काय घडलं नेमकं?
युवराज अशोक व्यवहारे (वय २७) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. युवराज हा दोन वर्षांपूर्वी वस्तीवरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या वाहनावर चालक म्हणून काम करत होता. त्यावेळी त्याची एका महिलेशी ओळख झाली. या ओळखीचे रूपांतर अनैतिक संबंधात झाले असा संशय महिलेच्या नातेवाईकांना होता. यावरून पूर्वीही त्यांच्यात वाद झाला होता. हा वाद पोलीस ठाण्यात आपापसात मिटवण्यात आला.
Raigad Crime: वाद विकोपाला गेला अन्… प्रियकराने प्रेयसीचा घेतला जीव, गळफास घेत स्वतःलाही संपवलं
मात्र सोमवारी मध्यरात्री १२ च्या सुमारास युवराज आपल्या घरासमोरील अंगणात झोपला असतांना आरोपींना तिथे येऊन गाठले. “तू आमच्या महिलांच्या पाठीमागे लागला आहेस,” असे म्हणून शिवीगाळ करत आरोपींपैकी दोघांनी युवराजवर चाकूने सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात युवराज गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
चार आरोपी अटकेत
या प्रकरणी युवराजचे वडील अशोक निवृत्ती व्यवहारे यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तातडीने कारवाई करत १२ तासांच्या आत चार आरोपींना अटक केली. दत्ता अण्णा पवार, प्रशांत बाळू शिंदे, अण्णा हरिदास पवार, अंबिका अण्णा पवार असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास पोलीस करत आहेत.
मुख्याध्यापकाने पत्नी-मुलांना विष पाजून केली आत्महत्या; 22 पानांची सुसाईड नोट सापडली
सोलापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आलो आहे. जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकाने आपल्या दोन मुलांना आणि पत्नीला विष पाजून स्वतः आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आत्महत्येपूर्वी मुख्याध्यापकाने २२ पानांची सुसाईड नोट लिहून ठेवली होती. ती पोलिसांना सापडली आहे. शेअर मार्केटच्या नादाला लागून कोट्यवधी रुपयांच्या नुकसानामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. ही घटना बार्शी तालुक्यातील हत्तीज गावात गुरुवारी घडली.
Jalna Crime: ‘त्या मला मारून टाकतील’ भीती ठरली खरी? पत्नी आणि चार मुलींनी मिळून वडिलांची केली हत्या
Ans: युवराज अशोक व्यवहारे असे मृत तरुणाचे नाव आहे.
Ans: सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील एका गावात ही घटना घडली.
Ans: या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे.






