देवगिरी किल्ल्यावर ३०० रणरागिणींचे श्रमदान
पर्यटनासाठी आलेल्यांनी देखील महिलांच्या या उपक्रमात हातभार लावत श्रमदान केले असल्याची माहिती धनश्री विखे पाटील यांनी उपक्रमाच्या शेवटी दिली. अहिल्यानगर जिल्ह्याच्या राहता तालुक्यातील लोणी येथील सिंधुताई एकनाथ विखे पाटील च्या १५० रणरागिणी महिला मंडळाच्या महिलांनी रविवारी देवगिरी किल्ल्यावर साफसफाई करीत अनोखा संदेश दिला.
संस्थेच्या शालिनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली धनश्री सुजय विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी दौलताबाद किल्लातील स्वच्छता झाल्यानंतर म्हैसमाळ येथील बालाजी मंदिर व भद्रा मारुती मंदिरात स्वच्छता अभियान राबवले. उपक्रमाच्या शेवटी मनोगत व्यक्त करताना धनश्री विखे पाटील म्हणाल्य, सरंक्षणाच्या बाबतीत किल्ला उत्तम प्रकारे उदाहरण आहे.
शाळेतल्या प्रांगणात पुस्तकांचा मेळा! झाडाला लगडली पुस्तके, ढोरेगाव शाळेची अभिनव ‘ट्री लायब्ररी’
रविवारी सकाळी दौलताबाद किल्ल्यावर पोहोचताच विविध देशांतील पाहुणे, हातात कॅमेरे आणि मोबाइल घेऊन समोर उभ्या असलेल्या हजारो वर्षांच्या इतिहासाकडे आश्चर्याने पाहत मोबाईल ध्ये कैद केले. या प्रतिनिधीना दौलताबाद किल्ल्याचे माहिती गाइड डॉ. सुभाष जाधव यांनी दिली त्यांना महाकोट, अंबरकोट, सरस्वती विहीर, हाथी हौद, भारतमाता मंदिर, चांद मिनार, कळकोट, चिनी महल, रंगमहाल, मेंढा तोप, अंधारी या ठिकाणी जाऊन भेट दिली व किल्ल्याचा इतिहास जाणून घेतले किल्ला खूपच व अभेद असल्याचे मत किल्ला भेट पुस्तकात नमूद केले. यावेळी पर्यटन उपसंचालक विजय जाधव, सहायक जिल्हा पर्यटन अधिकारी अजीमुद्दीन शेख, सहायक जिल्हा पर्यटन अधिकारी शोएब शाह, पर्यटन सहायक डॉ. शिवाजी गायकवाड, विक्रांत म्हात्रे, साहिल शेख, अमिता खटावकर, दीपाली डिकोस्टा यांची प्रमुख उपस्थिती होती.
सहलीत आंतरराष्ट्रीय ट्रॅव्हल एजंट, ब्लॉगर्स आणि इन्फ्लुएन्सर्सचा, पत्रकार यांचे समावेश असल्याने त्यांच्या माध्यमातून ऐतिहासिक अनुभव जागतिक पर्यटन समुदायापर्यंत पोहोचणार आहे. यामुळे अनेक देशातील पर्यटक पर्यटनासाठी येथे येतील व आपल्या छत्रपती संभाजीनगर पर्यटन स्थळ येथे रोजगार उपलब्ध होईल असे पर्यटक उपसंचालक विजय जाधव यांनी सांगितले आहे.






