Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ashok Kharat News: ५२ कोटींसह परदेशात पळण्याच्या तयारीत होता; तपासात धक्कादायक खुलासा

Ashok Kharat Nashik Case- अशोक खरातविरोधातील कारवाई आता आणखी तीव्र झाली असून, अंमलबजावणी संचालनालयाने (ED) त्यांना ताब्यात घेतले आहे. महिलांचे कथित लैंगिक शोषण, आर्थिक फसवणूक आणि मनी लाँड्रिंगसंदर्भातील प्रकरणांमध्ये आता मुंबई येथील ईडी कार्यालयाकडून त्यांची सखोल चौकशी केली जाणार आहे.

  • By anuradha sagar
Updated On: May 19, 2026 | 05:15 PM
अशोक खरातच्या अडचणी आणखी वाढणार

अशोक खरातच्या अडचणी आणखी वाढणार

Follow Us
Follow Us:
  • अटक होण्यापूर्वी खरातने संशयास्पद आणि बेनामी खात्यांच्या माध्यमातून कोट्यवधीचे व्यवहार केले
  • ५२ कोटी रुपये काढून परदेशात पळून जाण्याची त्याची योजना
  • परदेशातील आपल्या संपर्काच्या माध्यमातून तिथे कायमचे स्थायिक होण्याची तयारीही केली होती
Ashok Kharat Case Update: नाशिकमधील भोंदू अशोक खरातविरुद्ध सुरू असलेल्या तपासात मोठा खुलासा झाला आहे. अटक होण्यापूर्वी खरातने संशयास्पद आणि बेनामी खात्यांच्या माध्यमातून कोट्यवधीचे व्यवहार केले आणि सुमारे ५२ कोटी रुपये काढून परदेशात पळून जाण्याची त्याची योजना होती, अशी माहिती तपास यंत्रणांच्या हाती लागली आहे. खरातने काळा पैसा पांढरा करण्यासाठी आणि प्राप्तिकर चुकवण्यासाठी बँकिंग नियमांच्या मयदितील त्रुटींचा गैरफायदा घेतला.

याच तंत्राचा वापर करून त्याने मोठी रक्कम छोट्या-छोट्या हिश्श्यांमध्ये विभागून काढून घेतली. सूत्रांनुसार, कोपरगाव येथील सहकारी संस्थेत ६५ संशवास्पद खाती उघडण्यात आली. या खात्यांद्वारे ४ दिवसांत २०० हून अधिक व्यवहारांमधून ५२ कोटी रुपये काढण्यात आले. हे खाते महसूल आणि आरटीओ विभागाशी संबंधित काही कथित सरकारी अधिकारी आणि प्रभावशाली कुटुंबांच्या नावावर उघडण्यात आल्याचेही तपासात समोर आले आहे.

Ashok Kharat Case : अशोक खरातप्रकरणी मोठी अपडेट समोर

प्रत्येक खात्यातून १.९९ लाखांचे व्यवहार

बँकेच्या २ लाख रुपयांच्या मयदिच्या नियमातून सुटण्यासाठी प्रत्येक खात्यातून साधारणपणे १.९९ लाख रुपयांचे व्यवहार करण्यात आले. डिसेंबर २०२५ मध्ये वावी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर, जानेवारी ते मार्च दरम्यान म्हणजेच अटक होण्यापूर्वीच्या काळात हे संपूर्ण आर्थिक नेटवर्क कमालीचे सक्रिय होते. तपास यंत्रणांना असेही आढळले की, एकाच दिवशी अनेक खात्यांमध्ये एकसारख्याच रकमेचे व्यवहार झाले, ज्यामुळे हे एक रॅकेट असल्याचे स्पष्ट होते.

न्यूझीलंड किंवा ऑस्ट्रेलियाला पळ काढण्याचा होता बेत

अशोक खरातने अटकेपासून वाचण्यासाठी न्यूझीलंड किवा ऑस्ट्रेलियाला पळून जाण्याची यौजना आखली होती, असे पोलिस तपासाता उघड झाले आहे.

भारतीय तपास यंत्रणांच्या कचाट्यातून सुटण्यासाठी  परदेशातील आपल्या संपर्काच्या माध्यमातून तिथे कायमचे स्थायिक होण्याची तयारीही केली होती.

सध्या केंद्रीय तपास यंत्रणा या संपूर्ण नेटवर्कची चौकशी करत असून, ज्याच्या नावावर हे बनावट व्यवहार झाले आहेत, त्या सर्व खातेदारांच्या भूमिकेचीही कसून चौकशी केली जात आहे.

Ashok Kharat Case : भोंदू अशोक खरातचा आणखी एक कारनामा उघड

अशोक खरात ईडीच्या ताब्यात

अशोक खरातविरोधातील कारवाई आता आणखी तीव्र झाली असून, अंमलबजावणी संचालनालयाने (ED) त्यांना ताब्यात घेतले आहे. महिलांचे कथित लैंगिक शोषण, आर्थिक फसवणूक आणि मनी लाँड्रिंगसंदर्भातील प्रकरणांमध्ये आता मुंबई येथील ईडी कार्यालयाकडून त्यांची सखोल चौकशी केली जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ईडीने नाशिकमधील आवश्यक न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून अशोक खरात यांना अधिकृतपणे ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना नाशिकहून मुंबईकडे रवाना करण्यात आले. ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना नाशिक मध्यवर्ती कारागृहातून ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबईत नेल्यानंतर अशोक खरात यांना पीएमएलए न्यायालयासमोर हजर केले जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर ईडीकडून त्यांच्या कथित बेनामी मालमत्ता, आर्थिक व्यवहार आणि निधीच्या स्रोतांची चौकशी केली जाणार आहे.

Web Title: Ashok kharat news ashok kharat case nashik fraudster ashok kharat was planning to flee india with 52 crore

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2026 | 05:15 PM

Topics:  

  • Ashok Kharat Case
  • Financial Scam
  • Nashik Crime

संबंधित बातम्या

शासकीय कामात अडथळा, मद्यधुंद तरुणाची पोलिसांना धक्काबुक्की; नेमकं काय घडलं?
1

शासकीय कामात अडथळा, मद्यधुंद तरुणाची पोलिसांना धक्काबुक्की; नेमकं काय घडलं?

आली लहर केला कहर! 112 हेल्पलाईनवर खून झाल्याची माहिती; यंत्रणेला दमवणारा ‘तो’ कॉलर रडारवर
2

आली लहर केला कहर! 112 हेल्पलाईनवर खून झाल्याची माहिती; यंत्रणेला दमवणारा ‘तो’ कॉलर रडारवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.