Mumbai Bombast Threat: मोठी बातमी! मुंबईतील नायर रुग्णालय अन् सहारा विमानतळ धमकी, पोलिस अलर्टवर
Mumbai Bombast Threat: मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये आज दुसऱ्या दिवशीही गणपती विसर्जन मिरवणूक सुरू आहे. मुंबईमधील गिरगाव चौपाटीवर भाविकांची मोठी गर्दी जमली आहे. अनेक मोठमोठ्या मंडळांचे गणपती गिरगावच्या चौपाटीवर पोहचले आहेत. असे असतानाच मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईताल नायर रुग्णालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. नायर रूग्णालयाला धमकीचा मेल आला आहे. हा मेल कोणी केलास याबद्दल अद्याप कोणतीही माहिती नसून, पोलिस याचा शोध घेत आहे. पण त्याचवेळी मात्र, हा मेल कोणी केला, याबद्दल स्पष्टता नाहीये. सहार विमान तळाला देखील ही धमकी देण्यात आली आहे. याशिवाय सहारा विमानतळाच्या शौचालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली आहे.
वारंवार गुडघे दुखतात? गुडघ्यांमधून सतत करकर आवाज येतो? मग ‘हे’ उपाय करून मिळवा कायमचा आराम
मुंबईत गेल्या २४ तासांपासून बाप्पाच्या विसर्जनाची मिरवणूक सुरू आहे. तर दुसरीकडे मुंबईला पुन्हा बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आल्यामुळे पोलिस दलातही खळबळ उडाली आहे. विसर्जन मिरवणूक आणि अशा धमक्यामुळे पोलिसांनांही तारेवरची कसरत करावी लागत आहे. अशा परिस्थितीतही पोलिस प्रशासन अलर्टमोडवर आले आहे. गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी जमली आहे.
तर दुसरीकडे धमकीचा मेळ आल्याने पोलिसांकडून या प्रकऱणाचीही चौकशी केली जात आहे. मुंबईला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही. दोन-तीन दिवसांपूर्वीही अशा प्रकराचा धमकीचा मेल मुंबई पोलिसांना मिळाला होता, पण यावेळी थेट नायर रूग्णालय आणि विमानतळाला असा धमकीचा मेल आला आहे. अनेकदा अशा धमक्या पाकिस्तानमधून देण्यात आल्याचेही बोलले जाते. पण सध्या पोलिस प्रशासन या प्रकऱणाचा तपास करत आहे.
Rohit Pawar News: देवाभाऊ’साठी कोट्यवधींच्या जाहिराती कुणी दिल्या? रोहित पवारांनी शोधून काढलं
मुंबई पोलिसांना धमकीचा संदेश पाठवणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. ५ सप्टेंबर रोजी मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअॅप नंबरवर दहशतवाद्यांच्या घुसखोरीची आणि मोठा स्फोट घडवण्याची धमकी देणाऱ्या आरोपी अश्विनीला आज (६ सप्टेंबर) नोएडा येथून अटक करण्यात आल्याची माहिती आहे. शुक्रवारी (५ सप्टेेंबर) मुंबई पोलिसांना अनंत चतुर्दशीनिमित्त ३४ वाहनांमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाली होती. एका व्हॉट्सअॅप मेसेजद्वारे पोलिसांना ही धमकी मिळाली होती, त्यानंतर पोलिस सतर्क झाले आहेत. त्यानंतर हा धमकीचा मेसेज मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअॅप हेल्पलाइन नंबरवर पाठवण्यात आला होता, या मेसेजमध्ये ३४ वाहनांमध्ये बॉम्ब ठेवण्यात आले असून ४०० किलो आरडीएक्सच्या स्फोटामुळे संपूर्ण मुंबई शहर हादरेल, अशी धमकी देण्यात आली होती.