अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या नावाने बनावट जाहिरातीद्वारे फसवणूक केल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे. व्हॉट्सअॅप ग्रुपवर बनावट जाहिरात पोस्ट करून आणि आमिष दाखवून मराठा प्रवर्गात नसलेल्या उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात रक्कम उकळलीये. तसेच बनावट कर्ज प्रकरण मंजूर करत अनुदान लाटल्याचे देखील समोर आले आहे. या प्रकरणात सुमारे ५ लाख ६३ हजार १६० रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. ही फसवणूक ५ जणांच्या टोळीने केली आहे. या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Nanded Crime:पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवलं आणि…; दोन मुली आणि दोन ग्राहक आक्षेपार्ह अवस्थेत सापडले
मिळालेल्या माहितीनुसार, १६ डिसेंबर २०२४ पासून आतापर्यंत सातपूरच्या कार्यालयात संशयितांनी संगनमताने महामंडळाच्या संमती शिवाय अध्यक्ष नरेंद्र पाटील यांचे छायाचित्र वापरून ‘अण्णासाहेब पाटील’ नावाचा बनावट व्हॉट्सॲपवर ग्रुप तयार केला. त्या ग्रुपवर संशियतांनी महामंडळाच्या नावाने खोटी जाहिरात बनवून पोस्ट केली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थीना लाभ मिळवून देण्याचे अमिश या तिघांनी दाखवून रक्कम उकळली. १ लाख ८० हजार ५९२ रुपये लाटल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी संशयित आरोपी विश्वजीत गांगुर्डे, मनोज जगताप आणि विश्वास जगताप यांच्याविरुद्ध महामंडळाच्या कार्यालयातील नोकरदार पल्लवी मोरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिस पुढील तपास करत आहे.
साधूच्या वेशात आले, हाताला रक्षा बांधली आणि…; तब्बल २० हजार रुपयांचा ऐवज केला लंपास, नाशिकमधील घटना
नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. साधूंच्या वेशात तीन भामटे आले आणि दीक्षा देण्याच्या बहाण्याने एका महिलेला भुरळ घालून तब्बल २० हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना नाशिकच्या सातपूर अंबड लिंक रॉड परिसरातील पाटील पार्कमधील श्रीकृष्ण मंदिराच्या मागील गल्लीत घडली. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नेमकं काय घडलं?
१० ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. तीन जण साधूच्या वेशात पाटील पार्क परिसरात फिरत होते. त्यांनी भिक्षा मागण्याच्या निमित्ताने एका महिलेशी संपर्क साधला. त्यानंतर त्यांनी महिलेला ‘दीक्षा’ घेण्याचा आग्रह करत, तिचा विश्वास संपादन केला.महिलेला ‘धार्मिक कृतीतून कल्याण होईल’, असे सांगत सुरुवातीला 500 रुपये देण्यास सांगण्यात आले. त्यानंतर “एक किलो तूप आणा”, “चहा पाजा”, अशा मागण्या करत घरातील सदस्यांना गुंतवून ठेवले. दरम्यान, त्या तिघांनी महिलेच्या हातावर ‘रक्षा’ बांधली व तिच्या मनावर प्रभाव टाकत भुरळ घातली.
२० हजार रुपये केले लंपास
त्या महिलेच्या घरात असलेला एकूण २० हजार रुपयांचा ऐवज त्यांनी हातोहात उचलला आणि घटनेनंतर क्षणातच पसार झाले. काही वेळानंतर महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. घटनेची माहिती मिळताच महिलेच्या पतीने तातडीने एमआयडीसी चुंचाळे पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून पंचनामा केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे. ही घटना गजबजलेल्या भागात भरदिवसा घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पिंपरीत अखेर ‘त्या’ कुख्यात गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या; तब्बल 700 हून अधिक CCTV तपासले अन्…