Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vidyanand Bapat: विद्यानंद बापट यांच्यावरील हल्ला प्रकरण; संतोष चव्हाणला कोर्टाने थेट…

Vidyanand Bapat: दरम्यान, आरोपीच्या वकिलांनी न्यायालयात पोलिसांच्या मागणीला विरोध केला. आरोपीवर लावलेल्या भारतीय न्याय संहितेतील कलम ३५३(२) च्या अनुषंगानेही वकिलांनी युक्तिवाद केला.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 04, 2026 | 09:40 PM
vidyanand bapat

vidyanand bapat

Follow Us
Follow Us:
  • संतोष चव्हाणला एक दिवसाची पोलिस कोठडी
  • विद्यानंद बापट यांना काल पुण्यात मारहाण 
  • पोलिसांकडून गुन्ह्याच्या कटाचा तपास
पुणे/Vidyanand Bapat: डीजेविरोधात भूमिका घेणारे विद्यानंद बापट यांना झालेल्या मारहाण प्रकरणात अटक केलेल्या  संतोष शंकर चव्हाण (वय ३२, रा. हनुमाननगर, राऊतवाडी, कोथरूड) याला कोथरूड पोलिसांनी शुक्रवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने चव्हाण याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.चव्हाण हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. कोथरूड पोलिसांत त्याच्यावर यापूर्वी ६ गुन्हे दाखल असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. त्याच्यावर दंगलीसह विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

बापट यांना अडवून त्यांच्यावर हल्ला करण्यामागे नेमका काय उद्देश होता, आरोपीने हल्ला स्वतःहून केला की त्यामागे कोणाचा कट होता, तसेच त्याचे साथीदार आहेत का, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. आरोपीला याप्रकरणात कोणाकडून माहिती किंवा सूचना मिळाल्या होत्या का, याचाही तपास केला जाणार आहे. या घटनेमुळे सामाजिक असंतोष निर्माण करण्याचा किंवा दोन समाजांत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला का, याचीही चौकशी पोलिस करीत आहेत.

Vidyanand Bapat यांना मारहाण होताच Devendra Fadnavis अ‍ॅक्शन मोडमध्ये; दिले ‘हे’ तातडीचे आदेश

दरम्यान, आरोपीच्या वकिलांनी न्यायालयात पोलिसांच्या मागणीला विरोध केला. आरोपीवर लावलेल्या भारतीय न्याय संहितेतील कलम ३५३(२) च्या अनुषंगानेही वकिलांनी युक्तिवाद केला. संबंधित कलम लागू होत नसल्याचा दावा त्यांनी केला. आरोपी स्वतःहून पोलिसांसमोर हजर झाला असून, त्याच्यावर यापूर्वी २०१४ आणि २०१७ मध्ये गुन्हे दाखल असल्याचेही वकिलांनी नमूद केले. तसेच प्रकरणातील काही कलमे जामीनपात्र असल्याचा युक्तिवाद करण्यात आला.

Vidyanand Bapad Attack: विद्यानंद बापटांना मारहाण करणाऱ्या संतोष चव्हाणची मुजोरी अन् विकृत समर्थनाचा प्रयत्न

हल्ल्यामागील हेतू तपासणार

बापट यांच्यावर हल्ला करण्यामागे नेमका ‘मोटिव्ह’ काय होता, याचा शोध घेणे हा पोलिस तपासाचा प्रमुख भाग आहे. हल्ल्याचे नियोजन केले होते का, त्यासाठी अन्य व्यक्तींची मदत घेतली का, तसेच भविष्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न होता का, याबाबत पोलिस तपास करीत आहेत. हल्ल्यापूर्वी सुमारे आठ दिवस आरोपीने एक व्हिडिओ तयार केला होता का, त्याचा या घटनेशी संबंध आहे का, याचीही चौकशी केली जाणार आहे. आरोपीला कोणत्याही संघटनेशी संबंध आहे का, त्याने हल्ला कोणाच्या सांगण्यावरून केला का, याचीही माहिती पोलिस घेत आहेत.

Web Title: Pune court gave one day police custody to santosh chavan about vidyanand bapat assaualt case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2026 | 09:40 PM

Topics:  

  • crime news
  • DJ Speaker
  • Ganesh Festival
  • Pune Police

संबंधित बातम्या

Nagpur News : नागपुरात DJ बंदीचा आदेश धाब्यावर; दहीहंडीत DJचा दणदणाट, भरचौकात पोलिसांसमोरच…
1

Nagpur News : नागपुरात DJ बंदीचा आदेश धाब्यावर; दहीहंडीत DJचा दणदणाट, भरचौकात पोलिसांसमोरच…

अमली पदार्थांच्या पैशातून उभारलेली 55 लाखांची मालमत्ता गोठवली; पुणे जिल्ह्यात 2026 मधील पहिलीच कारवाई
2

अमली पदार्थांच्या पैशातून उभारलेली 55 लाखांची मालमत्ता गोठवली; पुणे जिल्ह्यात 2026 मधील पहिलीच कारवाई

नसरापूरनंतर मावळ हादरलं! टाकवे बुद्रुकमध्ये अडीच वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; 51 वर्षीय आरोपीला अटक
3

नसरापूरनंतर मावळ हादरलं! टाकवे बुद्रुकमध्ये अडीच वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; 51 वर्षीय आरोपीला अटक

पीडितेला जबरदस्ती गाडीत बसवण्याचा प्रयत्न; आरडाओरडा करताच लोकांनी घेतली धाव, रस्त्यातच आरोपीची केली धुलाई; Video Viral
4

पीडितेला जबरदस्ती गाडीत बसवण्याचा प्रयत्न; आरडाओरडा करताच लोकांनी घेतली धाव, रस्त्यातच आरोपीची केली धुलाई; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.