Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दारु प्यायला बसले, मस्करी झाली अन् नंतर संपवूनच टाकलं; वाई तालुक्यातील खळबळजनक प्रकार

वाई येथील सोनगीरवाडी येथे दारू पीत बसलेल्यांमध्ये मस्करी करत असतानाच झालेल्या वादावादीतून एकाला अमानुषपणे मारहाण करत खून केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दोन जणांना अटक केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 21, 2025 | 01:19 PM
दारु प्यायला बसले, मस्करी झाली अन् नंतर संपवूनच टाकलं; वाई तालुक्यातील खळबळजनक प्रकार

दारु प्यायला बसले, मस्करी झाली अन् नंतर संपवूनच टाकलं; वाई तालुक्यातील खळबळजनक प्रकार

Follow Us
Close
Follow Us:

वाई : राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता सातारा जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. वाई येथील सोनगीरवाडी येथे दारू पीत बसलेल्यांमध्ये मस्करी करत असतानाच झालेल्या वादावादीतून एकाला अमानुषपणे मारहाण करत खून केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात वाई पोलिसांना यश आले असून, या प्रकाराने वाई परिसरात खळबळ माजली आहे.

वाई शहरातील सोनगिरीवाडी येथीलबाभळवनात राज अरुणकुमार सिंग, आणि त्याचे मित्र प्रणित गायकवाड, (वय २५), शाकीरखान (वय २५) असे तिघेजण हे दारू पिण्यासाठी बसले होते. याचवेळी शाकीर राज व प्रणित यांच्यात चेष्टामस्करीतून वाद सुरु झाला. हा वाद बघता बघता विकोपाला गेला आणि त्या रागाच्या भरात प्रणित याने राज याच्या डोक्यात बिअरच्या दोन बॉटल फोडल्या. शाकीर व प्रणित यांनी मिळून बांबूने राज याला जबर मारहाण केली. विनोद याने भांडणे सोडवण्याचा प्रयत्न केला असता त्यालाही मारहाण करण्यात आली. या मारहाणीत राज हा रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडला होता. त्यानंतर प्रणित व शाकीर या दोघांनी तेथून दुचाकीवरून धूम ठोकली. घडलेला प्रकार विनोद याने राजचा भाऊ अश्विनीसिंग याला फोन करून सांगितला. त्यांनतर अश्विनी याने घटनास्थळावर जाऊन राज याला रुग्णवाहिकेतून वाईच्या ग्रामीण रुग्णालय येथे नेले असता तेथील डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

प्रणित गायकवाड व शाकीर खान यांनी राज सिंग याला जबर मारहाण करत त्याचा खून करून पळून गेल्याची तक्रार अश्विनी अरुणकुमार सिंग या महिलेने वाई पोलीस ठाण्यात रात्री २ वाजण्याच्या सुमारास दिली. त्या तक्रारीच्या आधारे परिविक्षाधीन डिवायएसपी श्याम पानेगावकर व सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल गवळी यांनी रात्री २ वाजण्याच्या सुमारास वाईचे डिबी प्रमुख असलेले सुधीर वाळुंज, हवलदार मदन वरखडे, प्रसाद दुदुस्कर,श्रावण राठोड, हेमंत शिंदे, विशाल शिंदे, धिरज नेवसे, विशाल येवले, राम कोळी, नितीन कदम,रुपेश जाधव, गौतम दाभाडे या पथकाला बोलावून वाई शहरातुन बाहेर जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर सापळे लावण्याचे आदेश दिले. वरिष्ठांच्या सुचनेनुसार या पथकाने मांढरदेव घाट, परखंदी घाट अशा ठिकाणचे डोंगररांगा रात्रभर पिंजून काढल्या पण आरोपी काही हाताला लागत नव्हते.

दरम्यान पहाटे घाटात फिरायला येणाऱ्या लोकांना सुधीर वाळुंज यांनी आरोपींचे फोटो दाखवले असता, ते परखंदी घाटाने गेले असल्याचे समजले. अखेर या टिमने डोंगररांगामध्ये लपून बसलेल्या आरोपींना अथक परिश्रम घेवून दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळून त्यांना अवघ्या चार तासातच गजाआड केले. वाई तालुक्यातील नागरिकांसह जिल्हा पोलिस अधिक्षक समीर शेख यांनी वाईच्या डिबी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक करुन अभिनंदन केले आहे. या गंभीर गुन्ह्याचा अधिक तपास वाई पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अमोल गवळी हे करत आहेत.

Web Title: An incident of murder of one person has come to light in y taluka nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2025 | 01:19 PM

Topics:  

  • cmomaharashtra
  • maharashtra
  • Satara Police
  • Vai News

संबंधित बातम्या

Deepak Kesarkar: “निवडणूक आयोगावर आक्षेप घेणाऱ्यांना पराभव डोळ्यासमोर दिसतोय…”, दिपक केसरकर यांची संजय राऊतांवर टीका
1

Deepak Kesarkar: “निवडणूक आयोगावर आक्षेप घेणाऱ्यांना पराभव डोळ्यासमोर दिसतोय…”, दिपक केसरकर यांची संजय राऊतांवर टीका

Narayan Rane: मोठी बातमी! चिपळूणमधील कार्यक्रमात नारायण राणेंना आली भोवळ, कालच दिले होते निवृत्तीचे संकेत
2

Narayan Rane: मोठी बातमी! चिपळूणमधील कार्यक्रमात नारायण राणेंना आली भोवळ, कालच दिले होते निवृत्तीचे संकेत

Maharashtra Elections 2026 : देवरुखमध्ये भाजपचे पोस्टर जाळल्याने खळबळ! “पराभव समोर दिसत असल्याने…”, भाजप नेत्याकडून संताप व्यक्त
3

Maharashtra Elections 2026 : देवरुखमध्ये भाजपचे पोस्टर जाळल्याने खळबळ! “पराभव समोर दिसत असल्याने…”, भाजप नेत्याकडून संताप व्यक्त

HSRP साठी नवा कंत्राटदार; मुदतवाढ नसली तरी कारवाईपासून वाहनधारकांना दिलासा
4

HSRP साठी नवा कंत्राटदार; मुदतवाढ नसली तरी कारवाईपासून वाहनधारकांना दिलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.