Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अनैतिक संबंधातून वाद, महिलेचा भरदिवसा खून; पन्हाळा तालुक्यातील घटनेनं खळबळ

काखे (ता. पन्हाळा) येथे अनैतिक संबंधांच्या वादातून एका विवाहीत महिलेचा तिच्याच घराच्या अंगणात धारदार चाकूने सपासप वार करून निघृण खून करण्यात आल्याची थरारक घटना बुधवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 03, 2026 | 11:59 AM
अनैतिक संबंधातून वाद, महिलेचा भरदिवसा खून; पन्हाळा तालुक्यातील घटनेनं खळबळ

अनैतिक संबंधातून वाद, महिलेचा भरदिवसा खून; पन्हाळा तालुक्यातील घटनेनं खळबळ

Follow Us
Follow Us:
  • अनैतिक संबंधातून वाद
  • महिलेचा भरदिवसा खून
  • पन्हाळा तालुक्यातील घटनेनं खळबळ
वारणानगर : काखे (ता. पन्हाळा) येथे अनैतिक संबंधांच्या वादातून एका विवाहीत महिलेचा तिच्याच घराच्या अंगणात धारदार चाकूने सपासप वार करून निघृण खून करण्यात आल्याची थरारक घटना बुधवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. पूजा अविनाश दाभाडे (वय ३३, रा. काखे) असे मृत महिलेचे नाव असून, सुरेश मधुकर दाभाडे (वय ३५) याने हा हल्ला केला आहे. भरदिवसा घडलेल्या या रक्तरंजित प्रकारामुळे काखे परिसरासह संपूर्ण पन्हाळा तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.

बुधवारी दुपारी पूजा दाभाडे या घरात एकट्याच असताना आरोपी सुरेश दाभाडे तिथे आला. जुन्या अनैतिक संबंधांच्या कारणावरून दोघांमध्ये तीव्र वाद झाला. संतापाच्या भरात सुरेशने सोबत आणलेल्या धारदार चाकूने पूजा यांच्यावर अंगणातच अंधाधुंद वार केले. पूजा यांचा आरडाओरडा ऐकून शेजारी धावून आले असता, आरोपी सुरेश घटनास्थळावरून तातडीने पसार झाला.

नातेवाइकांनी फोडले पोलिसांवर खापर

मयत पूजा काही महिने आरोपी सुरेश सोबत बाहेरगावी राहिली होती. दरम्यान, आरोपी सुरेश हा सराईत गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून वारणानगर कामगार कॉलनीतील चोरीसह त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी आधीच त्याच्या मुसक्या आवळल्या असत्या, तर आज हा अनर्थ घडला नसता, असा थेट आरोप करत नातेवाइकांनी रुग्णालयातच पोलिसांवर खापर फोडले.

हे सुद्धा वाचा : पुण्यात मध्यरात्री पोलिसांची धडक कारवाई; संतोष पंडितांना अटक, ‘हीच आमची लायकी’ म्हणत मोबाईल-बेल्ट कुटुंबीयांकडे दिला

मृतदेह न घेण्याचा नातेवाईकांचा पवित्रा

जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा नातेवाइकांनी घेतल्यामुळे रुग्णालयाच्या परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच कोडोली पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची दोन विशेष पथके तातडीने रवाना करण्यात आली आहेत. कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते, पुढील तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसूटगे करत आहेत.

मारहाण करून बापाने मुलाला संपवलं

दारूच्या आहारी गेलेला मुलगा दररोज वाद घालत असल्याच्या रागातून वडिलांनी मुलाचा गळा आवळून तसेच मारहाण करून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वारजे माळवाडी परिसरात ही घटना घडली असून, याप्रकरणी वडिल तसेच आईला पोलिसांनी अटक केली आहे.  महेश भागवत गायकवाड (वय ३०) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी भाऊ गणेश भागवत गायकवाड (वय ३४) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार भागवत सूर्यभान गायकवाड (वय ६४), पार्वती भागवत गायकवाड (वय ६०) आणि आणखी एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडिल भागवत व आई पार्वती यांना अटक केली आहे.

Web Title: An incident involving the murder of a woman has occurred in panhala taluka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2026 | 11:59 AM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Murder Case

संबंधित बातम्या

मुलीच्या चारित्र्यावर होता संशय; अमृतसरमध्ये बापाने हत्या करून मृतदेह घरामागे पुरला, आईने जेसीबीने खोदकाम करत सत्य केलं उघड
1

मुलीच्या चारित्र्यावर होता संशय; अमृतसरमध्ये बापाने हत्या करून मृतदेह घरामागे पुरला, आईने जेसीबीने खोदकाम करत सत्य केलं उघड

Rahul Gandhi On Delhi Crime: ४७ किमी प्रवास अन् पोलिसांना खबर नाही; दिल्ली सामूहिक बलात्कारावर राहुल गांधींचा घणाघात
2

Rahul Gandhi On Delhi Crime: ४७ किमी प्रवास अन् पोलिसांना खबर नाही; दिल्ली सामूहिक बलात्कारावर राहुल गांधींचा घणाघात

धक्कादायक ! पूजेच्या बहाण्याने विवाहितेवर अत्याचार; बेडरूममध्ये दोष असल्याचे सांगत आत नेलं अन्…
3

धक्कादायक ! पूजेच्या बहाण्याने विवाहितेवर अत्याचार; बेडरूममध्ये दोष असल्याचे सांगत आत नेलं अन्…

अडीच लाख रुपये दे, अन्यथा बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवेन; तरुणीची व्यावसायिकाला धमकी
4

अडीच लाख रुपये दे, अन्यथा बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवेन; तरुणीची व्यावसायिकाला धमकी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.