Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bihar News : आगीच्या ज्वाळांनी वृद्धाला वेढले… पाहून पोलिसही हादरले, संतप्त जमावाने आयुक्तांना केली मारहाण

बिहारच्या मधुबनी जिल्ह्यात जमिनीच्या वादातून घडलेल्या एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार सुरू असलेल्या जमिनीच्या मोजणीदरम्यान एक वृद्ध व्यक्ती जळत्या अवस्थेत घरातून बाहेर आल्याने परिसरात तणाव निर्माण झाला

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 17, 2026 | 11:13 AM
Bihar News : आगीच्या ज्वाळांनी वृद्धाला वेढले... पाहून पोलिसही हादरले, संतप्त जमावाने आयुक्तांना केली मारहाण

Bihar News : आगीच्या ज्वाळांनी वृद्धाला वेढले... पाहून पोलिसही हादरले, संतप्त जमावाने आयुक्तांना केली मारहाण

Follow Us
Follow Us:
  • जमिनीच्या मोजणीदरम्यान ६० वर्षीय वृद्ध जळत्या अवस्थेत घरातून बाहेर आल्याने गोंधळ उडाला.
  • संतप्त जमावाने घटनास्थळी उपस्थित प्रशासकीय अधिकाऱ्यांवर हल्ला करत आयुक्तांना मारहाण केली.
  • वृद्धाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून आग लागण्यामागील कारणाचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.
मंगळवारी बिहारच्या मधुबनी जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली. न्यायालयाच्या आदेशानुसार हस्तक्षेप करण्यासाठी आलेल्या पोलीस आणि प्रशासकीय पथकासमोर, बेनीपट्टी पोलीस ठाण्याच्या अधवारी गावातील वॉर्ड ५ मध्ये एक वृद्ध व्यक्ती जळत्या अवस्थेत घरातून बाहेर पळत सुटला. यामुळे परिसरात खळबळ माजली आणि लोकांमध्ये एकच गोंधळ निर्माण झाला. आगीने जळत असलेला वृद्ध शेतात जाऊन पडला. वृद्धाला असं जळताना पाहून जमावामध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आणि लोकांनी पोलीस आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला करायला सुरुवात केली. न्यायालयाच्या आदेशानुसार नियुक्त केलेले आयुक्त जमावाच्या हाती लागले ज्यांना स्थानिकांकडून जोरदार मारहाण करण्यात आली.

Sangli Crime: नशेत झाला वाद अन् संपला जीव! बापानेच केली मोठ्या मुलाची हत्या; मदतीला धावला धाकटा मुलगा

वृद्ध रुग्णालयात दाखल

आगीत भाजलेले ६० वर्षांचे राजेंद्र ठाकुर यांनी जवळच्याच खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. इथून त्यांना मधुबनी सदर रुग्णालयात रेफर करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच एसडीओ शारंग पाणि पांडेय, डीएसपी अमित कुमारसोबत १० पोलिस ठाण्यांची टीम अधवारी गावात दाखल झाली. घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण असून सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.

आग कशी लागली?

या घटनेनंतर आता ही आग लागली कशी? वृद्धाने ही आग स्वत: लावत आत्महत्येचा प्रयत्न केला की दुसऱ्या कोणत्या व्यक्तीने आग लावत त्यांना मारण्याचा प्रयत्न केला? असे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. पोलिसांनी सांगितले की, या घटनेचा तपास सुरु केला जाईल. यासंबंधित कुटुंबाशी बोलण्यात आले आहे. दरम्यान कुटुंबाने विरोधी गटातील दोन व्यक्तींवर आग लावल्याचा आरोप केला आहे. कुटुंबाच्या दाव्यानुसार, घराच्या मागच्या बाजूने दोन लोक घरात घुसले आणि त्यांनी राजेंद्र प्रसाद यांच्या अंगावर पेट्रोल ओतत त्यांना आग लावली.

जमिनीवरुन वाद सुरु होता

मिळालेल्या माहितीनुसार, गावात दोन गटांमध्ये जमिनीचा वाद अनेक वर्षांपासून सुरू आहे. राजेंद्र ठाकूर आणि महेंद्र यादव यांच्यात घराच्या जागेवरून वाद होता. सिव्हिल कोर्टाच्या आदेशानंतर मंगळवारी महसूल आणि पोलिस अधिकारी न्यायालयाने नियुक्त केलेल्या आयुक्तांसोबत जागेची मोजणी आणि ताबा देण्यासाठी घटनास्थळी पोहोचले होते. जमिनीची मोजणी सुरू असतानाच एक वृद्ध व्यक्ती घरातून अंगाला आग लागलेल्या अवस्थेत बाहेर आली आणि त्यानंतर परिस्थिती तणावपूर्ण बनली.

Solapur Crime: आमच्या महिलांच्या पाठीमागे लागला आहेस…; झोपलेल्या तरुणावर चाकूने सपासप वार, तरुणाचा जागीच मृत्यू

न्यायालयाने मागेच महेंद्र यादव पक्षाच्या बाजूने हुकूमनामा दिला आहे. या संदर्भातच प्रशासन ताबा देण्यासाठी गावात दाखल झाले होते. तथापि, दुसरा पक्ष राजेंद्र ठाकुर यांच्या कुटुंबियांचा दावा आहे की त्यांना याआधी दोनदा हुकूमनामा मिळाला आहे. या हुकूमनाम्यानंतर त्यांना जमिन खाली करण्यासाठी कोणताही कायदेशीर नोटीस देण्यात आली नाही.

 

Web Title: Bihar madhubani elderly man burnt alive land dispute crowd attacks court commissioner

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2026 | 11:13 AM

Topics:  

  • bihar
  • crime news
  • Fire

संबंधित बातम्या

Mahabaleshwar Crime news: रिसॉर्ट चोरी प्रकरणी मुख्य आरोपीला कारावास, ५ जण निर्दोष
1

Mahabaleshwar Crime news: रिसॉर्ट चोरी प्रकरणी मुख्य आरोपीला कारावास, ५ जण निर्दोष

घरबसल्या नोकरी देण्याच्या आमिषाने एकाची फसवणूक; तब्बल सव्वा चार लाखांना घातला गंडा
2

घरबसल्या नोकरी देण्याच्या आमिषाने एकाची फसवणूक; तब्बल सव्वा चार लाखांना घातला गंडा

गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ भागातून घेतले ताब्यात
3

गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ भागातून घेतले ताब्यात

जुन्या वादातून दोन तरुणांवर गोळीबार, तीन राऊंड फायर; श्रीगोंदा तालुक्यातील घटनेनं खळबळ
4

जुन्या वादातून दोन तरुणांवर गोळीबार, तीन राऊंड फायर; श्रीगोंदा तालुक्यातील घटनेनं खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.