File Photo : Video Call
छत्रपती संभाजीनगर : शहरातील एका व्यापाऱ्याला हनी ट्रॅपमध्ये अडकवून त्याच्याकडून 15 लाख रुपये लुटणाऱ्या एका महिलेसह चौघांच्या टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. सिटी चौक पोलिसांनी मंगळवारी रात्री रंगारगल्लीत ट्रॅप लावून 24 वर्षांच्या महिलेला 20 हजार रुपये रोख घेताना ताब्यात घेतले आहे.
हेदेखील वाचा : ‘लाडकी बहीण’नंतर आता राज्यातील तब्बल 5 लाख महिलांना सरकारकडून मिळणार ‘हे’ गिफ्ट; आदिती तटकरेंची माहिती
पुष्पा साळवे (वय २४), अर्जुन लोखंडे (वय ३०), हनी भूषण चव्हाण (वय १८), क्रिस्टल नीलेश रानडे (वय २०), आदित्य शेरे (सर्व, रा. भावसिंगपुरा) अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. पुष्पा साळवे या महिलेने छत्रपती संभाजीनगर शहरातील एका नामांकित सराफा व्यापाऱ्याशी प्रथम मैत्री केली. त्यानंतर या दोघांमध्ये व्हॉट्सऍपवर बोलणे सुरू झाले. काही व्हिडिओची देखील देवाण-घेवाण झाली. यातून झालेल्या अश्लील संवादातून मागील आठ महिन्यांपासून व्यापाऱ्याला ब्लॅकमेल करायला सुरूवात केली होती.
बंदुकीसह 20 हजार रक्कम जप्त
ब्लॅकमेलिंगचा प्रकार वाढल्याने शेवटी व्यापऱ्याने पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. त्यानंतर एसीपी संपत शिंदे, पीआय परदेशी यांच्या पथकाने मंगळवारी रात्री या टोळीला सापळा लावून शहराच्या रंगारगल्ली परिसरातून अटक केली. यावेळी पुष्पा साळवे, आदित्य शेरे, अर्जुन लोखंडे, हनी भूषण चव्हाण, क्रिस्टल नीलेश रानडे यांच्या ताब्यातून एक बंदूक आणि 20 हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
व्यापाऱ्याकडून 15 लाख उकळले
आतापर्यंत या टोळीने व्यापाऱ्याकडून सुमारे 10 ते 15 लाख रुपये उकळल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या टोळीने अजून काही व्यापाऱ्यांनाही फसवले असल्याचे प्राथमिक तपासातून पुढे आले आहे. तर या प्रकरणातील आरोपी महिलेचा पती देखील सराईत गुन्हेगार असून तो सध्या एमपीडीएमध्ये कारागृहात असल्याची माहिती दिली जात आहे.
वैद्यकीय प्रवेशाच्या आमिषाने फसवणूक
राज्यात फसवणुकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून फसवणुकीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातच आता शाळा तसेच महाविद्यालयांमध्ये प्रवेश सुरू झाल्यानंतर वैद्यकीय प्रवेशासाठी तसेच इंजिनिअरींग व इतर महत्वाच्या शाखा आणि महाविद्यालयांमध्ये प्रवेश देण्याच्या आमिषाने फसवणूक करणारी टोळी पुण्यात सक्रिय असल्याचे दिसते. दरवर्षी प्रवेशाच्या निमित्ताने फसवणूक होते. परंतु, या टोळ्या मात्र समोर येत नसल्याचे दिसते.
हेदेखील वाचा : Santosh Deshmukh Case: सौरभ भोंडवेचा अपघात की घातपात? संतोष देशमुखांच्या हत्येनंतर बीडमधील अनेक खूनप्रकरणे उजेडात