोली परिसरात घडली आहे. या प्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. धीरेंद्र पासवान (वय ३७, मूळ रा. लकुडी निसफराय, जि. गोरखपूर, उत्तर प्रदेश) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सुनील कुमार (वय ३०) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत नितेश राजेंद्र पाटील (वय ३९, रा. गणेशनगर, वडगाव शेरी ) यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, पासवान आणि आरोपी हे खासगी कंपनीकडून वाघोलीतील आव्हाळवाडी भागातील एका संस्थेत सफाई कर्मचारी म्हणून काम करतात. दोघे जण संस्थेच्या आवारातील खोलीत राहायला आहेत. आरोपी आणि पासवान यांच्यात बुधवारी (१९ ऑगस्ट) रात्री वाद झाला. मध्यरात्री आरोपीने पासवान याच्या डोक्यात कठीण वस्तू मारुन त्याचा खून केला. गुरुवारी सकाळी पासवान हा खोलीत रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे निदर्शनास आले. त्याला तातडीने उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच तो मरण पावला होता.परिमंडळ सातचे पोलीस उपायुक्त अबिनाश कुमार यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेला आरोपी मूळचा उत्तर प्रदेशातील असून, त्याचा शोध घेण्यात येत आहे. वरिष्ठ निरीक्षक नंदकुमार गायकवाड तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा : नवी मुंबईत रात्रीचे बार, हॉटेल आणि क्लब बंद? ‘तोंडी आदेश’ नेमका कुणाचा, चर्चांना उधाण

तिकीट विक्री केंद्रात रेल्वे कर्मचाऱ्यावर हल्ला

पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारातील तिकिट विक्री केंद्रातील कर्मचाऱ्यावर चाकूने वार करुन रोकड लुटून नेल्याची प्रकार समोर आला आहे. ही घटना मंगळवारी मध्यरात्री घडली असून, चोरट्यांनी चाकूने वार केल्याने रेल्वे कर्मचारी जखमी झाला आहे. रेल्वे कर्मचाऱ्याच्या गळ्यातील सोनसाखळी, मोबाइल, तसेच तिकिट विक्रीतून जमा झालेली २६ हजारांची रोकड असा ४ लाख ९१ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटून नेला आहे. केल्विन सोलोमन मायला (वय २९, रा. धायरकर कॉलनी, मुंढवा) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांत दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: An incident involving the murder of a sanitation worker has occurred in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • crime news
  • Murder Case
  • Pune Crime

संबंधित बातम्या

गाडीचा कट लागल्याच्या वादातून रक्तरंजित थरार; भरदिवसा ५५ वर्षीय व्यक्तीची चाकूने भोसकून हत्या
1

गाडीचा कट लागल्याच्या वादातून रक्तरंजित थरार; भरदिवसा ५५ वर्षीय व्यक्तीची चाकूने भोसकून हत्या

लग्न झाले असतानाही दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध; लोखंडी पाईपने मारहाण करून एकाची हत्या
2

लग्न झाले असतानाही दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध; लोखंडी पाईपने मारहाण करून एकाची हत्या

Crime News: सायंकाळी गजबजलेल्या रस्त्यावर अचानक हल्ला; ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, आरोपी पसार
3

Crime News: सायंकाळी गजबजलेल्या रस्त्यावर अचानक हल्ला; ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, आरोपी पसार

Buldhana: हत्याकांडप्रकरणात २० जणांना अटक, देऊळगाव राजात नगरसेवकासह दोघांचा खून; दोन्ही गटांतील ४० जणांवर गुन्हा
4

Buldhana: हत्याकांडप्रकरणात २० जणांना अटक, देऊळगाव राजात नगरसेवकासह दोघांचा खून; दोन्ही गटांतील ४० जणांवर गुन्हा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.