
Chandrapur Crime : राखी बांधून बहिणी निघाल्या अन् भावानेच केला भावाचा घात; मटण करीवरून झाला होता वाद
Vidyanand Bapat: विद्यानंद बापट यांच्यावरील हल्ला प्रकरण; संतोष चव्हाणला कोर्टाने थेट…
कुऱ्हाडीने केला वार
मिळालेल्या माहितीनुसार, रमेशचे त्याचा मोठा भाऊ जगन श्रीराम बिनकर याच्यासोबत मोठे भांडण झाले. शाब्दिक बाचाबाचीतून सुरु झालेला हा वाद पुढे जाऊन शिव्यांपर्यंत पोहचला आणि यातच रागाच्या भरात मोठ्या भावाकडून नको तो प्रकार घडला. वादात जगनला आपला राग अनावर झाला नाही आणि घरात जाऊन लोखंडी कुऱ्हाड बाहेर आणला. यानंतर लहान भाऊ रमेशच्या गळ्यावर त्याने या कुऱ्हाडीने वार केले ज्यात रमेश गंभीर जखमी झाला. त्याच्या शरीरातून भरपूर रक्तस्त्राव झाला होता ज्यामुळे रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचा जागीच मृत्यू झाला.
काही तासांआधीच बहिणींनी बांधली होती राखी
पोलिसांच्या तक्रारीनुसार, रमेश आणि जगनच्या बहिणी, भारती आणि सुलोचना, घटनेच्या दिवशी राखी बांधण्यासाठी नागपूरहून शंकरपूरला आल्या होत्या. दुपारी कुटुंबाने एकत्र मटण खाल्ले आणि बहिणींनी दोन्ही भावांना राखी बांधली. त्यानंतर, दुपारी सुमारे ३:३० वाजता दोन्ही बहिणी नागपूरला निघून गेल्या. बहिणी घरातून निघून गेल्याच्या काही तासानंतरच हत्येची घटना घडली.
भावांमध्ये वादाच्या ठिणग्या नेहमीच पेटायच्या…
या प्रकरणाची माहिती मधल्या भावाने पोलिसांना दिली. त्याने सांगितले की, जगन आणि रमेशला मद्यपानाची सवय होती. दोघांमध्ये नेहमीच वाद व्हायचे, ते नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणावरुन एकमेकांसोबत भांडत रहायचे. तथापि, बुधवारी त्यांच्या या भांडणाने एक हिंसक वळ घेतले. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी भाऊ जगनला अटक केली आहे. पोलिस घटनेचा सखोल तपास करत असून हत्येचा घटनाक्रम आणि पुरावे गोळा करण्याचे काम सध्या सुरु आहे.