काय घडलं नेमकं?
वृंदा समीर रूद्रवार असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मंगळवारी शाळेला सुट्टी असल्याने खंडोबा मैदान परिसरात आपल्या लहान बहिणीसोबत घराच्या मजल्यावर झोका खेळात होती. झोका पकडण्यासाठी ती खुर्चीवर चढली असता खुर्ची अचानक कलंडली आणि झोक्याची दोरी गळ्याभोवती अडकून तिला गळफास बसला. या भीषण अपघातात वृंदाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.
हळहळ व्यक्त
घराच्या वरच्या मजल्यावर लेक झोका खेळतेय. मात्र बराच वेळ वृंदा खाली आली नाही. जेवायला खाली न आल्याने आई वरच्या मजल्यावर गेली असता समोरील प्रकार पाहून तिला धक्काच बसला. या घटनेने रूद्रवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रुद्रवार कुटुंबासह संपूर्ण माजलगाव शहर हळहळ व्यक्त करत आहे.
प्रेमप्रकरणातून तरुणाची आत्महत्या; मुलीच्या घरच्यांकडून मारहाण व बदनामीमुळे टोकाचा निर्णय, सुसाईड नोट सापडली
बीड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २३ वर्षीय तरुणाने प्रेमसंबंधाच्या वादातून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ज्ञानेश्वर तुकाराम कोकाटे (वय 23) असे मृत तरुणाचे नाव आहे. प्रेयसीच्या नातेवाईकांकडून झालेल्या मारहाणीमुळे आणि मानसिक छळामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक माहिती समोर येत आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. सुसाईडनोट सापडली आहे.
काय नेमकं प्रकरण?
बीड जिल्ह्यातील मांजरसुंबा येथील ज्ञानेश्वर याचे नेकनूरजवळील एका गावातील तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. त्यांच्या प्रेमसंबंधाची माहिती मुलीच्या कुटुंबियांना मिळाल्यानंतर त्यांनी संतापाच्या भरात ज्ञानेश्वरला गावात बोलावून घेतले. त्यांनतर त्याची दुचाकी आणि मोबाईल काढून घेत चार जणांनी मिळून त्याला बेदम मारहाण केली. एवढेच नाही तर त्याच्यावर चोरीचा खोटा आरोप करत गावात बदनामी केल्याचेही समोर आले आहे. ही मारहाण आणि सार्वजनिक बदनामीने तो मानसिक तणावाखाली गेला होता. या तणावामुळे त्यांने टोकाचे निर्णय घेतले. ज्ञानेश्वरने धुळे–सोलापूर महामार्गालगत असलेल्या एका टायर पंक्चर दुकानात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.त्याने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईडनोट लिहून ठेवली.
Ans: झोका पकडताना खुर्ची घसरून दोरी गळ्यात अडकली.
Ans: ती 9 वर्षांची होती.
Ans: बीडच्या माजलगाव येथे घरातच ही घटना घडली.






