उत्तर प्रदेशमधून समोर आली धक्कादायक घटना (फोटो - istockphoto)
गोरखपुर: उत्तर प्रदेशच्या गोरखपुरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एकतर्फी प्रेम प्रकरणातून गोळीबार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. माथेफिरू प्रियकराने प्रेयसी आणि तिच्या बहीणीवर गोळी झाडल्याची घटना घडली आहे. तसेच त्यानंतर त्या प्रियकराने स्वतःला संपवण्याचा देखील प्रयत्न केला आहे. ही घटना नक्की काय आहे जाणून घेऊयात.
गोरखपुर जिल्ह्यात एका माथेफिरू प्रियकराने प्रेयसीच्या घरात घुसून प्रेयसीवर गोळी चालवली आहे. तसेच तिच्या बहीणीवर देखील त्याने बंदुकीतून गोळी झाडली. त्यानंतर त्या युवकाने स्वतःला देखील गोळी मारून जीव देण्याचा प्रयत्न केला. यामध्ये तिघेही जण गंभीर जखमी झाले. तिघांना देखील रूग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.
उत्तर प्रदेशच्या गोरखपुरमध्ये ही घटना घडली आहे. तिघांची प्रकृती गंभीर आहे. गोळी चालण्याचा आवाज ऐकून प्रेयसीची आई आणि आजूबाजूचे लोक धावत आले. तिघांना तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले. गोळी चालवलेला युवक आजमगडचा राहणारा असल्याचे समोर आले आहे. घटनास्थळी पोलिस दाखल झाले. या घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
UP मधील हादरवणारी घटना; वाचून उडेल थरकाप
उत्तर प्रदेशच्या इटावामधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. प्रेयसीला भेटायला आलेल्या प्रियकराची हत्या करण्यात आली आहे. या मुलाची गोळी मारून हत्या करण्यात आली आहे. प्रियकर आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी आला असताना त्याची हत्या करण्यात आली आहे. ही हत्या प्रेयसीच्या वडिलांनी केली असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
उत्तर प्रदेशच्या इटावामध्ये अशी घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना इटावा जिल्ह्यातील खेडा या गावातील आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलिस घटनेचा तपास करत आहेत. मृत मुलीचे शरीर पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.समोर आलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या ऑरेया जिल्ह्यातील 18 वर्षांचा एक युवक अनेक दिवसांपासून खेडा हेळू या गावात आपल्या नातेवाईकांकडे राहत होता. त्याच गावातील एका मुलीवर त्याचे प्रेम होते. सोमवारी रात्रीच्या वेळेस हा युवक आपल्या प्रेयसीला भेटणीसाठी तिच्या घरी पोहोचला.
प्रेयसीला भेटायला आला प्रियकर अन् मग बापानेच थेट… : UP मधील हादरवणारी घटना; वाचून उडेल थरकाप
रात्रीच्या अंधारात हा युवक प्रेयसीच्या घरच्या दुसऱ्या मजल्यावर चढण्याचा प्रयत्न करत असताना प्रेयसीच्या वडिलांना त्याला पाहिले. आधीपासून सतर्क असणाऱ्या तिच्या वडिलांनी अधिकृत लायसन्स असणाऱ्या बंदुकीतून त्या युवकवर गोळी चालवली. गोळी लागताच युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना कळताच गावात एकच खळबळ उडाली.