Karnataka : अनैतिक संबंधांच्या संशयातून पत्नीला फॅनला लटकवले, व्हिडिओ कॉलवर आई-वडिलांना दाखवली मुलीची तडफड
पंख्याला लटकवत दिला गळफास
मिळालेल्या माहितीनुसार, पती प्रवीणने सुरुवातीला पत्नी भाग्यश्रीला लाकडी काठीने बेदम मारहाण केली. यानंतरही जेव्हा त्याचे मन भरले नाही तेव्हा त्याने तिच्या शरीराला पंख्याला बांधत फासावर लटकवले आणि तिची हत्या केली. फासावर लकटल्यानंतरही पती इथेच थांबला नाही तर त्याने भाग्यश्रीच्या आई-वडिलांनी व्हिडिओ काॅल लावला. त्याने कथितरित्या पत्नीच्या आई-वडिलांना त्यांची मुलगी कशी फासावर लटकत आहे ते दाखवले. आपला जीव वाचवण्यासाठी पत्नी बराच काळ संघर्ष करत राहिली पण पतीला काही तिची दया आली नाही. पोलिसांनी दावा केला आहे की, यानंतर पतीने तो व्हिडिओ अनेकांना शेअर केला.
धक्कादायक ! अल्पवयीन मुलीवर अनेकदा लैंगिक अत्याचार; जीवे मारण्याची धमकी दिली अन्…
माहेरुन घरी आणलं आणि हत्या केली
ही भीषण घटना रविवार संध्याकाळी बिलगी तालुक्याच्या गलागली गावात घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, प्रवीण आणि भाग्यश्री यांच्यात सतत भांडण होत असायचे ज्यामुळे भाग्यश्री दोन महिन्यांआधी माहेरी महालिंगपुर येथे आपल्या आई-वडिलांसोबत रहायला आली. यानंतर प्रवीण सासरी पोहचला आणि त्याने एकत्र राहू असं आश्वासन देत भाग्यश्रीला पुन्हा घरी आणले. तथापि, ज्या दिवशी तो भाग्यश्रीला घेऊन घरी आला त्याच दिवशी संध्याकाळी त्याने पत्नीची निघृण हत्या केली. प्रकरणाची माहिती मिळताच बिलागी पोलीसींनी तत्काळ कारवाई करत आरोपी पतीला ताब्यात घेतलं आहे. पोलिस घटनास्थळावरुन मिळालेल्या सर्व पुराव्यांचा तपास करत असून आरोपीला लवकरात लवकर कायदेशीर शिक्षा ठोठावण्यात येईल अशी आशा आहे.






