
Pune Mayor office bomb threat email 2026, Nagpur RSS headquarters security threat, IED bomb threat,
Pune Mayor office bomb threat : पुणे महापौर कार्यालयाला बॉम्बस्फोटाची धमकी आली आहे. महापौर कार्यालयाच्या अधिकृत ई-मेल आयडीवर बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ई-मेल आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महापौर कार्यालयाच्या ई-मेलमध्ये पुणे महापौर कार्यालय, नागपूरमधील काही ठिकाणे तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला लक्ष्य करण्याची धमकी देण्यात आली आहे.
लक्षणीय बाब म्हणजे, या मेलमध्ये IED बॉम्बस्फोटाने उडवण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. यासोबतच काही विशिष्ट वेळा आणि तारखांचाही संदर्भ देण्यात आला आहे. हा मेल मिळण्यानंतर अवघ्या काही मिनिटातचं पोलीस, बॉम्ब शोधक व नाशक पथक तसेच सायबर विभाग अलर्ट मोडवर आले आहे. पोलिसंनी ई-मेलची सत्यता आणि हा मेल कोणी पाठवला, त्या व्यक्तीचा शोध सुरू केला आहे.(Pune Crime)
Pune Mayor office bomb threat email 2026
दरम्यान, हा ई-मेल कुठून पाठवण्यात आला. तो खरा आहे की कोणी खोडसाळपणा करण्यासाठी हा मेल केलाय, याची तपासणी यंत्रणांकडून केली जात आहे. सध्या कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आलेली नसून, सुरक्षा यंत्रणांनी खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित परिसरात सुरक्षा वाढवली आहे.
महापालिका आयुक्त नवल किशोर राम ( Nawal Kishore Ram) यांच्या निर्देशानुसार मुख्य इमारतीतील सर्व कर्मचारी आणि नागरिकांना बाहेर काढण्यात आले आहे. मेल मिळताच काही मिनिटातच बॉम्ब शोधक व नाशक पथकाकडून सखोल तपासणी सुरू करण्यात आली आहे. शोधमोहीम पूर्ण होईपर्यंत महापालिका मुख्य इमारतीतील कामकाज बंद ठेवण्याच्या निर्णय घेण्यात आहे. असून, परिसरात प्रवेशालाही तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, हा धमकीचा ईमेल कथित खलिस्तान नॅशनल आर्मी या नावाने पाठवण्यात आला आहे. लक्षणीय बाब म्हणजे ईमेलमध्ये ऑपरेशन ब्लू स्टार (Operation Blue Star) चा उल्लेख करण्यात आला आहे. त्याचा बदला घेण्यासाठी तीन महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली आहे.
धमकीच्या ईमेलमध्ये पुण्यातील महापौर कार्यालय, नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (Rashtriya Swayamsevak Sangh) मुख्यालय आणि विधान भवन (Vidhan Bhavan) यांचा उल्लेख करण्यात आला आहे. संबंधित संस्थांनी ऑपरेशन ब्लू स्टारला पाठिंबा दिल्याचा आरोप करत ही धमकी देण्यात आल्याचे समोर आले आहे.
सकाळी सुमारे ८.२० वाजता महापौर कार्यालयाला हा ईमेल प्राप्त झाला. त्यानंतर पुणे पोलिस, बॉम्ब शोधक पथक, सायबर विभाग आणि इतर सुरक्षा यंत्रणांनी तातडीने तपास सुरू केला. ईमेलचा स्रोत, त्यामागील व्यक्ती अथवा संघटना आणि धमकीची सत्यता याबाबत चौकशी सुरू आहे.
दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव महापालिकेतील कर्मचाऱ्यांना कार्यालयाबाहेर काढण्यात आले असून, परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच महापालिकेचे नियमित कामकाज पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.