Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ashok Kharat Case : अशोक खरातबाबत आणखी एक धक्कादायक माहिती समोर; सरकारी डॉक्टरला सोबत घेऊन…

नाशिकमधील काही नामांकित डॉक्टर तसेच एका महानगरपालिकेच्या डॉक्टरने खरातला मदत केली होती. हे डॉक्टर गर्भपाताच्या गोळ्या देत आणि गंभीर गुंतागुंत झाल्यास गर्भपात करत असत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 24, 2026 | 09:34 AM
Ashok Kharat, ED Action, Nashik News, Money Laundering, Sex Scandal

Ashok Kharat, ED Action, Nashik News, Money Laundering, Sex Scandal

Follow Us
Follow Us:

नाशिक : नाशिक सेक्स स्कँडल प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अशोक खरात याची चौकशी केली जात आहे. भोंदू तांत्रिकाची सुरू असलेली एसआयटी चौकशी अनेक धक्कादायक खुलासे करत आहे. सूत्रांनुसार, अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेला खरात सरकारी डॉक्टरच्या नावाखाली गर्भपाताचे रॅकेटही चालवत होता. तपासात असे उघड झाले आहे की, पीडितांपैकी एकाने सरकारी डॉक्टरच्या मदतीने गर्भपात करून घेतला होता.

मिळालेल्या अहवालानुसार, नाशिकमधील काही नामांकित डॉक्टर तसेच एका महानगरपालिकेच्या डॉक्टरने खरातला मदत केली होती. हे डॉक्टर गर्भपाताच्या गोळ्या देत आणि गंभीर गुंतागुंत झाल्यास गर्भपात करत असत. एसआयटी लवकरच या डॉक्टरांची चौकशी करणार आहे. दरम्यान, महाराष्ट्र पोलिसांनी खरात आणि इतर प्रकरणांविरुद्ध तक्रारींसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी केले आहेत. या क्रमांकांवर दररोज ५ ते ६ कॉल्स येत आहेत.

Ashok Kharat : भोंदू खरातचा पोलिस कोठडीतील मुक्काम वाढला; महिन्यापासून खरात ताब्यात, फलनिष्पत्ती काय?

गेल्या २३ दिवसांत या हेल्पलाईनवर शेकडो कॉल्स आले आहेत. यापैकी बहुतेक महिला आहेत, ज्यांना खरातने दैवी शक्तीच्या आड आपली शिकार बनवले होते. आजपर्यंत, खरातवर लैंगिक शोषण आणि फसवणुकीचे एकूण १५ गुन्हे दाखल झाले आहेत.

अशोक खरातची न्यायालयीन कोठडीत रवानगी

नाशिक न्यायालयाने लैंगिक छळ आणि शोषणाच्या पाचव्या प्रकरणात गुरुवारी खरातला ६ मेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. सरकारवाडा पोलिस ठाण्यात एका ३५ वर्षीय महिलेने बलात्काराची तक्रार दाखल केल्यानंतर १८ मार्च रोजी खरातला अटक करण्यात आली होती. तेव्हापासून, त्याने अनेक महिलांना दैवी शक्ती आणि काळ्या जादूचे ज्ञान देण्याचे आमिष दाखवून त्यांचा लैंगिक छळ केल्याचा आणि मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे.

अशोक खरातच्या अडचणींत वाढ

महिना उलटला, अद्याप पोलीस कोठडी सुटलेली नाही. नाशिकच्या गुन्हेगारी इतिहासातील ही दुर्मिळ व पहिलीच घटना मानावी लागेल. अटकेत असल्यापासून दर चार, दोन दिवसांनी न्यायालयात हजेरी व पोलीस कोठडीत रवानगी जणू काही रूटीन झालेले. त्यामुळे भोंदू खरातची आता पोलीस कोठडीविषयी असलेली भिती नष्ट होण्यास मदत झाली असावी. तसेही त्याची यापुढे सुटका होणे कठीणच. त्यामुळे या खटल्याचा निकाल काय असेल याचा अंदाज बांधणे अधिक सोपे झाले आहे.

Web Title: Another shocking piece of information regarding ashok kharat has come to light

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2026 | 09:34 AM

Topics:  

  • Ashok Kharat
  • crime news
  • Nashik News

संबंधित बातम्या

कर्जवसुलीसाठी महिलेचे थेट अपहरणच केले; नंतर विवस्त्र करून व्हिडिओही बनवला अन्…
1

कर्जवसुलीसाठी महिलेचे थेट अपहरणच केले; नंतर विवस्त्र करून व्हिडिओही बनवला अन्…

बनावट व्यक्ती उभी करून प्लॉट केला नावावर; न्यायालयाच्या आदेशानंतर तीन जणांविरोधात गुन्हा दाखल
2

बनावट व्यक्ती उभी करून प्लॉट केला नावावर; न्यायालयाच्या आदेशानंतर तीन जणांविरोधात गुन्हा दाखल

डोके मुंडवले, निर्वस्त्र करून फिरवले; राजस्थानमध्ये आदिवासी महिला अत्याचार प्रकरणी पतीसह ७ आरोपींना अटक
3

डोके मुंडवले, निर्वस्त्र करून फिरवले; राजस्थानमध्ये आदिवासी महिला अत्याचार प्रकरणी पतीसह ७ आरोपींना अटक

Nanded Crime : नांदेड पोलिस अधीक्षकांची कडक कारवाई; जिल्ह्यातील ८ गुन्हेगार हद्दपार
4

Nanded Crime : नांदेड पोलिस अधीक्षकांची कडक कारवाई; जिल्ह्यातील ८ गुन्हेगार हद्दपार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.