काय घडलं नेमकं?
मृत व्यक्तीचे नाव मंगेश देविदास गोटे (वय ४२) आहे. मंगेश हे खारतळेगावचे रहिवासी होते. मिळालेल्या माहितीनुसार, मंगेश यांना दारूचे मोठे व्यसन होते. ते रोज दारू पियुन घरी यायचे आणि विनाकारण पत्नीला शिवीगाळ करतो. केवळ शिवीगाळ नाही तर तो आपल्या पत्नीला अमानुषपणे मारहाणही करत होता. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरु असल्याने त्यांचे घरगुती वातावरण नेहमीच तणावपूर्ण असायचे.
नेहमीप्रमाणे मंगळवारी १० मार्च रोजी मंगेश गोटे पुन्हा एकदा दारूच्या नशेत धुंद होऊन घरी पोहोचले. घरी आल्यावर त्यांनी पुन्हा पत्नीसोबत वाद उकरून काढला आणि तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. रोजच्या या त्रासाला पत्नी पूर्णपणे कंटाळली होती. पतीकडून होणाऱ्या सततच्या मारहाणीमुळे तिचा सायं सुटला आणि संतापाच्या भरात तिने पतीला जोरदार प्रतिप्रत्युत्तर दिले.
रागाच्या भरात घडली घटना
रागाच्या भरात पत्नीने पतीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. ही मारहाण इतकी गंभीर होती की मंगेश गोटे यांचा जागीच मृत्यू झाला. पतीचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच गावात आणि परिसरात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. बुधवारी ११ मार्च रोजी या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
वलगाव पोलिसांनी तातडीने तपासाला सुरुवात केली. पोलीस उपयुक्त गाणेश शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात पत्नीने स्वतःच पतीला मारहाण
केल्याची कबुली दिली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहे.
Pune Crime: कॅम्प परिसरात किरकोळ वाद जीवावर; सहा जणांनी तरुणावर वार करून केली हत्या
Ans: ही घटना अमरावती जिल्ह्यातील खारतळेगाव येथे घडली.
Ans: मंगेश देविदास गोटे (वय 42) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
Ans: दारूच्या नशेत पतीने पत्नीला मारहाण केल्यानंतर संतापलेल्या पत्नीने प्रतिकार केला. त्या मारहाणीत पतीचा मृत्यू झाला.






