जालना शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका बापाने आपल्या मुलीची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. हत्या केल्यानंतर आत्महत्येचा बनाव देखील रचला आहे. लेकीच्या प्रेमसंबंधाची कुणकुण लागल्याने जन्मदात्या बापाने निर्घृण हत्या केली. एवढेच नाही तर मुलीला चक्क दोरीच्या साहाय्याने अँगलला दोरी बांधून लटकवले. आणि फाशी घेतल्याचा बनाव रचला. एका अज्ञात व्यक्तीने पोलिसांना फोन करून एका मुलीने आत्महत्या केल्याची माहिती दिली. पोलिसांनी सखोल चौकशी करत या हत्येचा उलगडा केला आहे.
आयुष कोमकर खून प्रकरणी मोठी अपडेट; बंडू आंदेकरसह 11 जणांवर थेट…
नेमकं काय प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, जालना येथील दावलवाडी येथे 5 सप्टेंबर रोजी ही धक्कदायक घटना घडली आहे. आपल्या मुलीचे एका मुलासोबत प्रेमप्रकरण चालू आहे. याची कुणकुण मुलीच्या बापाला लागली होती. त्यामुळे आपली गावात आणि समाजात बदनामी होईल, या भीतीपोटी बापाने या प्रकरणाला विरोध दर्शवत हत्येचा कट रचला. आधी गळा दाबून निर्घृण हत्या केली. त्यानंतर तिला चक्क दोरीच्या साहाय्याने अँगलला दोरी बांधून लटकवले आणि फाशी घेतल्याचा बनाव रचला. मात्र एका अज्ञात फोन कॉलने या हत्येचा उलगडा झाला.
दरम्यान, पोलीस तपासातील शवविच्छेदन अहवालातही हि हत्या गळा दाबल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोपी वडील हरी जोगदंड यांना पोलिसांनी तात्काळ अटक केली असून बदनापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस या घटनेचा पुढील तपास करत असून या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडालीय.
जळगावात 6 वर्षांच्या चिमुकल्याचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत शेजाऱ्याच्या घरात सापडला; हत्या की अपघात?
जळगाव जिल्ह्याच्या यावल शहरातील बाबूजी पुरा भागात एका ६ वर्षीय हनन खान याचा मृत्यू संशयास्पद अवस्थेत शेजारच्या घरात सापडल्याने खळबळ उडाली आहे. हनन खान हा शुक्रवारच्या सायंकाळपासून बेपत्ता होता आणि दुसऱ्या दिवशी शेजारच्या घरात सापडल्याने आता शहरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेने परिसरात तीव्र तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
नागरिकांत संतापाची लाट
मुलाचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आल्यामुळे, हननच्या हत्येचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. शेजारी राहणाऱ्या व्यक्तीवर संशय घेत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात घटनास्थळी गर्दी केली. संशयित आरोपीला ताब्यात घेण्याची मागणी करत जमाव आक्रमक झाला. या घटनेनंतर परिसरातील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवली असून, संपूर्ण बाबूजी पुरा भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.