Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

डोळ्यांवर स्प्रे मारून 8 लाखांची रोकड लुटली; पुण्याच्या वारजे माळवाडीतील धक्कादायक घटना

दुकानातील दिवसाची रोकड पांढऱ्या रंगाच्या पिशवीत भरून त्यांनी त्यांच्या होंडा अॅक्टिव्हा दुचाकीच्या डिक्कीत ठेवली होती. ही रोकड पिंपरी येथील सत्यम बारमध्ये जमा करण्यासाठी ते निघाले होते. प्रयाग सिटी परिसरातून जात असताना चार अज्ञातांनी दुचाकी आडवी घालून त्यांना थांबवले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 29, 2026 | 11:05 AM
डोळ्यांवर स्प्रे मारून 8 लाखांची रोकड लुटली; पुण्याच्या वारजे माळवाडीतील धक्कादायक घटना

डोळ्यांवर स्प्रे मारून 8 लाखांची रोकड लुटली; पुण्याच्या वारजे माळवाडीतील धक्कादायक घटना

Follow Us
Follow Us:

पुणे : वारजे माळवाडी परिसरातून एका वाईन शॉपच्या कॅशिअरला अडवून त्याच्या डोळ्यांवर स्प्रे मारत चौघांनी ८ लाख ६ हजार ४८० रुपयांची रोकड लुटल्याची धक्कादायक घटना घडली. भररस्त्यात अवघ्या काही क्षणांत ही घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी हौसकुमार प्रकाश इंगळे (वय ४२) यांनी वारजे पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, चार अज्ञातांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.

तक्रारदार डीएसपी वाईन्समध्ये कॅशिअर म्हणून कार्यरत आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, दुकानातील दिवसाची रोकड पांढऱ्या रंगाच्या पिशवीत भरून त्यांनी त्यांच्या होंडा अॅक्टिव्हा दुचाकीच्या डिक्कीत ठेवली होती. ही रोकड पिंपरी येथील सत्यम बारमध्ये जमा करण्यासाठी ते निघाले होते. प्रयाग सिटी परिसरातून जात असताना चार अज्ञातांनी दुचाकी आडवी घालून त्यांना थांबवले. नंतर आरोपींनी त्यांच्या चेहऱ्यावर स्प्रे मारला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे इंगळे घाबरले असता आरोपींनी त्यांच्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेली रोकड असलेली पिशवी हिसकावून घेतली आणि क्षणार्धात पसार झाले.

हे सुद्धा वाचा : पुण्याच्या वेशीवर ‘हाऊस पार्टी’चे नवे जाळे; शहरातील कारवाईनंतर ग्रामीणमधील फार्महाऊस, रिसॉर्ट्सवर वाढला कल

या घटनेत रोकडीसह एकूण ८ लाख ६ हजार ४८० रुपयांचा ऐवज लंपास झाला. घटनेची माहिती मिळताच वारजे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. परिसरातील सीसीटीव्ही फूटेज ताब्यात घेण्यात आले असून, आरोपींनी वापरलेल्या दुचाकींचा आणि त्यांच्या हालचालींचा माग काढण्याचे काम सुरू आहे. जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास वारजे पोलिस करीत आहेत.

दरोड्याच्या तयारीतील टोळी आंबेगाव पोलिसांच्या जाळ्यात

दुसऱ्या एका घटनेत, आंबेगाव पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या तिघा जणांच्या टोळीला अटक केली आहे. आरोपींकडून एक लोखंडी कोयता आणि मिरची पावडरची पाकिटे जप्त करण्यात आली असून, अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एकजण तडीपार असतानाही शहरात वावरत असल्याचे तपासात उघड झाले आहे.

Karnataka : अनैतिक संबंधांच्या संशयातून पत्नीला फॅनला लटकवले, व्हिडिओ कॉलवर आई-वडिलांना दाखवली मुलीची तडफड

Web Title: Cash worth 8 lakh looted after spraying substance in eyes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2026 | 11:02 AM

Topics:  

  • crime news
  • pune news

संबंधित बातम्या

Satara Crime: वाईत गावठी पिस्टलचा धसका; दोन आरोपी जेरबंद, दोन पिस्टल आणि पाच जिवंत काडतुसे जप्त
1

Satara Crime: वाईत गावठी पिस्टलचा धसका; दोन आरोपी जेरबंद, दोन पिस्टल आणि पाच जिवंत काडतुसे जप्त

Crime News: HR मीटिंगसाठी गेला अन् बेपत्ता; पाच दिवसांनी हत्येचा उलगडा, जाणुन घ्या नेमकं काय घडलं?
2

Crime News: HR मीटिंगसाठी गेला अन् बेपत्ता; पाच दिवसांनी हत्येचा उलगडा, जाणुन घ्या नेमकं काय घडलं?

सासवडमध्ये पोलिसांची मोठी कारवाई, गावठी पिस्टलसह तरुण ताब्यात; तब्बल 7 लाख 35 हजारांचा मुद्देमाल जप्त
3

सासवडमध्ये पोलिसांची मोठी कारवाई, गावठी पिस्टलसह तरुण ताब्यात; तब्बल 7 लाख 35 हजारांचा मुद्देमाल जप्त

पुण्यात Tennis चा थरार! आरुष देशपांडे अन् ‘या’ खेळाडूची चमकदार कामगिरी, पटकावली विजेतेपदे
4

पुण्यात Tennis चा थरार! आरुष देशपांडे अन् ‘या’ खेळाडूची चमकदार कामगिरी, पटकावली विजेतेपदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.