प्रयागराज : उमेश पाल हत्येप्रकरण संपूर्ण उत्तर प्रदेश हा हादरुन गेलं होतं. या प्रकरणातील आरोपी माफिया अतीक अहमदची (atique ahmad) पत्नी शाइस्ता परवीनचा (Shaista Parveen) गेल्या अनेक दिवसापासून शोध सुरू आहे. मात्र, पोलिसांना अद्याप यश आलेलं नाही. प्रयागराजच्या धुमनगंज पोलिसांनी शाइस्ता परवीन हिला फरार घोषित केले आहे. उमेश पाल खून प्रकरणापासून शाईस्ता फरार आहे. पोलिसांनी यापुर्वीच तिच्यावर 50 हजारांचे बक्षीस जाहीर केले होते.
[read_also content=”भाजप आमदाराच्या घरातून सापडला गळफास घेतलेला अल्पवयीन मुलीचा मृतदेह, चर्चांना उधाण! नेमकं प्रकरण काय? https://www.navarashtra.com/crime/minor-girl-dead-body-found-in-bjp-mla-nav-charan-manjhi-in-naba-charan-majhi-nrps-441925.html”]
उमेश पाल हत्येप्रकरणी शाइस्ता परवीन फरार आहे. यूपी पोलिस आणि एसटीएफ अनेक दिवसांपासून शाईस्ताचा शोध घेत होते, मात्र आतापर्यंत दोघांनाही यश आलेलं नाही. सोमवारी, उत्तर प्रदेश पोलिसांनी शाइस्ता परवीनच्या पाडलेल्या घरावर सीआरपीसीच्या कलम 82 अंतर्गत नोटीस चिकटवली. चकिया येथील हे घर जफर अहमद यांच्या नावावर होते. त्याची रजिस्ट्री 7 जानेवारी 2021 रोजी जफरच्या नावावर झाली. अतिकचे वडिलोपार्जित घर पाडल्यानंतर या घरात शाइस्ता आणि तिची मुले राहत होती.
अतिक अहमदच्या हत्येनंतरही शाइस्ता परवीन त्यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी झाली नाहीत. पोलीस अतीक अहमदची पत्नी शाइस्ता आणि त्याचा भाऊ अशरफची पत्नी जैनब यांचा सतत शोध घेत आहेत मात्र अद्यापपर्यंत दोघांचा सुगावा लागलेला नाही. काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की लखनऊमधील एका हॉटेलमध्ये अतिक अहमदच्या बेनानी मालमत्तेबाबत मोठी डील होणार आहे. याबाबत पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकला. या छाप्यात अतिक अहमदचे वकील विजय मिश्रा यांना पोलिसांनी अटक केली. पोलिसांच्या चौकशीत त्याने अनेक महत्त्वाचे खुलासे केले आहेत.
उमेश पाल यांची 24 फेब्रुवारी 2023 रोजी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली होती. या हत्येतील मुख्य आरोपी अतिक अहमद याचा मुलगा असद अहमद याला पोलिसांनी चकमकीत ठार केले. अन्य तीन आरोपींचेही एन्काउंटर झाले आहे. मात्र या खून प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा आरोपी गुड्डू बोंबाज अद्याप फरार आहे. या हत्येमध्ये सहभागी असलेली शाइस्ता परवीनही फरार आहे.