Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोशल मिडिया इन्फ्लुएंसरसोबत घडलं भयंकर! गाडीतून अपहरण, झाडाला बांधलं अन् जिवंत जाळलं; हत्येमागे लिव्ह-इनचे कनेक्शन?

Chandigarh Crime : चंदीगडमध्ये सोशल मीडिया इन्फ्लुएंसर मनजीत कौर हिच्या हत्येने खळबळ उडाली आहे. अपहरणानंतर गंभीररित्या भाजलेल्या मनजीतचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 30, 2026 | 10:14 AM
सोशल मिडिया इन्फ्लुएंसरसोबत घडलं भयंकर! गाडीतून अपहरण, झाडाला बांधलं अन् जिवंत जाळलं; हत्येमागे लिव्ह-इनचे कनेक्शन?

सोशल मिडिया इन्फ्लुएंसरसोबत घडलं भयंकर! गाडीतून अपहरण, झाडाला बांधलं अन् जिवंत जाळलं; हत्येमागे लिव्ह-इनचे कनेक्शन?

Follow Us
Follow Us:
  • मनजीत कौरच्या उपचारादरम्यान मृत्यू
  • अपहरणानंतर झाडाला बांधून पेटवल्याचा आरोप
  • दोन संशयितांविरोधात गुन्हा; पोलिसांकडून शोध सुरू
पंजाबच्या चंदीगडमधून हत्येची आणखी एक हादरवणारी घटना समोर येत आहे. सोशल मिडिया इन्फ्लुएंसर मनजीत काैर हिचे ८ आठवड्यांआधी दोन अपहरकर्त्यांनी अपहरण केले होते. दावा आहे की, आरोपींनी मनजीतला बेदम मारहाण केली, झाडाला बांधले आणि मग जिवंत जाळत निघृणपणे तिची हत्या केली. गंभीररित्या भाजलेल्या मनजीतवर चंदीगड येथील पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च (PGIMER) मध्ये उपचार सुरू होते. अशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी उपचारादरम्यानच तिचा मृत्यू झाला आहे. या घटनेत आता तिच्या लिव्ह इन रिलेशनशिपचा अँगल एक चर्चेचा विषय बनला आहे.

व्हेल माशाची ‘उलटी’ घेऊन जात होते चौघे; तस्करीचा पर्दाफाश, २ कोटी ४६ लाखांचा मुद्देमाल जप्त

दोन संशयितांना गुन्हा दाखल

मनजीत काैरची आई कांता देवी यांच्या तक्रारीच्या आधारावर चंदीगड पोलिसांनी शुबी आणि पिंडा या दोन संशयितांवर अपहरण आणि हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ही घटना ३ जुलैच्या रात्री घडून आली. तक्रारीत म्हटले आहे की, दोन्ही आरोपींनी मनजीत काैरला सेक्टर-३४ येथील एका दारुच्या दुकानाजवळ भेटण्यासाठी बोलावले होते. तिथे पोहचल्यानंतर कथितरित्या दोन्ही आरोपींनी तिला जबरदस्तीने गाडीत बसवले आणि तिला घेऊन ते मोरिंडाला निघून गेले. इथे पोहचल्यानंतर त्यांनी मनजीतला बेदम मारहाण केली. यानंतर एका झाडाला बांधून तिला पेटवण्यात आले. माहिती आहे की, एका अनोळखी व्यक्तीने आग पाहिल्यानंंतर त्याने ब्लँकेटने ही आग विझवली ज्यामुळे मनमीतचा जीव यातून बचावला होता. तिला मोरिंडा येथील स्थानिक रुग्णालयात तातडीने भरती केले, जिथे तिची प्रकृती अत्यंत गंभीर होती. पुढे ९ जुलै रोजी तिला पीजीआयएमईआर (चंदीगड) येथे पाठवण्यात आले.

उपचारादरम्यान मृत्यू

PGIMER मध्ये मनजात अनेक दिवस बेशुद्ध अवस्थेत होती, ५ ऑगस्ट रोजी थोड्या वेळासाठी ती शुद्धीवर आली ज्यानंतर तिने घडलेला सर्व प्रकार कुटुंबाला सांगितला. तथापि, यानंतर तिची प्रकृती पुन्हा खालावली आणि गंभीररित्या भाजल्याने २६ ऑगस्ट रोजी रुग्णालयातच तिचा मृत्यू झाला.

रेल्वेसमोर उडी घेऊन पोलिस उपनिरीक्षकाची आत्महत्या; पोलिस गणवेशातच उचललं टोकाचं पाऊल

आरोपींचा शोध सुरु

मनजीतच्या मृत्यूनंतर सेक्टर-३४ पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम १४०(१) (अपहरण), १०३(१) (खून) आणि ३(५) (सामायिक गुन्हेगारी जबाबदारी) अंतर्गत FIR दाखल करण्यात आली आहे. पोलसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनजीतचा घटस्फोट झाला होता आणि तिला सात वर्षांचा मुलगा आहे. पोलीस सूत्रांनुसार, मनजीत आरोपींपैकी एकासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होती. तथापि याची स्पष्टता अद्याप झाली नाही. पोलिसांनी संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला असून शुबी आणि पिंडा यांना शोधण्यासाठी पोलिस अनेक ठिकाणी छापे टाकत आहे. याशिवाय मनजीतच्या कुटुंबाची आणि तिच्या मित्रमंडळींची चाैकशी करुन पोलिस घटनेसंबंधित पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करत आहे.

 

Web Title: Chandigarh influencer manjeet kaur murder case crime news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2026 | 10:13 AM

Topics:  

  • Chandigarh
  • crime news
  • Murder Case

संबंधित बातम्या

व्हेल माशाची ‘उलटी’ घेऊन जात होते चौघे; तस्करीचा पर्दाफाश, २ कोटी ४६ लाखांचा मुद्देमाल जप्त
1

व्हेल माशाची ‘उलटी’ घेऊन जात होते चौघे; तस्करीचा पर्दाफाश, २ कोटी ४६ लाखांचा मुद्देमाल जप्त

रेल्वेसमोर उडी घेऊन पोलिस उपनिरीक्षकाची आत्महत्या; पोलिस गणवेशातच उचललं टोकाचं पाऊल
2

रेल्वेसमोर उडी घेऊन पोलिस उपनिरीक्षकाची आत्महत्या; पोलिस गणवेशातच उचललं टोकाचं पाऊल

सासवडला पुन्हा तीन मेडिकल दुकाने फोडली, पोलिसांना चोरट्यांचे आव्हान; कोम्बिंग ऑपरेशन सुरु
3

सासवडला पुन्हा तीन मेडिकल दुकाने फोडली, पोलिसांना चोरट्यांचे आव्हान; कोम्बिंग ऑपरेशन सुरु

पत्नीच्या प्रियकराला चाकूने भोसकून संपवलं; पुणे-सातारा महामार्गावरील सारोळे गावातील थरार
4

पत्नीच्या प्रियकराला चाकूने भोसकून संपवलं; पुणे-सातारा महामार्गावरील सारोळे गावातील थरार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.