Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चोरीचा माल घेणाऱ्या भंगार व्यवसायिकासह तिघांना ठोकल्या बेड्या; बारामती पोलिसांची मोठी कारवाई

एक मोठी बातमी समोर आली आहे. बारामती येथील एमआयडीसी परिसरात घडलेल्या दोन वेगवेगळ्या चोरीच्या घटनांचा पोलिसांनी तपास करत उलगडा केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 12, 2026 | 12:30 AM
चोरीचा माल घेणाऱ्या भंगार व्यवसायिकासह तिघांना ठोकल्या बेड्या; बारामती पोलिसांची मोठी कारवाई

चोरीचा माल घेणाऱ्या भंगार व्यवसायिकासह तिघांना ठोकल्या बेड्या; बारामती पोलिसांची मोठी कारवाई

Follow Us
Follow Us:

बारामती : राज्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, दररोज चोरटे वेगवेगळ्या भागात नागरिकांच्या लाखो रुपयांवर डल्ला मारत आहेत. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भिती पसरत आहे. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. बारामती येथील एमआयडीसी परिसरात घडलेल्या दोन वेगवेगळ्या चोरीच्या घटनांचा पोलिसांनी तपास करत उलगडा केला आहे. या कारवाईत अल्पवयीन मुलांसह भंगार व्यावसायिक आणि इतर आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, काहींना अटकही करण्यात आली आहे.

 

पहिल्या घटनेत डायनामिक्स कंपनीच्या आवारातून १३ मार्च रोजी सोलर प्लांटला जोडलेली सुमारे १५ हजार रुपये किमतीची कॉपर केबल चोरीस गेली होती. याबाबत १६ मार्च रोजी बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली. चोरीचा माल त्यांनी भंगार व्यावसायिक मोहम्मद शब्बीर मोहम्मद बशीर अन्सारी (वय ३८) याला विकल्याचे निष्पन्न झाले. बारामती तालुका पोलिसांनी अन्सारी याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात अल्पवयीन मुलांना बाल न्याय मंडळासमोर हजर राहण्याबाबत नोटीस देण्यात आली असून, अन्सारी याला अटक करण्यात आली आहे. एकूण १३ किलो तांब्याची तार जप्त करण्यात आली आहे.

चोरीचा मुद्देमाल हस्तगत करणे सुरू

दुसऱ्या घटनेत ३ मार्च रोजी एमआयडीसी परिसरातील हिरकणी रियल इस्टेट प्रा. लि. यांच्या गोदामातून एकूण ६ लाख ५ हजार रुपये किमतीचा माल चोरीस गेला होता. यामध्ये सुमारे २ लाख रुपये किमतीची इलेक्ट्रिकल केबल, ५० हजार रुपये किमतीचे पाण्याचे फिटिंग साहित्य, १५ हजार रुपये किमतीचा आरओ तसेच सुमारे ३ लाख ४० हजार रुपये किमतीच्या तांब्याच्या तारा व ट्रान्सफॉर्मर ऑईलचा समावेश आहे. या प्रकरणी मच्छिंद्र प्रदीप गव्हाळे, राजू रामा दिवटे, संजय रामा दिवटे आणि सनी भारत पाथरकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी राजू रामा दिवटे, संजय रामा दिवटे यांना ५ मार्च रोजी अटक करण्यात आली होती. न्यायालयाने त्यांना ०२ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. या प्रकरणात चोरीचा मुद्देमाल हस्तगत करणे सुरू आहे.

दोन्ही प्रकरणांचा पुढील तपास पोलीस हवालदार किशोर वीर राहुल मखरे हे चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय परिषदारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस अंमलदार सुरेंद्र वाघ, भारत खारतोडे, किशोर वीर, राहुल मखरे, जितेंद्र शिंदे, मनोज पवार, राहुल लांडगे, सचिन तरंगे, आफरीन शेख यांनी केली आहे.

Web Title: Baramati police have arrested three people for theft

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • Arrested News
  • Baramati Crime
  • crime news

संबंधित बातम्या

महिलेने ज्येष्ठाला अश्लील व्हिडिओ कॉल केला अन् त्याच व्हिडिओच्या माध्यमातून 40000000 उकळले; नंतर 500000 मागणी करताच…
1

महिलेने ज्येष्ठाला अश्लील व्हिडिओ कॉल केला अन् त्याच व्हिडिओच्या माध्यमातून 40000000 उकळले; नंतर 500000 मागणी करताच…

संतापजनक! शिरूरच्या कारेगावात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; घरात नेले अन्…
2

संतापजनक! शिरूरच्या कारेगावात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; घरात नेले अन्…

५०० रुपयांच्या वादातून लाथाबुक्क्यांसह बांबूने हल्ला, अत्रीत खळबळ; नेमकं काय घडलं?
3

५०० रुपयांच्या वादातून लाथाबुक्क्यांसह बांबूने हल्ला, अत्रीत खळबळ; नेमकं काय घडलं?

स्वरा उपाध्ये हत्या प्रकरणात मोठी अपडेट; ४८ तासांनंतर संशयित कर्नाटकातून ताब्यात
4

स्वरा उपाध्ये हत्या प्रकरणात मोठी अपडेट; ४८ तासांनंतर संशयित कर्नाटकातून ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.