
पारनेर तालुक्यातील कडूसमध्ये खळबळ, महिलेचा दगडाने ठेचून खून; कारण...
पारनेर : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली असून, दररोज खून, खुनाचा प्रयत्न, मारहाण यासारख्या घटना घडत आहेत. वाढत्या गुन्हेगारीमुले नागरिकांमध्ये भिती निर्माण होत आहे. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. पारनेर तालुक्यातील कडूस गावच्या परिसरात सकाळी फिरण्यासाठी गेलेल्या ४२ वर्षीय मानसिक आजाराने त्रस्त असणाऱ्या महिलेची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे वाडेगव्हाण, सुपा परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सुपा पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी चार ते पाच जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार उषा पांडुरंग शिंदे (वय ४२ वर्ष) राहणार कडूस गावच्या रहिवासी होत्या. त्यांना दररोज सकाळी गावच्या डोंगर परिसरात फिरण्याची सवय होती. नेहमीप्रमाणे ते सकाळी घरातून फिरण्यासाठी बाहेर पडल्या. दुपारी साडेतीनच्या सुमारास परिसरात गुरे चालत असलेले नामदेव करंजुले यांना कडूस ते पाडळी रांजणगाव मार्गावरील दमान माथा या नावाच्या टेकडीच्या पायथ्याजवळील शेतात उषा शिंदे या रक्ताच्या चारोळ्यात पडलेल्या अवस्थेत दिसून आल्या. त्यांनी तातडीने गावचे सरपंच व पोलिसांना माहिती दिली. सुपा पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना माहिती मिळताच, पोलिस अधिकारी ज्योती गडकरी पुढील तपास करीत आहेत.
पुण्यातील वाघोलीत व्यावसायिकावर गोळीबार
जमीन खरेदी विक्री करणाऱ्या व्यवसायिकावर दुचाकीवरून येऊन गोळीबार करत तिघांनी त्यांच्याकडील ११ लाख रुपये किंमतीचे २२ तोळे वजनाचे सोन्याचे दागिणे लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. व्यावसायिक त्यांच्या कारमध्ये होता तरीही चोरट्यांनी त्यांच्या खिडकीजवळ येऊन गोळी झाडली. गोळीबारात काच फुटून त्यांना लागली. गोळीबारात व्यवसायिक संतोष ज्ञानोबा गावडे (वय ५०, रा. गावडेवाडी, शिरसवाडी, ता. शिरुर) हे जखमी झाले आहेत. त्यांच्या तोंडाला गोळी लागली आहे. त्यांच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी संतोष यांचे चुलत बंधू दत्तात्रय गावडे (वय ५०) यांनी लोणीकंद पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी तिघा अनोळखी चोरट्यांविरुद्ध आर्म ॲक्टनुसार खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना बुधवारी (दि.5) रात्री साडे आठ वाजताच्या सुमारास गावडेवाडी शिरसवाडी येथील पंडीत गावडे यांच्या बंगल्यासमोर घडली आहे.