छत्रपती संभाजीनगर: शहानूर मिया दर्गा चौकातील आठवडे बाजाराच्या मैदानात गांजा तस्कराच्या मुसक्या आवळल्या आहेत. जवाहरनगर पोलिसांनी २ लाख १० हजार ६०० रुपयांचा गांजा जप्त केला आहे. हा गांजा तो बंगळुरूला विकण्यासाठी घेऊन जात होता. ट्रॅव्हल्समध्ये बसण्याआधीच पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले. ही कारवाई रविवारी (५ ऑक्टोबर) रात्री साडेनऊच्या सुमारास करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव इरफान पाशा आरीफ पाशा (वय ४२, रा. भंगी कॉलनी, पेन्शन मोहल्ला, दक्षिण बंगळुरू, राज्य कर्नाटक) असे आहे.
कशी केली कारवाई
जवाहरनगर पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली, की निळे शर्ट घातलेला एक व्यक्ती शहानूरमिया दर्गा चौकातून ट्रॅव्हल्सने गांजा घेऊन जाणार आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांनी लगेचच सहकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले. त्यांनी दर्गा चौकातील आठवडे बाजार मैदानावर सापळा लावला. त्री साडेनऊच्या सुमारास संशयित इरफान येताना दिसला. तो पोलिसांना पाहून पळून जाऊ लागला.
पोलिसांनी त्याचा पाठलाग करत काही अंतरावरच त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडील दोन बॅगांमध्ये गांजा मिळून आला. तो हा गांजा बंगळुरू येथे विक्री करण्यासाठी ट्रॅव्हल्सने घेऊन जात होता, अशी कबुली त्याने दिली. त्याच्याकडे १० किलो १७५ ग्रॅम गांजा मिळून आला. पोलिसांनी इरफानविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करत न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
तपास सुरु
ही कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी, सहाय्यक पोलीस आयुक्त मनिष कल्याणकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक लोहकरे, पोलीस उपनिरीक्षक राहुल बिघोत, पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब वाघ, सहायक पोलीस उपनिरीक्षक रमेश जाधव, पोलीस अंमलदार संदीप क्षीरसागर, बनकर, मारोती गोरे, ज्ञानेश्वर शेलार यांनी पार पाडली. असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब वाघ करत आहेत.
मराठवाड्यात अतिवृष्टीने उध्वस्त झालेल्या शेतकऱ्याने संपवले जीवन
छत्रपती संभाजीनगर येथून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. एका अल्पभूधारक शेतकऱ्याने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आत्महत्या निराशातून झाली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय. सुरेश मुळे असे या शेतकऱ्याचे नाव असून वरुड काजी गावातील हा रहिवासी आहे. या घटनेमुळे शेतकऱ्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय.
विजेच्या तीव्र धक्क्याने मायलेकाचा मृत्यू; लाकडावर लावलेली तार तुटून पडली अन्…