Accident News: तरुणाला धडक दिल्यानंतर पोलिसांना चिरडण्याचा प्रयत्न; क्षणात बाजूला उडी अन्...
हेही वाचा: Crime News: काही तासांत तीन महिलांना लुटले; गोल्ड लोनच्या माध्यमातून चार लाखांची उचल, सहा गुन्हे उघडकीस
चाकण : वडगाव घेणंद येथे सोमवारी (२१ सप्टेंबर) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास भरधाव आणि निष्काळजीपणे कार चालवणाऱ्या चालकाने आधी रस्त्यावरील वाहनांना धडक देत एका तरुणाला जखमी केले. त्यानंतर कार अडवण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या अंगावरच वाहन घालण्याचा प्रयत्न केला. पोलिस अंमलदाराने प्रसंगावधान राखत बाजूला उडी मारल्याने ते बचावले. त्यानंतर चालकाने पोलिसांच्या सरकारी वाहनालाही धडक दिली. पोलिसांनी चालकाला घटनास्थळीच ताब्यात घेतले. सुखदेव हनुमंत नाईक (वय २९, मूळ रा. मिरज, जि. सांगली) असे अटक केलेल्या चालकाचे नाव आहे. तो कार वेगाने आणि निष्काळजीपणे चालवत होता. त्याने रस्त्यावरील वाहनांना धडक दिल्याने अविनाश गोविंद मोरे (वय २०, रा. मेदनकरवाडी) हा तरुण जखमी झाला.
अपघाताची माहिती मिळाल्यानंतर दक्षिण चाकण पोलिस ठाण्याचे अंमलदार निरोज रज्जाक शेख (वय ४१) सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी कार थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, नाईक याने वाहन थांबवण्याऐवजी शेख यांच्या दिशेने कार घातली. कार अंगावर येत असल्याचे लक्षात येताच शेख यांनी बाजूला उडी मारली. त्यामुळे त्यांना दुखापत झाली नाही. त्यानंतर चालकाने पोलिसांच्या सरकारी वाहनाला धडक दिली.
या प्रकारानंतर पोलिसांनी सुखदेव नाईक याला ताब्यात घेतले. याप्रकरणी अंमलदार निरोज शेख यांच्या फिर्यादीवरून दक्षिण चाकण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी कामात अडथळा आणणे, हत्येचा प्रयत्न करणे तसेच अपघातासंदर्भातील विविध कलमांनुसार कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास दक्षिण चाकण पोलिस करीत आहेत.