पत्नीच्या हत्येसाठी पतीला भोगावा लागला तुरुंगवास (File Photo : Crime)
जळगाव जामोद : शहरातील कुरेशी मोहल्ल्यात थकीत वीजबिलाची वसुली करण्यासाठी दोन सहकाऱ्यांसोबत गेलेल्या सहाय्यक अभियंत्याला मारहाण झाली. ही घटना बुधवारी (दि.12) घडली. याविषयीची तक्रार सहाय्यक अभियंत्याने स्थानिक पोलिस ठाण्यात दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, तपास सुरु केला आहे.
शहरात वास्तव्यास असलेले महावितरण जळगाव जामोद येथील सहाय्यक अभियंता किशोर माणिकराव होणे यांना थकीत वीज बिलाची वसुली करत असताना जळगाव शहरातीलच कुरेशी मोहल्ल्यामध्ये शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली. किशोर होणे हे त्यांचे सहकारी संतोष धर्मे, प्रवीण राऊत व खलील खान बिलन खान यांच्यासोबत कुरेशी मोहल्ल्यात बुधवारी (दि. 12) थकीत बिलाची वसुली करत होते. यावेळी त्यांना अनोळखी नंबरवरून सकाळी अकराच्या सुमारास एका मोबाईलवरून फोन आला.
यावेळी समोरील व्यक्तीने माझी लाईट गेली असल्याचे सांगितले. तुम्ही कुठे आहात मला तुम्हाला भेटायचे आहे. त्या इसमास होणे यांनी कुरेशी मोहल्ल्यात असल्याचे सांगितले. थोड्या वेळानंतर आरोपी मोहम्मद असलम मोहम्मद कादर याने कुरेशी मोहल्ल्यामध्ये येऊन शिवीगाळ करत किशोर होणे यांना मारहाण केली व शासकीय कामात अडथळा निर्माण केला.
जाणोरी येथील वीज कर्मचाऱ्यावर हल्ला
वीजपुरवठा खंडित केल्याप्रकरणी तालुक्यातील जाणोरी येथील विवेक हत्तीमारे, संतोष हत्तीमारे यांनी कारंजा येथील वीज मंडळाच्या कार्यालयात जाऊन लाइनमन विशाल बंड यांना शिवीगाळ आणि मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 15) घडली. वीजबील थकीत झाल्याने लाइनमन विशाल बंड यांनी विद्युत ग्राहक विवेक हत्तीमारे यांचा पुरवठा खंडित केला. त्यामुळे या प्रकरणातून विवेक हत्तीमारे आणि संतोष हत्तीमारे यांनी विद्युत कार्यालयात येऊन पुरवठा सुरू करण्यासाठी गेले असता लाईनमन आणि हत्तीमारे यांच्यात वाद झाला आणि त्यातून विवेक हत्तीमारे आणि संतोष हत्तीमारे यांनी कार्यालयात शिवीगाळ आणि मारहाण केल्याप्रकरणात या दोघांवर गुन्हा दाखल केला.