Photo Credit-social media
बदलापूर: बदलापूर अत्याचार प्रकरणी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ठाणे सायबर सेलने पीडित मुलगी आणि तिच्या आईच्या प्रकृतीविषयी खोटे मॅसेज आणि अफवा पसरवणारा मजकूर सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या 21 वर्षीय तरुणीला अटक केली आहे. चामटोली गावातून रुतिका नावाच्या तरुणीला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात रुतिका विरोधात अफवा परसवून समजात अशांतता परसवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिडीत मुलींवर अत्याचार झाल्यानंतर रुतिकाने सोशल मिडीयवर पोस्ट शेअर करत पिडीच मुलगीआणि तिच्या आईच्या प्रकृतीचा उलेलेख केला होता. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने परिसरातील नागरिक आक्रमक झाले.
हेदेखील वाचा: जम्मू-काश्मिरात ‘इंडिया’ आघाडी लढणार; एनसी आणि काँग्रेसची आघाडी निश्चित
रूतिकाने सोशल मीडियावर शेअर केलेल्य पोस्टमधील मजकूरामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असावा आणि त्यामुळेच नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली आणि वातावरण बिघडले असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर पोस्ट करून लोकांना चिथावल्याप्रकरणी पोलिसांनी तिला अटक केली आहे. तसेच अशा प्रकारच्या पोस्ट दिसल्यास त्यावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये आणि इतर ठिकाणी शेअरही करू नये असे, तसेच कोणीही अशी अफवा पसरवल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशाराही पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपाला अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. तर दुसरीकडे, बदलापूरमधील अत्याचार प्रकरणाचा निषेध नोंदवण्यासाठी महाविकास आघाडीने येत्या 24 तारखेला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. आघाडीतील सर्व पक्ष या बंदमध्ये सहभागी होणार आहेत. महाविकास आघाडीच्या बैठकीत बदलापूर प्रकरणाचा निषेध नोंदवण्यासाठी महाराष्ट्र बंदचा निर्णय घेण्यात आला.
हेदेखील वाचा: एकाच कुटुंबातील तीन महिलांचा आत्महत्येचा प्रयत्न; कारण वाचून बसेल धक्का