Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Crime: केजमध्ये अमानुषतेचा कळस! अत्याचारपीडित अल्पवयीन मुलीला रुग्णालयात 10 तास, पोलीस ठाण्यात रात्रभर ताटकळत ठेवले

बीडच्या केज येथे अल्पवयीन अत्याचारपीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात तब्बल 10 तास थांबवण्यात आले. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यासाठी कुटुंबाला रात्रभर पोलीस ठाण्यात बसावे लागले. आरोग्य व पोलीस प्रशासनाच्या असंवेदनशीलतेवर तीव्र संताप व्यक्त होत आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 28, 2026 | 08:17 AM
crime, (फोटो सौजन्य- pinterest)

crime, (फोटो सौजन्य- pinterest)

Follow Us
Follow Us:
  • अल्पवयीन पीडितेला केज उपजिल्हा रुग्णालयात 10 तास वैद्यकीय तपासणीसाठी थांबवले.
  • महिला स्त्रीरोगतज्ज्ञ नसल्याचे कारण देत आरोग्य विभागाची दिरंगाई.
  • पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी पहाटेपर्यंत कुटुंबाला प्रतीक्षा करावी लागली.
बीड: बीड येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. अल्पवयीन अत्याचार पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी तब्बल १० तास ताटकळत ठेवण्यात आले. एवढेच नाही तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी तिच्या संपूर्ण कुटुंबाला रात्रभर पोलीस ठाण्यात जागून काढावी लागली. या संतापजनक प्रकारामुळे बीड जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. यामुळे आता विविध चर्चा होत आहे.

काय नेमकं घडलं पिडीतेसोबत?

ही घटना केज तालुक्यातील एका गावातली आहे. या गावात पीडित मुलगी आपल्या कुटुंबियांसोबत राहत होती. तिच्यावर चुलत मामे भावाने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केले. आरोपीने या पीडित मुलीचे तोंड रुमालाने दाबले आणि तिचे हात दोरीने बांधले. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या भयंकर प्रसंगानंतर पीडित मुलगी घाबरली होती. या घटनेने कुटुंबीय देखील हादरला होता. कुटुंबीयांनी तात्काळ कायदेशीर आणि वैधकीय मदतीसाठी पावले उचलली. मात्र त्यांना शासकीय यंत्रणेकडून मिळालेली वागणूक अत्यंत धक्कादायक होती.

Solapur Crime: सोशल मीडियावर लोकप्रिय असलेल्या रोहिणी पाराध्येने गळफास घेत संपवलं जीवन

तब्बल 10 तास रुग्णालयात ताटकळत ठेवले

पीडित अल्पवयीन मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी केज येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र रुग्णालयात उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी ‘महिला स्त्रीरोगतज्ज्ञ’ (Gynecologist) उपलब्ध नसल्याचे जुजबी कारण सांगितले. यामुळे पीडितेला रुग्णालयात सकाळी ११ वाजल्यापासून ते थेट रात्री ९ वाजेपर्यंत तिला रुग्णालयात ताटकळत ठेवण्यात आले. असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. तब्ब्ल १० तास पीडितेबाबत एवढी निष्काळजीपणा दाखवल्यामुळे रुग्णालयातील प्रशासकीय ढिसाळपणा चव्हाट्यावर आला आहे.

गुन्हा दाखल करण्यासाठी अख्खी रात्र

१० तास रुग्णालयात त्रास सहन केल्यानंतर रात्री ९ वाजता पीडितेच्या नातेवाईक आणि पोलीस तिला घेऊन केज पोलीस ठाण्यात पोहोचले. मात्र तिथे गुन्हा दाखल करण्यासाठी पहाटेचे ५ वाजले. रात्री ९ वाजता पासून ते पहाटेचे ५ म्हणजेच तब्ब्ल ८ तास गुन्हा नोंदवून घेण्यासाठी वेळ लागला. अख्खी रात्र पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्याच्या बाकावर जागून काढली.

पीडितेच्या कुटुंबियांना सोबत घडलेल्या या प्रकारामुळे केजमधील आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासन या दोन्ही यंत्रणांवर नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. या गंभीर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी डॉक्टर आणि पोलीस अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी आता नागरिकांमधून जोर धरू लागली आहे. आता प्रशासन काय निर्णय घेते या कडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.

Twisha Sharma Case: समर्थ सिंगच्या अडचणीत वाढ; तब्बल इतके दिवस झाली CBI कोठडीत रवानगी

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात ही घटना घडली.

  • Que: पीडितेला रुग्णालयात किती वेळ थांबवण्यात आले?

    Ans: वैद्यकीय तपासणीसाठी तिला सुमारे 10 तास ताटकळत ठेवण्यात आले.

  • Que: नागरिकांनी कोणती मागणी केली आहे?

    Ans: दोषी डॉक्टर आणि पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Web Title: Beed crime rape victim minor girl kept waiting for 10 hours at hospital and all night at police station

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2026 | 08:17 AM

Topics:  

  • Beed
  • Beed Crime
  • crime

संबंधित बातम्या

Kalyan Crime: कुख्यात ड्रग्स तस्कर अमजद पठाणच्या मुलाची कल्याणमध्ये दहशत? विद्यार्थ्यावर तलवारीने जीवघेणा हल्ला
1

Kalyan Crime: कुख्यात ड्रग्स तस्कर अमजद पठाणच्या मुलाची कल्याणमध्ये दहशत? विद्यार्थ्यावर तलवारीने जीवघेणा हल्ला

Navi Mumbai Crime: पहाटे मिनी सी-शोअरमध्ये रक्तरंजित थरार, 19 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; डोक्यात कोयत्याने वार
2

Navi Mumbai Crime: पहाटे मिनी सी-शोअरमध्ये रक्तरंजित थरार, 19 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; डोक्यात कोयत्याने वार

Nashik Crime: आई आहे की औदसा…! पाच दिवसांच्या चिमुकल्याचा 70 हजारांत सौदा; मालेगावात आईसह पाच जणांवर गुन्हा दाखल
3

Nashik Crime: आई आहे की औदसा…! पाच दिवसांच्या चिमुकल्याचा 70 हजारांत सौदा; मालेगावात आईसह पाच जणांवर गुन्हा दाखल

Dombivli Crime: समलैंगिक डेटिंगच्या नावाखाली लूट; चार तोळे दागिने गायब, विष्णूनगर पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या
4

Dombivli Crime: समलैंगिक डेटिंगच्या नावाखाली लूट; चार तोळे दागिने गायब, विष्णूनगर पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.